वर्ग ३ व वर्ग ४ संवर्गातील कर्मचाऱ्यांना केंद्र शासनाच्या धर्तीवर जुनी पेन्शन योजना लागु करणेबाबत old pension scheme 

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

वर्ग ३ व वर्ग ४ संवर्गातील कर्मचाऱ्यांना केंद्र शासनाच्या धर्तीवर जुनी पेन्शन योजना लागु करणेबाबत old pension scheme 

वित्त विभाग शासन निर्णय दिनांक ०२ फेब्रुवारी २०२४ अन्वये दिनांक ०१ नोव्हेंबर २००५ पुर्वीच्या पदभरती जाहिरात / अधिसुचनेनुसार दि. ०१ नोव्हेंबर २००५ रोजी किंवा त्यानंतर अपर आयुक्त कार्यालय नाशिक, ठाणे व अमरावती अंतर्गत नियुक्त सर्व आस्थापनेवरील सर्व पात्र वर्ग ३ व वर्ग ४ संवर्गातील कर्मचाऱ्यांना केंद्र शासनाच्या धर्तीवर जुनी पेन्शन योजना लागु करुन पुढील योग्य ती कार्यवाही होणे बाबत.

संदर्भ : १. शासननिर्णय वित्त विभाग क्र. संकिर्ण. २०२३/प्र.क्र.४६/ सेवा. ४ दिनांक ०२.०२.२०२४ २. आदिवासी विकास विभाग कर्मचारी संघटना यांचे निवेदन दिनांक २५.१०.२०२४. ३. आदिवासी विकास आश्रमशाळा शिक्षक व कर्मचारी संघटना महाराष्ट्र राज्य, (सी.आय.टी.यु. संलग्न) यांचे पत्र क्र. ३३७// २०२४-२५ दिनांक २६.१०.२०२४.

संदर्भिय क्र. २व३ निवेदनांची प्रत या सोबत संलग्न करण्यात येत आहे. उक्त पत्रान्वये वित्त विभाग

शासन निर्णय दिनांक ०२ फेब्रुवारी २०२४ अन्वये दिनांक ०१ नोव्हेंबर २००५ पुर्वीच्या पदभरती जाहिरात /

अधिसुचनेनुसार दि. ०१ नोव्हेंबर २००५ रोजी किंवा त्यानंतर अपर आयुक्त कार्यालय नाशिक, ठाणे व अमरावती

अंतर्गत नियुक्त सर्व आस्थापनेवरील सर्व पात्र वर्ग ३ व वर्ग ४ संवर्गातील कर्मचाऱ्यांना केद्रशासनाच्या धर्तीवर जुनी

पेन्शन योजना लागु करुन त्यास अनुलक्षून योग्य ती कार्यवाही होणे बाबत विनंती केली आहे.

या संदर्भात शासन निर्देशानुसार नियमोचीत कार्यवाही यापुर्वीच होणे क्रमप्राप्त होते, या बाबत अपर आयुक्त कार्यालय नागपुर व्यतिरिक्त कार्यवाही झाली नसल्याचे निर्देशनास येते. याव्दारे आपणांस सुचीत करण्यात येते की, संदर्भाधिन विषयाचे अनुषंगाने आवश्यक कार्यवाही तातडीने करण्यात यावी व केलेल्या कार्यवाहीचा अहवाल सादर करण्यात यावा.

शासन निर्णय येथे पहा Click here