सन २०२४-२५ या आर्थिक वर्षात वैद्यकीय देयके ऑनलाईन अदा करण्याची परवानगी देणेबाबत online medical bill permission
संदर्भ- १) संचालनालयाचे पत्र क्र. शिसंमापू/शिक्षक-शिक्षकेतर/टि-५/२४-२५/३०४१ दि. १२.६.२०२४.
२) अधीक्षक, वेतन व भनिनि पथक (माध्य) संबधित सर्व यांचेकडुन वैद्यकीय देयकाची प्राप्त माहिती.
उपरोक्त विषयास अनुसरून वेतन पथक (माध्यमिक) सर्व यांचेकडे दि. १३/८/२०२४ अखेर प्राप्त वैद्यकीय देयक संख्या व त्यासाठी लागणारी रक्कम याबाबतची माहिती मागविण्यात आली होती.
त्यानुसार वेतन पथक (माध्यमिक) यांचेकडून प्राप्त माहितीनुसार सन २०२४-२५ या आथिक वर्षात मंजूर अनुदान व जिल्हयाचा
संभाव्य खर्च विचारात घेता लेखाशीर्ष २२०२०४४२, २२०२०४७८, २२०२०५५८, २२०२०५७६, २२०२०४६९ मध्ये वैद्यकीय देयके बीम्स
प्रणालीवर उपलब्ध असलेल्या अनुदानातून ऑनलाईन अदा करण्यास मान्यता देण्यात येत आहे. सदरची वैद्यकीय देयके आपल्या कार्यालयास
प्राप्त आवक क्रमांकानुसार तसेच शासनाने वेळोवेळी दिलेल्या निर्देशानुसार व नियमाप्रमाणे अदा करावी. (दिन ३०/९/ 2028 अखेर पर्यंत) उपरोक्त वैद्यकीय देयके अदा करताना नियमित वेतनासाठी अनुदान कमी पडणार नाही याची खात्री करूनच संबंधित वेतन पथक यांनी देयके अदा करावीत. सन २०२४-२५ मध्ये प्रशासकीय मान्यता/पुनर्मान्यता मिळालेली थकीत देयके अदा करण्यात नेऊ नये.
19M (संपत सुर्यवंशी) १मना
तथापि लेखाशीर्ष २२०२१९४८, २२०२१९०१ व २२०२एच९७३ मध्ये पर्याप्त अनुदान उपलब्ध नसल्याने सदर लेखाशा अंतर्गत वैद्यकीय देयके शालार्थमधून ऑनलाईन अदा करण्यात येऊ नये.