एनपीएस कर्मचाऱ्यांनी बिघडविले ‘दलबदलू’ सत्ताधाऱ्यांचे ‘गणित’:१७ लाख कर्मचारी व कुटुंबांचे ‘ओपीएस’ समर्थनार्थ मतदान old penshan scheme 

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

एनपीएस कर्मचाऱ्यांनी बिघडविले ‘दलबदलू’ सत्ताधाऱ्यांचे ‘गणित’:१७ लाख कर्मचारी व कुटुंबांचे ‘ओपीएस’ समर्थनार्थ मतदान old penshan scheme

अहेरीः राज्य सरकारमधील आमदारांचे प्राबल्य असलेल्या मतदारसंघात सुद्धा लोकसभेच्या निवडणुकीत राजकीय ‘कसोटी’ पणाला लावूनही निवडून येण्या इतपत मताधिक्य मिळू शकले नाही. त्याला अनेक कारणांचा मागोवा असला तरी राज्यातील १७ लाख कर्मचारी, त्या प्रत्येकाचे कुटुंब व नातेवाईकांनी जुन्या पेन्शनच्या विरोधात विधानसभेत मतदान करणाऱ्या पक्षाला, आमदारांना व खासदारांना धडा शिकविण्याचा ‘पाठ’ सांगूनच ठेवल्याने लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीत याचा फटका सत्ताधाऱ्यांना बसला असे बोलल्या जात आहे.

जुनी पेन्शन २००५ पासूनच शासकिय जीआर प्रमाणे बंद केली असली तरी त्याची झळ तेव्हा नोकरीवर लागलेल्या व आता सेवानिवृत्त होत असलेल्या कर्मचाऱ्यांना बसत आहे. त्यामुळे सरकारने मागील दहा वर्षात केलेली विकास वधार्मिक संस्कृती विकसित करणारी कामे सराहनीय असली

तरी त्यांच्याच नेत्यांकडून जुनी पेन्शन सरकारला देणे परवडणारे नाही, राज्याची आर्थिक परिस्थिती ढासळेल अशी विधाने करून अप्रत्यक्ष कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन देण्यासाठी विरोध करणाऱ्या सत्ताधाऱ्यांना त्यांची जागा लोकसभेच्या सार्वजनिक निवडणुकीत एनपीएस कर्मचाऱ्यांनी दाखवून दिली आहे.

पुढील विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी किंवा येणाऱ्या महिन्यातील अधिवेशनात जुन्या पेन्शनची घोषणा न केल्यास सत्ता हातातून जाणार हे नक्की असा ठाम बेत एनपीएस कर्मचाऱ्यांनी बांधल्याचे संघटनेच्या माध्यमातून बोलले जाते.

सरकार व नागरिक यांचा दुवा असणाऱ्या नोव्हेंबर २००५ पासून च्या कर्मचाऱ्यांना नवीन पेन्शन योजना सरकारद्वारे उदयास आली तिची झळ कर्मचाऱ्यांना बसल्याने राज्यातील १७ लाख कर्मचाऱ्यांचे सरासरी एका कुटुंबातून तीन मतदार पकडल्यास ५१ लाख कर्मचारी मतदारांनी निवडणुकीत धडा शिकविला असल्याचे बोलल्या जाते.

विधानसभा निवडणुकीतही राहणार मुद्दा

राज्यातील सत्ताधाऱ्यांचे खासदार कमी निवडुन येण्याच्या कारणांमध्ये भ्रष्टाचाऱ्यांची इन्कमिंग, पक्ष फोडीचे

राजकारण, आश्वासनांचा फक्त पाऊस, मतदारांना हलके घेणे असे असले तरी मुख्य कारण म्हणजे बाकी

मतदारांना मत परिवर्तन करू शकणाऱ्या कर्मचाऱ्यांची जुन्या पेन्शनच्या माध्यमातून सत्ताधाऱ्यांनी ओढवून

घेतलेली नाराजी होय. पुढील विधानसभेतही हा मुद्दा अग्रभागी राहणार असल्याचे दिसते.

old penshan scheme
old penshan scheme

1 thought on “एनपीएस कर्मचाऱ्यांनी बिघडविले ‘दलबदलू’ सत्ताधाऱ्यांचे ‘गणित’:१७ लाख कर्मचारी व कुटुंबांचे ‘ओपीएस’ समर्थनार्थ मतदान old penshan scheme ”

Leave a Comment