माहे फेब्रुवारी २०२५ चे नियमित ऑनलाईन वेतन देयक फॉरवर्ड करणे बाबत online deyak forward
उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने, माहे फेब्रुवारी २०२५ चे वेतन देयक शालार्थ प्रणालीव्दारे दि २०.०२.२०२५ पर्यंत फॉरवर्ड करून दि २४.०२.२०२५ पर्यंत हार्डकॉपीवर स्वाक्षरी घ्यावी. हार्डकॉपी या कार्यालयास प्राप्त झाल्याशिवाय देयक मंजूर केले जाणार नाही. देयक फॉरवर्ड करण्यापूर्वी खालील सुचना काळजीपुर्वक वाचाव्यात.
१. आयकर अधिनियम १९६१ अनुसार सन २०२४-२५ या आर्थिक वर्षातील प्रत्येक शिक्षक/शिक्षकेत्तर कर्मचा-यांचे फॉर्म नं १६ आपल्या स्तरावर तयार करून ठेवावेत. नियमानुसार आयकर कपात करावा. तसेच देयकासोबत खालील प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे.
प्रमाणपत्र
मी प्राचार्य/मुख्याध्यापक माध्यमिक शाळा/उच्च माध्यमिक शाळा प्रमाणित करतो की, सन २०२४-२५ या आर्थिक वर्षातील आयकर कपात प्रत्येक पात्र कर्मचा-याकडून करणेत आली असून तफावत आढळून आल्यास मी व्यक्तीशः जबाबदार राहील.
प्राचार्य/मुअ स्वाक्षरी
२. २०२३-२४ नुसार मंजुर, कार्यरत, रिक्त व अतिरिक्त पदांचा संवर्गनिहाय तपशिल जोडावा. हार्डकॉपी स्वाक्षरीस्तव सादर करताना, शाळेच्या कर्व्हरीगलेटरवर (लेटरपॅडवर) शाळेचा युडाएस क्र, शालार्थ आयडी क्रमांक तसेच कायम/प्रभारी मुख्याध्यापक/प्राचार्याचे नाव व मोबाइल क्र (व्हाट्सअप) नमुद करावा.
३. वेतनात बदल तक्ता शालार्थ प्रणालीत नव्याने समाविष्ट झाला आहे. तो पुढीलप्रमाणे Current Path:>Worklist>Payroll>Payroll Generation/View>View/Approve/Delete Statement Bill Details ऑनलाइन मधून तक्ता काढून देयकासोबत जोडण्यात यावा. Bill>Change
४. प्रति कर्मचारी एक रूपया रेव्हेन्यू स्टॅप नियमितपणे कपात करावी.
५. भनिनि कपाती मार्च २०२४ या महिन्यामध्ये जी नियमित कपात केलेली आहे ती कपात सन २०२५-२६ या पुर्ण आर्थिक वर्षामध्ये बदल करण्यात येऊ नये तसेच सामान्य प्रशासन विभाग, महाराष्ट्र यांचेकडील परिपत्रक दि. ०१ डिसेंबर २०२४ नुसार भनिनि वर्गणी (नियमित व थकबाकी रक्कम मिळून) एकूण वार्षिक वर्गणी रूपये पाच लाखाच्या मर्यादेतच जमा करावी. सदर वर्गणीची रक्कम रू पाच लाखापेक्षा जास्त होत असेल तर उर्वरित महिन्याची वर्गणी जमा करणे थांबवावे. एनपीएस धारक कर्मचा-यांची नियमित एनपीएस कपात करावी.
६. स्वाक्षरीचे अधिकार असल्याशिवाय देयक फॉरवर्ड करू नये.
७. देयक ऑनलाईन फॉरवर्ड केल्यानंतर वरील कालावधीत देयकाची हार्डकॉपी सादर करावी. देयकाची हार्डकॉपी सादर न केल्यास देयक पारित होणार नाही याची नोंद घ्यावी.
८. वित्त विभागाकडील दि २४ जानेवारी २०२३ च्या शासन निर्णयानूसार समूह अपघात विमा योजनेची रक्कम (गट क व ड) रू ५३१/- कपात आपले स्तरावरून करून भरणा केलेल्या चलनाची प्रत आपले स्तरावर जतन करून ठेवावी.
/अधीक्षक