दि.०१.११.२००५ पूर्वी पदभरती जाहिरात जि.प.अधिकारी/कर्मचारी यांना जुनी निवृत्तीवेतन योजना लागू करण्याबाबत old penshan scheme
दि.०१.११.२००५ पूर्वी पदभरती जाहिरात/अधिसूचना निर्गमित झालेल्या प्रकरणी शासन सेवेत दि.०१.११.२००५ रोजी किंवा त्यानंतर रुजू झालेल्या जिल्हा परिषदेतील अधिकारी/कर्मचारी यांना जुनी निवृत्तीवेतन योजना लागू करण्याबाबत…
वित्त विभागाकडील दि.०२.०२.२०२४ रोजीच्या शासन निर्णयान्वये दि.०१.११.२००५ पूर्वी पदभरती जाहिरात/अधिसूचना निर्गमित झालेल्या प्रकरणी शासन सेवेत दि.०१.११.२००५ रोजी किंवा त्यानंतर रुजू झालेल्या शासकीय अधिकारी/कर्मचारी यांना केंद्र शासनाच्या धर्तीवर जुनी निवृत्ती वेतन योजना जिल्हा परिषदेतील अधिकारी/कर्मचारी यांना लागू करण्याच्या अनुषंगाने वित्त विभागाने खालील मुद्दे उपस्थित केले आहेत. तरी सदरहू मुद्यांची माहिती तात्काळ या विभागास सादर करावी, ही विनंती.
१) जिल्हा परिषदेमधील शिक्षक/शिक्षकेतर व इतर कर्मचाऱ्यांची संख्या किती आहे?
२) जिल्हा परिषदेमधील प्राथमिक शाळांची एकूण संख्या.
३) सदर शाळा कोणाच्या नियंत्रणाखाली आहेत? तसेच जिल्हा परिषदेमधील प्राथमिक शाळा १०० टक्के अनुदानित आहे किंवा कसे?
४) जिल्हा परिषदेमधील शिक्षकांची नियुक्ती कोणामार्फत होते तसेच उपरोक्तपैकी शिक्षक कर्मचाऱ्यांची वेतन व सेवानिवृत्तिवेतन इ. खर्च ग्राम विकास विभागाकडून अदा करण्यात येते किंवा कसे?