OTT पोर्टलवरील सुधारित वेळापत्रकानुसार एकूण आठ टप्पे सविस्तरपणे समजून घेऊया online teacher transfer 

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

OTT पोर्टलवरील सुधारित वेळापत्रकानुसार एकूण आठ टप्पे सविस्तरपणे समजून घेऊया online teacher transfer 

💥 *Phase-1 मधील टप्पे* 💥

*(OTT पोर्टलवरील सुधारित वेळापत्रकानुसार)*

⭕ *पहिला टप्पा-*
*सर्व कार्यरत 100% शिक्षकांनी प्रोफाईल अपडेट करणे व Verify करण्यासाठी गटशिक्षणाधिकारी यांच्याकडे Submit करणे.*

_कालावधी-02 मार्च ते 14 मार्च_

⭕ *दुसरा टप्पा-*
*गटशिक्षणाधिकारी यांनी सर्व शिक्षकांचे प्रोफाईल तपासणे व Verify करून Accept करण्यासाठी शिक्षकांकडे परत पाठविणे.*

_कालावधी-02 मार्च ते 14 मार्च_

⭕ *तिसरा टप्पा-*
*गटशिक्षणाधिकारी यांनी Verify केलेली किंवा बदल केलेली माहिती शिक्षकांना मान्य नसेल तर शिक्षणाधिकारी यांच्याकडे appeal करणे.*

_कालावधी- 02 मार्च ते 14 मार्च_

⭕ *चौथा टप्पा-*
*शिक्षणाधिकारी (प्रा) यांनी शिक्षकांचे शिक्षकांचे appeal तपासून Verify करणे व Accept करण्यासाठी शिक्षकांकडे परत पाठविणे.*

_कालावधी-02 मार्च ते 14 मार्च_

⭕ *पाचवा टप्पा-*
*गटशिक्षणाधिकारी किंवा शिक्षणाधिकारी यांनी Verify केलेले प्रोफाईल शिक्षकांनी Accept करणे. शिक्षकांनी प्रोफाईल Accept केल्यानंतर बदली प्रक्रिया संपेपर्यंत पुन्हा कोणत्याही टप्प्यावर बदल करता येणार नाहीत.*

_कालावधी-02 मार्च ते 14 मार्च_

⭕ *सहावा टप्पा-*
*जे शिक्षक जाणीवपूर्वक बदली प्रक्रियेत अडथळा आणण्यासाठी प्रोफाईल अपडेट करणार नाहीत किंवा वरील टप्प्यांमध्ये सहभागी होणार नाहीत, अशा शिक्षकांचे प्रोफाईल गटशिक्षणाधिकारी सक्तीच्या स्वीकृतीने (Force Acceptence) Accept करतील.*

_कालावधी-15 मार्च ते 15 मार्च_

⭕ *सातवा टप्पा-*
*वरील 6 टप्पे पूर्ण झाल्यानंतर जिल्ह्यातील सर्व शिक्षकांचे प्रोफाईल Acceptence 100 % पूर्ण झाल्यानंतर शिक्षक इतर सर्व शिक्षकांचे प्रोफाईल पाहू शकतील. चुकीची माहिती भरलेल्या शिक्षकांवर आक्षेप घ्यायचा असेल तर मुख्य कार्यकारी अधिकारी यांचेकडे Social Appeal करता येईल.*

_कालावधी-16 मार्च ते 16 मार्च_

⭕ *आठवा टप्पा-*
*शिक्षकांनी केलेल्या Social Appeal वर मुख्य कार्यकारी अधिकारी सुनावणी घेऊन निर्णय घेतील.*

_कालावधी-17 मार्च ते 18 मार्च_

Join Now