शिक्षकांचे जुनी निवृत्ती योजनेसाठी प्रस्ताव / विकल्प सादर करणे बाबत old pension scheme for teacher

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

शिक्षकांचे जुनी निवृत्ती योजनेसाठी प्रस्ताव / विकल्प सादर करणे बाबत old pension scheme for teacher

दि ०१.११.२००५ पूर्वी पदभरती जाहीरात / अधिसुचना निर्गमित प्रकरणी शासन सेवेत दि.०१.११.२००५ रोजी

किंवा त्यानंतर रूजू झालेल्या शिक्षकांचे जुनी निवृत्ती योजनेसाठी प्रस्ताव / विकल्प सादर करणे बाबत. संदर्भ :- १. महाराष्ट शासन वित्त विभाग शासन निर्णय क्रमांक संकीर्ण- २०२३/प्र. क्र.४६ / सेवा-४ मंत्रालय मुंबई, दिनांक ०२ फेब्रुवारी २०२४

२. महाराष्ट्र शासन वित्त विभाग शासन निर्णय क्र. सेनिवे-२०२४/प्र.क्र-५४/सेवा-४ दिनांक २०/९/२०२४

३. ग्राम विकास विभाग विभाग शासन यांचे पत्र क्रमांक जिपअ/२०२४/प्र.क्र५५/आस्था-४ दि.०६/८/२०२४

४. ग्राम विकास विभागाचे शासन निर्णय क्रः जिपअ-२०२४/प्र.क्र.५५/आस्था-४ दिनांक ०१/१०/२०२४

५. महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना, जिल्हा अमरावती यांचे पत्र जा.क्र. ४१२ दि. २५/०९/२०२४

६. महाराष्ट्र राज्य उर्दु शिक्षक संघटना जि. अमरावती यांचे पत्र जा.क्र. मराउशिसं/अमरावती/१५/२०२४ दि. ०४/१०/२०२४

७. प्रहार शिक्षक संघटना, महाराष्ट्र राज्य अमरावती यांचे पत्र जा.क्र. ४९/२०२४ दि. ०७/१०/२०२४

८. अखिल महाराष्ट्र उर्दू शिक्षक संघटना जिल्हा शाखा अमरावती यांचे पत्र जा.क्र.६९/२०२४ दि. ०१/०८/२०२४ प्राप्त दि. ०८/१०/२०२४

९. कास्ट्राईब शिक्षण संघटना अमरावती यांचे पत्र जा.क्र.२१ दि. ०८/१०/२०२४

१०. महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती अमरावती यांचे पत्र जा.क्र.०२ दि. १८/१०/२०२४

उपरोक्त विषयास अनुसरुन दिनांक १/११/२००५ पुर्वी पदभरती जाहीरात अधिसुचनेनुसार सेवेत रुजु झालेल्या जि.प. कर्मचारी यांना राज्यशासनाच्या धर्तीवर संदर्भ ०२ मधील शासन निर्णयातील एकीकृत निवृत्ती योजना (Unifid Pension Scheme) किंवा संदर्भ क्रमांक ०४ मधील शासन महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्ती वेतन) नियम १९८२, महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्ती वेतनाचे अंशराशीकरण) नियम १९८४ व सर्वसाधारण भविष्य निर्वाह निधी व अनुषंगीक नियमाच्या (जुनी निवृत्ती वेतन योजना) या दोन्ही पैकी एक योजना निवडणे बाबत आदेश प्राप्त आहेत.

त्या अनषंगाने आपण करावायाची कार्यवाही खालील प्रमाणे आहे.

१) आपण आपल्या तालुक्यातील दिनांक ०१/११/२००५ पुर्वी पदभरती जाहीरात अधिसुचने नुसार सेवेत रुजु झालेल्या जि.प.प्राथमिक शिक्षक कर्मचारी यांचे कडुन उपरोक्त शासन निर्णय संदर्भ क्रमांक ०२ व ०४ या दोन्ही योजना पैकी एक योजना निवडत असेल त्या बाबत तात्काळ विकल्प द्यावेत.

२) तसेच जे शिक्षक एकीकृत निवृत्ती योजना (Unifid Pension Scheme) निवडण्याचा पर्याय देतील त्यांना

संदर्भ क्रमांक ०२ मधील शासन निर्णयाच्या तरतुदी लागु राहतील. ३) तसेच जे शिक्षक जुनी निवृत्ती योजना लागु करण्याचा पर्याय देतील त्यांना संदर्भ क्रमांक ०४ मधील शासन निर्णयाच्या अनु क्र. ०२ मधील मुद्या क्र. ०१ ते ०८ या अटिच्या अधिन राहुन सदर योजना लागू राहील.

४) संबंधीत कर्मचारी यांनी जुनी निवृत्ती योजना लागु करण्याचा पर्याय हा सदर शासन निर्णय निर्गमित केलेल्या दिनांकापासुन दोन महिन्याच्या आत नियुक्ती प्राधिकारी यांचेकडे सादर करावा.

५) तसेच संबंधीत कर्मचारी यांना जुनी निवृत्ती योजना लागु करण्याचा पर्याय हा सदर शासन निर्णय निर्गमित झाल्याच्या दोन महीन्यानंतर भविष्य निर्वाह निधी खाते उघडुन राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणाली (एन.पी.एस) मधील खाते तात्काळ बंद करावे.

६) संबंधित कर्मचारी यांचे राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणाली (एन.पी.एस) मधील राज्य शासन हिस्सा त्यावरील व्याज रक्कम वगळून उर्वरीत रक्कम त्यांच्या भविष्य निर्वाह निधी खाते मध्ये जमा करावी.

तरी उपरोक्त दिलेल्या शासन निर्णयामध्ये तात्काळ कार्यवाही करुन त्या अनुषंगाने यापुर्वी प्रस्ताव/विकल्प दाखल केले असेल तरी नव्याने सर्व प्रस्ताव या कार्यालयास दिनांक ३१/१०/२०२४ रोजी पर्यत खास दुतामार्फत सादर करावे. विलंब होणार नाही याची कटाक्षाने दक्षता घ्यावी. खालील दिलेला अहवाल हार्ड व सॉफट कॉपीमध्ये सादर करावा.