या कर्मचाऱ्यांसाठी जुनी पेन्शन योजना विकल्प व प्रस्ताव सादर करणे बाबत old penshan scheme
दिनांक ०१.११.२००५ पुर्वी भरती जाहिरात/अधिसुचना निर्गमित झालेल्या प्रकरणी शासन सेवेत दिनांक ०१/११/२००५ रोजी किंवा त्यानंतर रजु झालेल्या शासकिय अधिकारी/कर्मचारी यांना केंद्र शासनाच्या धर्तीवर जुनी निवृत्ती वेतन योजना लागु करणेबाबत….
संदर्भः- महाराष्ट्र शासन, वित्त विभाग, शासन निर्णय क्रमांक संकिर्ण-२०२३/ प्र.क्र.४६/सेवा-४/ मंत्रालय, मुंबई ४०० ०३२ दिनांक २ फेब्रुवारी २०२४
उपरोक्त विषयान्वये सुचित करण्यात येते की, संदर्भीय शासन निर्णयान्वये, दिनांक ०१.११.२००५ पूर्वी भरती जाहिरात/अधिसुचना निर्गमित झालेल्या प्रकरणी शासन सेवेत दिनांक ०१/११/२००५ रोजी किंवा त्यानंतर रजु झालेल्या शासकिय अधिकारी/कर्मचारी यांना केंद्र शासनाच्या धर्तीवर जुनी निवृत्ती वेतन योजना लागु करणेत आली आहे. संबधित अधिकारी/कर्मचारी यांनी जुनी निवृत्ती वेतन व अनुषंगिक नियम लागु करण्याचा पर्याय हा सदर शासन निर्णय निर्गमित केल्याचा दिनांकापासुन ६ महिन्याच्या कालावधीत देणे बंधनकारक आहे. तसेच जे राज्य शासकिय अधिकारी / कर्मचारी ६ महिन्याच्या कालावधीत जुनी निवृत्ती वेतन योजना लागु करण्याचा पर्याय देणार नाहीत. त्यांना राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणाली (NPS) लागु राहील.
सदर शासन निर्णयाचे अनुषंगाने आपले अधिनस्त कार्यक्षेत्रात असलेले राष्ट्रीय निवृत्ती वेतन (NPS) लागू असलेले कर्मचारी यांनी जुनी पेन्शन योजना लागु करण्याचा पर्याय दिलेला असेल अशा कर्मचारी यांचे प्रस्तावा समवेत खालीलप्रमाणे कागदपत्रांची पुर्तता करण्यात येऊन तसा प्रस्ताव तात्काळ या कार्यालयास सादर करण्यात यावेत. १) जुनी पेन्शन योजना लागु करण्याबाबतचा विनंती अर्ज २) विकल्प अर्ज ३) जि.प. जाहिरीतीची छायांकित प्रत ४) प्रथम नियुक्ती आदेश छायांकित प्रत ५) शाळा प्राप्त / रुजु आदेश छायांकित प्रत ६) सेवा पुस्तकातील पहिल्या पानाची छायांकित प्रत ७) NPS खाते क्रमांक छायांकित प्रत.
सोबत – संदर्भीय शासन निर्णयाची प्रत.