वेतन देयके ७ वा वेतन आयोग ५ वा हप्ता (राहीलेला १,२,३ व ४था) हप्त्यासह ऑनलाईन पद्धतीने पारीत करणेबाबत online payment 7th pay installment
माहे फेब्रुवारी २०२५ चे वेतन देयके ७ वा वेतन आयोग ५ वा हप्ता (राहीलेला १, २, ३ व ४था) हप्त्यासह ऑनलाईन पद्धतीने पारीत करणेबाबत.
शिक्षण संचालनालय (माध्यमिक व उच्च माध्यमिक) महाराष्ट्र राज्य,, पुणे
क्र. शिसंमा/२०२४/टी-५-७/शालार्थ/७ वावेआ/ऑनलाईन /577 प्रति,
दिनांक : ४/०२/२०२५
१) विभागीय शिक्षण उपसंचालक, सर्व,
२) शिक्षणाधिकारी (प्राथमिक/माध्यमिक), जि.प. सर्व07 FEB 2025
३) शिक्षण निरीक्षक, (उत्तर/दक्षिण/पश्चिम) मुंबई.
४) अधीक्षक, वेतन व भविष्य निर्वाह निधी पथक, (माध्यमिक) सर्व.
विषय :- माहे फेब्रुवारी २०२५ चे वेतन देयके ७ वा वेतन आयोग ५ वा हप्ता (राहीलेला १, २, ३ व ४था) हप्त्यासह ऑनलाईन पद्धतीने पारीत करणेबाबत.
संदर्भ – संचालनालयाचे पत्र क्र. शिसंमापू/शिक्षक शिक्षकेतर /टि-५/२४-२५/३७४४ दि. ११/७/२०२४
उपरोक्त विषयास अनुसरून संदर्भिय पत्र पहावे. संदर्भिय पत्रान्वये दिलेल्या सूचनेनुसार काही लेखाशीर्षाचा ७ व्या चेतन आयोगाचा ५वा हप्ता अदा करण्यात आलेला आहे. तथापि उर्वरित लेखाशीर्पाबाबत स्वतंत्र आदेश/सचना निर्गमित
करणेबाबत विचाराधिन होते.
सबब लेखाशीर्ष २२०२१९०९, २२०२१९४८ व २२०२एच९७३ मध्ये मयत, सेवानिवृत्त व कार्यरत सर्व पात्र शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांचे ७ वा वेतन आयोगाचा (१, २, ३ व ४ था हप्ता राहीला असल्यास) पाचवा हप्ता माहे फेब्रुवारी २०२५ चे वेतन देयकासोबत ऑनलाईन पद्धतीने यथानियम अदा करावे.
तसेच संदर्भिय पत्रान्वये लेखाशीर्य २२०२०४४२, २२०२०४७८, २२०२३३७९, २२०२०५७६, २२०२०५४९, २२०२०५३१, २२०२०५५८, २२०२०४६९, २२०२०५०२ मध्ये ७ व्या वेतन आयोगाचा ५ वा हप्ता अदा करण्यात आला आहे. परंतू सदर लेखाशीर्षामध्ये शिक्षक शिक्षकेतर कर्मचा-यांचा सातव्या वेतन आयोगाचा ५ वा हप्ता काही कारणास्तव अदा करणे बाकी असल्यास खातरजमा करून त्यांचेही ७ वा वेतन आयोगाचा (१, २, ३ व ४ था हप्ता राहीला असल्यास) पाचवा हप्ता माहे फेब्रुवारी २०२५ चे वेतन देयकासोबत ऑनलाईन पद्धतीने यथानियम अदा करावे.
भविष्यात सातवा वेतन आयोग पहिला, दुसरा, तिसरा, चौथा व पाचवा हप्त्यायायत तक्रारी निर्माण झाल्यास संबंधित शिक्षणाधिकारी व अधीक्षक, वेतन पथक (माध्यमिक) यांचेवर जबाबदारी निश्चित करण्यात येईल याची नोंद घ्यावी.
उपलब्ध करून दिलेले अनुदान प्रचलित नियमानुसार आपणाकडून केलेल्या मागणीच्या मर्यादेत खर्च होईल या अनुषंगाने कार्यवाही करण्यात यावी.
मा. शिक्षण संचालक यांचे मान्यतेने.
प्र. शिक्षण उपसंचालक (अंदाज व नियोजन) (माध्यमिक व उच्च माध्यमिक)
प्रत माहितीस्तव सविनय सादर.
१) मा. प्रधान सचिव, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, मंत्रालय, मुंबई-३२
२) मा. आयुक्त (शिक्षण), महाराष्ट्र राज्य, पुणे-१
३) मा. शिक्षण संचालक, प्राथमिक शिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे
४) कक्ष अधिकारी, टिएनटी-३ शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, मंत्रालय मुंबई
प्रत श्री. पयन जोशी, प्रोजेक्ट लिड, (शालार्थ सिस्टिम), महाआयटी, मुंबई. यांना कळविण्यात येते की, वरील प्रमाणे दिलेल्या सूचनेनुसार संबंधित सर्व लेखाशीर्षासाठी ७ व्या वेतन आयोगाचा १, २, ३, ४ था व ५ वा हप्ता माहे फेब्रुवारी २०२५ च्या वेतन देयकासोबत काढणेसाठी शालार्थ मध्ये आवश्यक ती सुविधा तात्काळ उपलब्ध करून देण्यात यावी.
प्रत जिल्हा कोषागार अधिकारी, सर्व.