या अधिकारी/कर्मचारी यांना केंद्र शासनाच्या धर्तीवर जुनी निवृत्तीवेतन योजना लागू करणेबाबत old pension scheme
दिनांक १/११/२००५ पूर्वी पदभरतीची जाहिरात/अधिसूचना निर्गमित झालेल्या तथापि शासन सेवेत दिनांक ०१/११/२००५ रोजी किंवा त्यानंतर रुजू झालेल्या शासकीय अधिकारी/कर्मचारी यांना केंद्र शासनाच्या धर्तीवर जुनी निवृत्तीवेतन योजना लागू करणेबाबत.
प्रस्तावना –वित्त विभागाच्या संदर्भाधीन क्र. १ येथील दिनांक ०२/०२/२०२४ रोजीच्या शासन निर्णयान्वये राज्य शासनाच्या सेवेत जे अधिकारी/कर्मचारी दिनांक ०१/११/२००५ रोजी किंवा त्यानंतर शासन सेवेत नियुक्त करण्यात आले आहेत.
तथापि, त्यांची पदभरतीची जाहिरात/अधिसूचना दिनांक ०१/११/२००५ पूर्वी निर्गमित झालेली आहे. त्यांना महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्तीवेतन) नियम, १९८२. महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्ती वेतनाचे अंशाराशीकरण) नियम १९८४ व सर्वसाधारण भविष्य निर्वाह निधी व अनुषंगिक नियमाच्या तरतुदी लागू करण्यासाठी एक वेतन पर्याय (One Time Option) देणेबाबत निर्णय घेण्यात आला आहे.
या निर्णयानुसार, नियोजन विभागाच्या प्रशासकीय नियंत्रणाखालील श्री. मच्छिंद्र का. भांगे, उपायुक्त (नियोजन) विभागीय आयुक्तांचे कार्यालय, नाशिक यांचा संदर्भाधीन क्र. ५ येथील दिनांक ०५/०२/२०२४ चा अर्ज शासनास प्राप्त झाला आहे.
२ केंद्र शासनाच्या उपरोक्त निर्णयाच्या धर्तीवर, राज्य शासनाच्या सेवेत जे अधिकारी/कर्मचारी दि.०१/११/२००५ रोजी किंवा त्यानंतर शासन सेवेत नियुक्त करण्यात आले आहेत.
तथापि, त्यांची पदभरतीची जाहिरात/अधिसूचना दि.०१/११/२००५ पूर्वी निर्गमित झालेली आहे. अशा राज्य शासकीय अधिकारी/कर्मचारी यांना महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्तीवेतन) नियम, १९८२, महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्तीवेतनाचे अंशराशीकरण) नियम, १९८४ व महारष्ट्र सर्वसाधारण भविष्य निर्वाह निधी नियम, १९९८ व अनुषंगिक नियमाच्या तरतूदी लागू करण्यासाठी एक वेळ पर्याय (One Time Option) संदर्भाधीन क्र.१ येथील शासन निर्णयान्वये देण्यात आलेला आहे.
या निर्णयानुसार नियोजन विभागाच्या प्रशासकीय नियंत्रणाखालील अर्थ व सांख्यिकी संचालनालयातील
श्री. मछिंद्र का. भांगे, उपायुक्त (नियोजन) विभागीय आयुक्तांचे कार्यालय, नाशिक यांनी संदर्भाधीन क्र. ५ नुसार
अर्ज/विकल्प शासनास सादर केला आहे.
३ श्री. मच्छिंद्र का.मांगे यांची प्रथम नियुक्ती दिनांक ६/०९/२००७ रोजीच्या शासन निर्णयान्वये उपसंबालक, गट- अ संवर्गात जिल्हा नियोजन अधिकारी, गडचिरोली या पदावर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने केलेल्या शिफारशीनुसार करण्यात आली.
याबाबतची जाहिरात महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत दिनांक ०८/०३/२००४ रोजी म्हणजेच दिनांक ०९/११/२००५ पूर्वी प्रसिध्द झालेली असल्यामुळे, श्री. मच्छिंद्र का.भांगे हे चित्त विभाग, शासन निर्णय दिनांक ०२/०२/२०२४ मधील तरतुदीनुसार जुनी निवृत्तीवेतन योजना लागू होण्यास पात्र ठरतात.
४. सबब, श्री. मच्छिद्र का. मांगे यांना वित्त विभाग, शासन निर्णय, दिनांक ०२/०२/२०२४ मधील तरतूदीनुसार, महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्तीवेतन) नियम, १९८२, महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्तीवेतनाचे अंशराशीकरण) नियम, १९८४ व महाराष्ट्र सर्वसाधारण भविष्यनिर्वाह निधी नियम, १९९८ व अनुषंगिक नियमाच्या तरतूदी लागू करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. याबाबत पुढीलप्रमाणे शासन आदेश देण्यात येत आहेत:-
शासन आदेश:-
नियोजन विभागाच्या अधिपत्त्याखालील अर्थ च सांख्यिकी संचालनालयाच्या आस्थापनेवरील खालील विवरणपत्रात नमूद करण्यात आलेल्या सहसंचालक, गट-अ या संवर्गातील श्री.म. का. भांगे यांना वित्त विभागाच्या दिनांक ०२/०२/२०२४ रोजीच्या शासन निर्णयातील तरतूदीनुसार, महाराष्ट्र नागरी सेवा सेवा (निवृत्तीवेतन) नियम, १९८२. महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्तीवेतनाचे अंशराशीकरण) नियम, १९८४ व महाराष्ट्र सर्वसाधारण भविष्यनिर्वाह निधी नियम, १९९८ व अनुषंगिक नियमाच्या तरतूदी लागू करण्यात येत आहे:-
. वरील अधिकाऱ्यांनी जुनी निवृत्ती वेतन योजना व अनुषंगिक नियम लागू करण्याचा पर्याय विहित मुदतीत सादर केलेला आहे.
3. वित्त विभाग, शासन निर्णय, दि.०२.०२.२०२४ नुसार, वरील विवरणपत्रात नमूद केलेल्या अधिकाऱ्यांना जुनी निवृत्तीवेतन योजना व अनुषंगिक नियम लागू करण्यात येत असल्यामुळे त्यांचे नव्याने भविष्यनिर्वाह निधी
(GPF) खाते तात्काळ उघडण्यात यावे. तसेच, सदर अधिकाऱ्यांचे राष्ट्रीय निवृत्तिवेतन प्रणाली (NPS) मधील खाते बंद करुन, त्यातील कर्मचाऱ्याच्या हिश्श्याची रक्कम देय / अनुज्ञेय व्याजासह संबंधित कर्मचाऱ्याच्या
नव्याने उघडण्यात आलेल्या भविष्यनिर्वाह निधी खात्यात जमा करावी. ४. तसेच, संबंधित अधिकाऱ्यांच्या राष्ट्रीय निवृत्तिवेतन (NPS) खात्यातील राज्य शासनाच्या हिश्श्याची
रक्कम देय / अनुज्ञेय व्याजासह राज्याच्या एकत्रित निधीत वळती करण्यात यावी.
५. याकरीता संचालक, अर्थ व सांख्यिकी संचालनालय, मुंबई तसेच संबंधित आहरण व संवित्तरण अधिकारी आणि नियंत्रक अधिकारी यांना प्राधिकृत करण्यात येत आहे.
६ सदर शासन आदेश महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०२४०९१११२२३१८३८१६ असा आहे. हा शासन आदेश डिजीटल
स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,