जुनी निवृत्तीवेतन योजना लागू करण्याबाबत old pension scheme 

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

जुनी निवृत्तीवेतन योजना लागू करण्याबाबत old pension scheme 

संदर्भ : १) वित्त विभाग, शासन निर्णय, क्र.संकीर्ण-२०२३/प्र.क्र.४६/सेवा-४, दि.०२/०२/२०२४

२) मुख्य अभियंता, सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभाग, पुणे पत्र क्र.मुअ (पुणे)/आस्था-१/६६२३/२०२४, दि.२५/०७/२०२४

अनुकंपा तत्वावर भरती होणेसाठी संबंधित कर्मचाऱ्यांचे अनुकंपा नियुक्ती मागणीचे अर्ज हे दिनांक ०१/११/२००५ पूर्वीचे असून, त्यांना नियुक्त्या ह्या ५ ते ७ वर्षानंतर म्हणजेच दि.०१/११/२००५ नंतरच मिळालेल्या आहेत असे कर्मचारी वित्त विभागाच्या दि.०२/०२/२०२४ रोजीच्या शासन निर्णयानुसार जुनी निवृत्तीवेतन योजना लागू करण्याबाबत विविध क्षेत्रिय कार्यालयात विनंती अर्ज करीत आहेत व त्यानुषंगाने क्षेत्रिय कार्यालयांकडून शासनाकडे मार्गदर्शन मिळण्याची विनंती करण्यात येत आहे. अशाच प्रकारची मागणीच्या अनुषंगाने प्राप्त झालेल्या प्रस्तावावर वित्त विभागाकडून पुढीलप्रमाणे अभिप्राय प्राप्त झाले आहेतः-

“वित्त विभागाचा दि.०२/०२/२०२४ चा शासन निर्णय दि.०१/११/२००५ पूर्वी ज्या पदाकरिता जाहिरात प्रसिध्द झाली आहे तथापि त्यांची नियुक्ती दि.०१/११/२००५ नंतर झाली आहे या अटीच्या पूर्तता करणाऱ्या शासकीय अधिकारी / कर्मचाऱ्यांना जुनी निवृत्तीवेतन योजना लागू करण्यात आली आहे. अनुकंपा प्रतिक्षा यादीवरील कर्मचाऱ्यांच्याबाबतीत जाहिरात प्रसिध्द होत नाही. जशी पदे उपलब्ध होतात त्याप्रमाणे अनुकंपा यादीतील कर्मचाऱ्यांना नियुक्ती दिली जाते. त्यामुळे दि.०१/११/२००५ पूर्वी शासन विहित अनुकंपा प्रतिक्षा यादीवरील पात्र तथापि दि.०१/११/२००५ नंतर नियुक्त उमेदवारांना सद्यः स्थितीत सदर शासन निर्णयातील तरतूदी लागू होत नाहीत.”

२. वित्त विभागाच्या उपरोक्त अभिप्रायानुसार सदर कर्मचाऱ्यांचे विनंतीचे अनुषंगाने कार्यवाही करण्यात यावी.

Leave a Comment