बी.एड.अभ्यासक्रम आता एक वर्षाचा ! २०२६-२७ पासून बदल लागू होणार one year curriculum for b.ed degree
*(24 न्यूज l पुणे l 15 फेब्रुवारी)*
🟦 राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषदेने एक वर्षाचे बी. एड आणि एम. एड कार्यक्रम पुनःसंचयित करण्याचा निर्णय घेतला आहे. जवळजवळ एक दशकानंतर या दोन्ही अभ्यासक्रमांचा कालावधी दोन वर्षांपर्यंत वाढवला जाणार आहे. हा बदल पुढील वर्षी म्हणजेच २०२६-२७ पासून लागू होईल. नवीन शैक्षणिक धोरणानुसार जे विद्यार्थी चार वर्षांचा पदवी अभ्यासक्रम पूर्ण करतील, त्यांनाच एक वर्षाच्या बी. एड. अभ्यासक्रमास प्रवेश मिळू शकतो.
अनेक दशकांपासून एक वर्ष चालणाऱ्या बी.एड. आणि एम.एड. कार्यक्रमांना २०१४ मध्ये एनसीटीईने नियमावलीअंतर्गत दोन वर्षांपर्यंत वाढविले होते. मात्र, आता त्यानंतर बदललेल्या नव्या अभ्यासक्रमांबाबत मिळालेल्या माहितीनुसार, एक वर्षाचा बी.एड. आणि एम.एड. अभ्यासक्रम पुन्हा सुरू करण्यात येत असला तरी, दोन वर्षांचा अभ्यासक्रम रद्द केला जात आहे. एक वर्षाचा एम.एड. अभ्यासक्रम पूर्णवेळ असेल, तर शिक्षक आणि शिक्षण प्रशासकांसारख्या काम करणाऱ्यांना दोन वर्षांचा अर्धवेळ अभ्यासक्रम दिला जाईल. मसुद्याच्या नियमांनुसार, एक वर्षाच्या बी.एड कार्यक्रमासाठी, ज्यांनी चार वर्षांचा पदवी किंवा पदव्युत्तर कार्यक्रम पूर्ण केला आहे, तेच पात्र असतील.
तीन वर्षाचा पदवी कार्यक्रम पूर्ण केलेल्यांना हा अभ्यासक्रम उपलब्ध राहणार नाही. अशा विद्यार्थ्यांसाठी दोन वर्षांचा बी.एड कार्यक्रम सुरू, राहील, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. आयटीईपी हा चार वर्षांचा कार्यक्रम (बीए बी.एड. बी.एस्सी. बी.एड./बी.कॉम. बी.एड.) २०२३-२४ शैक्षणिक सत्रापासून ५७ संस्थांमध्ये पायलट पद्धतीने सुरू करण्यात आला. हा कार्यक्रम १२ वी पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध आहे. २०२५-२६ सत्रापासून आयटीईपी आता पायलट पद्धतीने सुरू राहणार नाही आणि शिक्षक शिक्षणाचा नियमित कार्यक्रम असेल.
म्हणजेच या वर्षापासून संस्था हा अभ्यासक्रम देण्यासाठी मान्यता मिळवू शकतात. २०२५-२६ सत्रापासून आयटीईपी योग, शारीरिक शिक्षण, संस्कृत शिक्षण आणि कला शिक्षण हे चार विशेष आयटीईपी कार्यक्रम देखील सुरू केले जातील, असे सांगितले जात आहे. २०१४ च्या नियमावलीत चार वर्षांच्या बीए, बी.एस्सी. बी.एड.ची तरतूद होती, ती आता आयटीईपीमध्ये रूपांतरित झाली आहे.
*तीन प्रकारचे बी.एड.*
बारावीनंतर जे अॅडमिशन घेणार आहेत, त्यांनी एकत्मिक शिक्षण शिक्षक कार्यक्रम (आयटीईपी) साठी प्रवेश घेतला, तर त्यांची चार वर्षांची पदवी आणि बी. एड. एकत्रित होईल. जर एखाद्याने चार वर्षांचा पदवी कोर्स पूर्ण केला, तर त्याला एक वर्षांचे बी.एड. करता येईल. तसेच, तीन वर्षांचा पदवी कोर्स करणाऱ्यास दोन वर्षांचे बी. एड. करावा लागेल. हे तिन्ही कार्यक्रम वेगवेगळ्या विद्यार्थ्यांसाठी आहेत.
…………………………………….