अजून कापडाचाच पत्ता नाही; विद्यार्थ्यांना गणवेश कधी..? नवे शैक्षणिक सत्र तोंडावर : सुरुवातीचे काही दिवस जाणार गणवेशाविना one state one uniform

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अजून कापडाचाच पत्ता नाही; विद्यार्थ्यांना गणवेश कधी..? नवे शैक्षणिक सत्र तोंडावर : सुरुवातीचे काही दिवस जाणार गणवेशाविना one state one uniform

लोकमत न्यूज नेटवर्क उमरगा :यंदा विद्यार्थ्यांच्या गणवेशासाठी शासन कटिंग कापड पुरविणार असून, ते स्थानिक बचत गटांमार्फत शिवून घ्यायचे आहेत. परंतु, आता नवीन शैक्षणिक सत्र सुरू होण्यास केवळ दोन दिवसांचा कालावधी शिल्लक असताना अजून कापडच उपलब्ध झाला नसल्याने तो शिवून कधी मिळणार अन् विद्यार्थ्यांना वाटप कधी करणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे. शिवाय, विद्यार्थ्यांचे गणवेश शिवण्याइतपत कुशल कारागीर बचत गटाकडे उपलब्ध असतील का, असाही प्रश्न आहेच. पर्यायाने सुरुवातीचे काही दिवस तरी विद्यार्थ्यांना गतवर्षीचे गणवेश किंवा अन्य कपडे घालूनच शाळेला यावे लागणार असल्याचे सध्याच्या परिस्थितीवरून दिसत आहे.

१५ जूनपासून नवीन शैक्षणिक सत्रास प्रारंभ होत आहे. यंदा शासनाने विद्यार्थ्यांना गणवेशाची रक्कम देण्याऐवजी गणवेशाचे कट केलेले कापड शाळांना पुरवून स्थानिक बचत गटाच्या माध्यमातून ते विद्यार्थ्यांच्या

.

मापानुसार शिवून घेण्याचा निर्णय घेतला आहे. यातून स्थानिक बचत गटांना रोजगार उपलब्ध होईल, शिवाय विद्यार्थ्यांना त्यांच्या मापाचे कपडे उपलब्ध होतील, हा उद्देश आहे. परंतु, केवळ १०० रुपये मजुरीमध्ये विद्यार्थ्यांचा गणवेश शिवून घेणे शक्य आहे का? शिवाय हजारो गणवेश वेळेत शिवून देण्याइतपत बचतगट सक्षम आहेत का? त्यांच्याकडे कुशल कारागीर म्हणजेच शिंपी आहेत का

असे एक ना अनेक प्रश्न आता उपस्थित होत आहेत.

पूर्वी गणवेशासाठी विद्यार्थ्यांना तीनशे रुपये दिले जात होते. पण आता राज्यात एकाच ठिकाणावरून गणवेशाचे कापड पुरविण्याचा अट्टाहास का केला जात आहे, याचे कोडे उलगडत नाही. त्यातच प्रत्येक गणवेश शिलाईसाठी केवळ शंभर रुपये दिले जाणार असून, एवढ्या कमी रकमेत शिलाई करून देण्यास

बचतगट तयार होतील का, हा प्रश्न आहे. आता शाळा सुरू होण्यास अवघ्या तीन दिवसांचा कालावधी शिल्लक आहे. परंतु, अजून प्रशासनाकडे हे कापडच उपलब्ध झालेले नाही. ते मिळाल्यानंतर कुशल कारागीर शोधून बचत गटांकडून हे गणवेश शिवून घेण्यासाठी जास्त वेळ लागेल. त्यामुळे शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना गणवेश मिळण्याची शक्यता धूसर दिसत आहे.

कापड आले तरी

ठेवायचे कुठे?

तालुक्यातील बहुतांश शाळांच्या कार्यालयांना गळती लागते. याशिवाय उंदीर, घुशी यांचाही त्रास आहेच. त्यामुळे शासनाने शाळांकडे कापड पाठवून दिले तरी ते ठेवायचे कुठे, असा प्रश्न शाळा प्रशासनासमोर आहे. मिळणाऱ्या कापडाची गुणवत्ता कशी असेल, वर्षभर तो टिकेल का, अशीही शंका काही पालकांनी बोलून

नवीन पत्रकानुसार आता शासनाकडून

गणवेशाचे कापड कट करून मिळणार असून, स्थानिक बचत गटाकडून ते शिवून घ्यावयाचे

आहे. अद्याप तरी कापड मिळालेले नसून, मिळाल्यानंतर विद्यार्थी संख्येनुसार सर्व शाळांना ते पुरविण्यात येणार आहे.

शिवशंकर बिराजदार, –

गटशिक्षण अधिकारी, उमरगा

शिक्षण विभागाचा

गणवेश वाटपाचा नवीन आदेश तुघलकी आहे. आता शाळा सुरू होण्यासाठी तीन दिवस शिल्लक असून कापड कधी मिळणार याचा पत्ता नाही. एवढे गणवेश शिवण्यासाठी व वेळेवर देण्यासाठी बचत गट सक्षम आहेत का, याची कोणतीही माहिती नाही. व्यवस्थापन समितीच्या अधिकारात गणवेश खरेदीची पूर्वीची प्रक्रियाच तुलनेत सोपी होती.

-अशोक बनसोडे,

सामाजिक, कार्यकर्ते

one state one uniform 
one state one uniform

Leave a Comment