जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक जिल्हांतर्गत बदली सन- 2025 माहिती सादर करणेबाबत online intra district transfer
संदर्भ :
1) महाराष्ट्र शासन, ग्रामविकास विभाग, शासन निर्णय क्रमांक: जिपब 2023/प्र.क्र.118/आस्था-14 दि. 18.06.2024.
2) महाराष्ट्र शासन, ग्रामविकास विभाग, बदली वेळापत्रक क्रमांक न्यायाप्र-2024 /प्र.क्र.105/आस्था-14 दि.07.11.2024.
उपरोक्त संदर्भ क्रमांक 01 चे शासन निर्णयानुसार आपणांस सुचित करण्यात येते की, जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यांसाठीचे सुधारित धोरण निश्चित करण्यात आलेले आहे. त्यानुसार प्राथमिक शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यांची प्रक्रिया संगणकीय प्रणालीने ऑनलाईन पोर्टलद्वारे रांबविण्यात येणार आहे. तसेच संदर्भ क्रमांक 02 चे पत्रानुसार बदली प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी, ऑनलाईन पोर्टलद्वारे बदली प्रक्रियेसाठी संपूर्ण राज्यासाठी राज्यस्तरावरून विहित वेळापत्रक निश्चित केलेले आहे. या वेळापत्रकातील निश्चित दिनांकानुसार बदली संदर्भाने विहित आवश्यक ती कार्यवाही करण्याचे निर्देश प्राप्त झालेले आहेत. या वेळापत्रकातील मुद्दा क्रमांक 04 मधील 1 ते 10 मध्ये नमूद दिनांकानुसार विहित कार्यवाही करणे अपेक्षित आहे.
संदर्भ क्र.02 मधील मुद्दा क्रमांक 4 मधील 01 नुसार दिनांक 01 जानेवारी ते 28 फेब्रुवारी या दरम्यान “शासन निर्णयातील तरतुदीनुसार आवश्यक शिक्षकांच्या याद्या प्रसिद्ध करणे (बदली पात्र शिक्षक, बदली अधिकार प्राप्त शिक्षक इत्यादी याद्या) व त्यानुषंगाने प्राप्त आक्षेप यावर निर्णय घेणे” व मुद्दा क्रमांक 05 नुसार “बदली प्रक्रियेमध्ये समाविष्ट शिक्षकांचे वैयक्तिक प्रोफाईल तयार करणे / अद्ययावत करणे, पडताळणी करणे व त्यामध्ये दुरुस्ती करणे” याबाबतची कार्यवाही दि. 28 फेब्रुवारी पर्यंत अंतिम करण्यात यावी. बदली प्रक्रिया सुरु झाल्यांनतर शिक्षकांच्या वैयक्तिक प्रोफाईलमध्ये कोणतीही दुरुस्ती करता येणार नाही.” असे नमूद करण्यात आलेले आहे.
प्राथमिक शिक्षक बदली संदर्भाने संदर्भ क्रमांक 01 व 02 नुसार विहित वेळापत्रकानुसार निश्चित केलेली कार्यवाही करणे अपेक्षित आहे. प्राथमिक शिक्षक बदल्यांमध्ये विशेष संवर्ग शिक्षक भाग 01 व विशेष संवर्ग शिक्षक भाग 02 मध्ये सहभागी होवू इच्छित असलेल्या शिक्षकांच्या कागदपत्रांची (संचिका) / प्रमाणपत्रांची पडताळणी अपेक्षित असल्याच्या अनुषंगाने वरील संदर्भ क्र.01 मधील विशेष संवर्ग शिक्षक भाग-01 करीता जिल्हा शल्यचिकित्सक यांचे प्रमाणपत्र / प्रति स्वाक्षरी केलेले प्रमाणपत्रासह तरतूद क्रमांक 4.2.8 व विशेष संवर्ग शिक्षक भाग 02 करीता तरतूद क्रमांक 4.3.5 नुसार संपूर्ण कागदपत्रांची पडताळणी करून पात्र व अपात्र शिक्षकांच्या याद्या तालुकास्तरावर घोषित कराव्यात व आक्षेपाचे निराकरण करून तालुकास्तरीय समितीच्या स्वाक्षरीने संवर्गनिहाय अंतिम पात्र यादीचा अहवाल दिलेल्या विहित नमुन्यात या कार्यालयाकडे सादर करावा.
प्राथमिक शिक्षक संवर्गामध्ये प्राथमिक शिक्षक प्राथमिक पदवीधर व पदोन्नत मुख्याध्यापक या तीन पदांचा समावेश आहे. सदरील बदली प्रक्रियेदरम्यान सर्व शिक्षकांनी स्वतःची सेवाविषयक व वैयक्तिक माहिती ऑनलाईन पोर्टलवर नमूद करणे अथवा अद्ययावत करणे आवश्यक आहे पोर्टलवर शिक्षकांनी नमूद केलेल्या माहितीची पडताळणी करणे ही गटशिक्षणाधिकारी यांची जबाबदारी आहे. ऑनलाईन बदली प्रक्रीयेची संपूर्ण कार्यवाही विहीत वेळेत आणि अचुक होणे करीता, शिक्षकांना येणा-या तांत्रीक अडचणींचे निराकरण करणेसाठी तसेच एकंदरीत बदली प्रक्रीयेच्या सुसुत्रतेकरीता गटशिक्षणाधिकारी यांचे अध्यक्षतेखाली तालुकास्तरावर समीती तयार करुन ऑनलाईन बदली नियंत्रण कक्ष स्थापन करावा आणि आवश्यकतेनुसार तांत्रीक व प्रशासकीय कामासाठी अधिकारी-कर्मचारी उपलब्ध करुन घ्यावेत.
बदली पोर्टलवर शिक्षकांनी नमूद केलेली माहिती पडताळणी करताना संबंधित शिक्षकांच्या सेवापुस्तीकेवरून माहितीची पडताळणी करावी. बदलीची माहिती पडताळणी करण्यासाठी आणि बदली प्रक्रीयेदरम्यान अथवा बदली प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आक्षेप अथवा हरकती प्राप्त झाल्यास बदलीमध्ये समाविष्ट असलेल्या शिक्षकांची माहिती उपलब्ध करून देण्यासाठी आश्लंपा अधिनिस्त सर्व शिक्षकांच्या कागदपत्र / प्रमाणपत्राच्या संचिका दोन प्रतीमध्ये हस्तगत करून घ्याव्यात एक प्रत गटशिक्षणाधिकारी कार्यालयामध्ये सुरक्षित जतन करून ठेवावी व एक प्रत पुढील सुचनेनंतर जिल्हा बदली नियंत्रण कक्षाकडे सादर करावी. संदर्भ क्रमांक 2 अन्वये मुद्दा क्रमांक 4 मधील 1 नुसार आपल्या अधिनिस्त गटातील शिक्षकांच्या संवर्गनिहाय सर्व प्रकारच्या ऑफलाईन याद्या तयार करून ठेवाव्यात व जिल्हा बदली नियंत्रण कक्षाने पुढील सुचना दिल्यांनतर त्या प्रमाणीत करुन सादर कराव्यात. मुद्दा क्रमांक 05 नुसार बदली पोर्टलवर प्रोफाईल अपडेशन करण्याची सुविधा उपलब्ध झाल्यानंतर सर्व शिक्षकांना आपली वैयक्तिक माहिती विहित कालावधीत नमूद अथवा अद्ययावत करण्यासाठी अवगत करावे तसेच शिक्षकांनी नमूद केलेली माहिती तालुका बदली नियंत्रण कक्षामार्फत पडताळणी करून घ्यावी.
शासन निर्णयातील मुद्दा क्रमांक 5.10.5 मधील तरतुदीनुसार एखाद्या शिक्षकाने जाणीवपूर्वक खोटी व दिशाभूल करणारी माहिती भरून बदली करून घेतली आहे अशी बाब आढळल्यास संबंधित शिक्षकाचे निलंबन करून त्याच्या विरुद्ध शिस्तभंगाची कारवाई मा. मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी प्रस्तावित करावी अशा सुचना आहेत. सदरील बाबीचे गांभिर्य लक्षात घेता आएन्या आधिनस्त कार्यरत शिक्षक हे बदलीमध्ये खोटी अथवा दिशाभूल करणारी माहिती सादर करून बदलीमध्ये चुकीचा लाभ घेणार नाहीत याची पूर्णतः दक्षता घ्यावी. सदरील बाब आढळून आल्यास तालुकास्तरीय समितीस सुद्धा जबाबदार धरण्यात येईल याची गांभीर्याने नोंद घ्यावी.
प्राथमिक शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदली सन २०२४-२५ साठी वरील संदर्भ क्रमांक 01 चा शासन निर्णय आणि संदर्भ क्र.02 चे वेळापत्रक आपल्या अधिनिस्त सर्व शिक्षकांना अवगत करून द्यावे. बदली बाबत राज्य शासनाकडून अथवा वरिष्ठ कार्यालयाकडून येणारे निर्णय / आदेश / सूचना आपणांस जिल्हा नियंत्रण कक्षातर्फे वेळोवेळी अवगत करण्यात येतील. त्यानुसार तालुकास्तर बदली नियंत्रण कक्ष व इतर क्षेत्रीय यंत्रणेस मार्गदर्शक सुचनांचे पालन करणे, अनुषांगीक आवश्यक माहिती सादर करणे बंधनकारक राहील..
करीता संदर्भ क्रमांक 01 मधील तरतुदीनुसार व 02 मधील वेळापत्रकानुसार प्राथमिक शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्या विषयीची माहिती तयार करून बदली संदर्भाने तालुकास्तरावरील आवश्यक ती कार्यवाही बाबत आपलेस्तरावर पुढील नियोजन करण्यात यावे. व केलेल्या कार्यवाहीचा अहवाल वेळोवेळी जिल्हास्तर बदली नियंत्रण कक्षास सादर करावा. सदरील कामी कसल्याही प्रकारीची हलगर्जी अथवा विलंब झाल्यास तसेच शासन निर्णयातील तरतुदींचे / नियमाचे उल्लंघन झाल्यास सर्वस्वी जबाबदारील संबधीत गटशिक्षणाधिकारी यांची राहील याची गांभियाने नोंद घ्यावी. व ऑनलाईन बदली प्रक्रीया विहित वेळेत व पारदर्शक पद्धतीने पाड पाडली जाईल याबाबत दक्षता घ्यावी.
सोबत : १. संदर्भ 01 व 02 शासन निर्णय व पत्र.
२. शिक्षक बदली माहिती संकलन नमुना (Excel)