ऑनलाईन प्राथमिक शिक्षक बदली प्रक्रिया-२०२४ अंतर्गत पोर्टलवरील शिक्षकांच्या माहितीचा डेटा अद्यावत करणेबाबत online teacher transfer
संदर्भ :- १) मा. मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प. अमरावती यांचे दिनांक २५/१०/२०२४ रोजीचे V.C. मधिल सुचना.
२) मे विन्सीस आयटी सर्विसेस प्रा.लि. पुणे यांचे पत्र दिनांक २४/१०/२०२४
शासन स्तरावरुन प्राथमिक शिक्षकांची ऑनलाईन बदली प्रक्रिया राबविण्याबाबत अमरावती जिल्हा परिषदेला कळविले आहे. सदर बदली प्रक्रिया तात्काळ राबविण्याबाबत संदर्भिय क्र.१ अन्वये V.C. मध्ये मा. मु.का.अ. यांनी निर्देश दिले आहे. तसेच संदर्भ २ अन्वये मे. विन्सीस आयटी सर्विसेस प्रा.लि. पुणे यांचे कडुन बदली पोर्टलवर शिक्षकांची सेवाविषयक माहितीचा डेटा ott.mahardd.com या पोर्टलवर उपलब्ध करुन देण्यात आला आहे. सदर पोर्टलवर शिक्षकांनी आपला मोबाईल नंबर टाकुन लॉगीन करावे. आपली प्रोफाईल चेक करुन माहिती अचुक असल्याची खात्री करावी. सदर माहिती मध्ये तफावत असल्यास दुरुस्ती बाबत गटशिक्षणाधिकारी यांचे कडे अपील करावे, गटशिक्षणाधिकारी यांनी सबंधित शिक्षकांची माहिती सेवा पुस्तक व सबंधीत आवश्यक दस्ताऐवज पडताळणी करून शिक्षकांचा डेटा पोर्टलवर अद्यावत करण्याची कार्यवाही करावी. पोर्टलवरील कार्यवाही वेळोवेळी करण्यासाठी शिक्षकांनी दिलेला मोबाईल क्रमांक व E-mail ID चा वापर करणे आवश्यक आहे.
पोर्टलवर माहिती अद्यावत करण्याठी येणाऱ्या अडचणी पं.स. स्तरावरुन सोडविण्यात याव्यात, शिक्षकांची बदली
संदर्भात माहीती अद्यावत करण्यासाठी पं.स. स्तरावर कार्यरत क.प्र.अ. व सबंधित लिपीक यांना लेखी निर्देश देण्यात यावे. व
त्यांचे कडुन अचुक कार्यवाही करुन घेण्यात यावी. तसेच पर्यवेक्षकिय यंत्रणेतीत वि.अ.शि व केंद्र प्रमुख यांचे मार्फत सुध्दा योग्य
ती कार्यवाही करुन घेण्यात यावी. सदर कामात दिरंगाई होणार नाही याची कटाक्षाने दक्षता घ्यावी.
बदली पोर्टलवील शिक्षकांच्या माहिती बाबतचा डेटा अद्यावत करण्याची कार्यवाही करण्याबाबत सर्व शिक्षकांना लेखी कळविण्यात यावे. सदर कार्यवाही ७ दिवसाचे आत पुर्ण करावयाची असल्याने या बाबत तसे नियोजन करुन अंमलबजावणी करण्यात यावी. तसेच पोर्टलवरील चुकिची माहिती दुरुस्ती करण्याबाबत काही अडचणी येत असल्यास त्याबाचत तात्काळ या कार्यालयाशी संर्पक करावा. बदली पोर्टलवरील माहिती सबंधित शिक्षकांनी स्वतः पडताळणी करणे व अचुक
असल्याची खात्री करणे अत्यावश्यक आहे.
सदर कार्यवाही ही कोणत्याही परिस्थीतीत ७ दिवसाचे आत करावयाची असल्यामुळे या बाबत दक्षता घेण्यात यावी. अन्यथा याबाबतची सर्वस्वी जबाबदारी आपली तसेच बदली प्रक्रिये सबंधीत सर्व कर्मचारी यांची राहील याची नोंद घ्यावी. (All Teacher can now log in to the portal to verify their profile information and the Block Education Officers (BEOs) can proceed with validating the teachers data.)