दि.०१.११.२००५ रोजी किंवा त्यानंतर रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांना जुनी निवृत्ती वेतन योजना लागू करणेबाबत old penshan scheme 

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

दि.०१.११.२००५ रोजी किंवा त्यानंतर रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांना जुनी निवृत्ती वेतन योजना लागू करणेबाबत old penshan scheme 

दि.०१.११.२००५ पूर्वी परभरती जाहिरात/अधिसूचना निर्गमित झालेल्या प्रकरणी शासन सेवेत दि.०१.११.२००५ रोजी किंवा त्यानंतर रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांना जुनी निवृत्ती वेतन योजना लागू करणेबाबत.

संदर्भ:- शासन समक्रमांक पत्र दिनांक ०६.०८.२०२४.

महोदय,

उपरोक्त विषयांकित प्रकरणी संदर्भिय पत्रान्वये वित्त विभागाकडील दि.०२.०२.२०२४ रोजीच्या शासन निर्णयान्वये दि. दि.०१.११.२००५ पूर्वी परभरती जाहिरात/अधिसूचना निर्गमित झालेल्या प्रकरणी शासन सेवेत दि.०१.११.२००५ रोजी किंवा त्यानंतर रुजू झालेल्या अधिकारी/कर्मचारी यांना केंद्र शासनाच्या धर्तीवर जुनी निवृत्ती वेतन योजना लागू करणेसाठी एक वेळ पर्याय देण्याचा निर्णय घेण्यासाठी याप्रकरणी किती कर्मचाऱ्यांना त्याचा लाभ होणार आहे व त्यासाठी शासनावर येणारा आर्थिक भार यासंदभातील माहिती विहित प्रपत्रात मागविण्यात आलेली होती. परंतु सदर माहिती अद्याप अप्राप्त आहे.

२. सदर प्रकरणी मा. उच्च न्यायालय खंडपीठ, नगापूर येथे रिट याचिका क्र.९८२/२०२४ दाखल करण्यात आली आहे. त्यानुषंगाने न्यायालयीन प्रकरणाचे गांभीर्य व कालमर्यादा लक्षात घेता, सदर माहिती विहित प्रपत्रात दि.१३.०८.२०२४ रोजी सायं. ६.०० वा. पर्यंत ई-मेल द्वारे सादर करण्यात यावी, ही विनंती.

Leave a Comment