दि.०१.११.२००५ पूर्वी पदभरतीची जाहिरात/अधिसूचना रुजु झालेल्या कर्मचाऱ्यांना केंद्र शासनाच्या धर्तीवर जुनी निवृत्तीवेतन योजना लागू करणेबाबत old penshan scheme for before join 2005
दि.०१.११.२००५ पूर्वी पदभरतीची जाहिरात / अधिसूचना निर्गमित झालेल्या प्रकरणी शासन सेवेत दि.०१.११.२००५ रोजी किंवा त्यानंतर रुजू झालेल्या राज्य शासकीय अधिकारी / कर्मचारी यांना केंद्र शासनाच्या धर्तीवर जुनी निवृत्तीवेतन योजना लागू करणेबाबत.
केंद्र शासनाच्या अधिकारी / कर्मचारी यांची नियुक्ती (Appointed) ज्या पदावर किंवा रिक्त जागेवर करण्यात आली आहे व ज्याची जाहिरात / भरतीची / नियुक्तीची अधिसूचना नवीन निवृत्तीवेतन योजना लागू करण्याच्या अधिसूचनेच्या दिनांकापूर्वी म्हणजेच दि.२२.१२.२००३ पूर्वी निर्गमित झाली आहे व जे दि.०१.०१.२००४ रोजी किंवा त्यानंतर शासन सेवेत दाखल झाले आहेत व ज्यांना नवीन परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना लागू झाली, त्या केंद्र शासनाच्या अधिकारी / कर्मचारी यांना केंद्रीय नागरी सेवा (निवृत्ती) नियम, १९७२ / २०२१ लागू करण्याचा एक वेळ पर्याय (One Time Option) देणेबाबत, केंद्र शासनाच्या निवृत्तीवेतन व निवृत्तीवेतनधारकांचे कल्याण विभागाच्या संदर्भाधिन क्र.२ येथील कार्यालयीन ज्ञापनान्वये निर्णय घेण्यात आला आहे.
२. केंद्र शासनाच्या उपरोक्त निर्णयाच्या धर्तीवर, राज्य शासनाच्या सेवेत जे अधिकारी / कर्मचारी दि.०१.११.२००५ रोजी किंवा त्यानंतर शासन सेवेत नियुक्त करण्यात आले आहेत. तथापि, त्यांची पदभरतीची जाहिरात / अधिसूचना दि.०१.११.२००५ पूर्वी निर्गमित झालेली आहे. अशा राज्य शासकीय अधिकारी / कर्मचारी यांना महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्तिवेतन) नियम, १९८२, महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्तिवेतनाचे अंशराशीकरण) नियम, १९८४ व महाराष्ट्र सर्वसाधारण भविष्य निर्वाह निधी नियम, १९९८ व अनुषंगिक नियमाच्या तरतूदी लागू करण्यासाठी एक वेळ पर्याय (One Time Option) संदर्भाधिन क्र.१ येथील शासन निर्णयान्वये देण्यात आलेला आहे. या निर्णयानुसार, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या प्रशासकीय नियंत्रणाखालील अधीक्षक अभियंता (स्थापत्य) संवर्गातील अधिकाऱ्यांचे अर्ज / विकल्प शासनास प्राप्त झालेले आहेत.
३. सदर अधिकाऱ्यांची नियुक्ती, महाराष्ट्र लोकसेवा आयोग, अधिसूचना क्रमांक ३७४ (१)/एक (१)/२००४/तीन, दि.१५ सप्टेंबर, २००४ अन्वये, महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा परीक्षा-२००४ मध्ये, सरळसेवा भरतीसाठी घेण्यात आलेल्या एकत्रित स्पर्धा परिक्षेच्या जाहिरातीद्वारे करण्यात आली आहे. सदर परीक्षा
शासन आदेश क्रमांका निवेयो-४२२४/प्र.क्र.६५/सेवा-१
शनिवार, दि.०५ फेब्रुवारी, २००५ व रविवार, दि.०६ फेब्रुवारी, २००५ रोजी घेण्यात आली होती. महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा परीक्षा- २००४ च्या मागणीपत्रानुसार, सन २००४ मध्ये सरळसेवा भरतीद्वारे घेण्यात आलेल्या एकत्रित स्पर्धा परीक्षेच्या निकालाच्या आधारे, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने केलेल्या शिफारशीनुसार, उपरोक्त अधिकाऱ्यांना सार्वजनिक बांधकाम विभागात सहायक कार्यकारी अभियंता, गट-अ या पदावर सार्वजनिक बांधकाम विभाग, शासन आदेश क्र. जीएबी-२००७/प्र.क्र.१९४/सेवा-२, दि.१४.०९.२००७ अन्वये नियुक्ती देण्यात आली आहे.
४. सबब, सदर अधिकाऱ्यांना वित्त विभाग, शासन निर्णय, दि.०२.०२.२०२४ मधील तरतूदीनुसार, राष्ट्र नागरी सेवा (निवृत्तिवेतन) नियम, १९८२, महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्तिवेतनाचे अंशराशीकरण) महाराष्ट्र नियम, १९८४ व महाराष्ट्र सर्वसाधारण भविष्यनिर्वाह निधी नियम, १९९८ व अनुषंगिक नियमाच्या तरतूदी लागू करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. याबाबत पुढीलप्रमाणे शासन आदेश देण्यात येत आहेत:-
Christophr Esquea