विद्यार्थ्यांकरिता विविध मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती शैक्षणिक वर्ष 2024-25 अर्ज ऑनलाईन पद्धतीने नोंदणीबाबत online matricpurva shishyavrutti yojana
*समाज कल्याण शिष्यवृत्ती संदर्भात महत्त्वाचे*
विषय :- *अनुसूचित जाती (SC) प्रवर्गातील विद्यार्थ्यांकरिता विविध मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती शैक्षणिक वर्ष 2023-24 पासून ऑनलाईन पद्धतीने राबवणे बाबत*
शैक्षणिक वर्ष 2023 24 पासून केंद्र शासनाने दिलेल्या निर्देशानुसार खालील शिष्यवृत्ती योजना ऑनलाईन पद्धतीने महाडीबीटी प्रणाली द्वारे राबविणे बाबत कळविले आहे
1) मॅट्रिक पूर्व शिष्यवृत्ती ( इयत्ता 9 व 10 )
2) अस्वच्छ व्यवसाय शिष्यवृत्ती
3) सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती (इयत्ता 5 ते 7 आणि इयत्ता 8 ते 10)
4) गुणवत्ता शिष्यवृत्ती (इयत्ता5 ते 10)
5) शिक्षण शुल्क परीक्षा शुल्क
*विशेष सूचना:- फक्त अनुसूचित जाती (SC) प्रवर्गातील विद्यार्थ्यांकरिता असणाऱ्याच वरील शिष्यवृत्ती ह्या ऑनलाइन पोर्टलवर नोंदणी करायच्या आहे*
🎯 वरील सर्व योजनांची ऑनलाईन अर्ज नोंदणी करण्याकरिता खालील प्रमाणे कार्यप्रणाली अवलंबण्यात यावी
📌 सर्वप्रथम अर्ज नोंदणीसाठी लिंक उपलब्ध
https://prematric.mahait.org/Login/Login
ह्या लिंक वर जाऊन मुख्याध्यापक लॉगिन करावयाचे आहे यामध्ये मुख्याध्यापकांनी
यूजर आयडी मध्ये :- (शाळेचा udise क्रमांक)
टाईप करून लॉगिन करावे.
📌 नंतर शाळेचे प्रोफाइल अद्ययावत करून यामध्ये मुख्याध्यापक, लिपिकाची माहिती भरावी.
📌 तदनंतर विद्यार्थी प्रोफाइल अद्ययावत करावी यामध्ये विद्यार्थ्यांची वैयक्तिक व शैक्षणिक माहिती अद्ययावत करावी.
📌 शेवटी संबंधित विद्यार्थी ज्या योजनेसाठी पात्र आहे त्या योजनेची निवड करून अर्ज नोंदणी करणे.
तरी वर नमूद केलेल्या योजनेचे पात्र सर्व विद्यार्थ्यांचे अर्ज महाडीबीटी प्रणाली मध्ये तात्काळ भरणे आहे.