सन २०२४-२५ च्या ऑफलाईन संच मान्यते बाबत offline sanchmanyata
अंशतः अनुदानित तुकडया/शाखा असलेल्या उमावि / कमवि ची सन २०२४-२५ च्या ऑफलाईन संच मान्यते बाबत.
संदर्भ: शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांचे शासन निर्णय दि.१४.१०.२०२४
उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने आपणास कळविण्यात येते की, लातूर विभागातील उमावि कर्माव तील शैक्षणिक वर्ष २०२४-२५ साठी अंशतः अनुदानित तुकडया/शाखा असलेल्या कमयि उमवि पांचे शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्यासह ऑफलाईन संच मान्यता शिबीर खालील वेळापत्रका प्रमाणे आयोजित करण्यात आलेले आहे. प्राचार्य/मु.अ. यांनी शिबीरामध्ये उपस्थित राहुन २०२४-२५ ची ऑफलाईन संच मान्यता करून घ्यावी. संच मान्यता प्रपत्र अ मध्ये मागील शैक्षणिक वर्ष २०२२-२३ व २०२३-२४ मधील मंजूर पदे नमूद करुन प्रारुप सादर करावे. तसेच
प्रपत्र ‘अ’ ‘ब’ ‘क’ व कांही नवीन प्रपत्र संबंधित कार्यालयाकडून प्राप्त करुन घ्यावेत. संच मान्यता प्रत डिसेंबर २०२४ च्या वेतनदेयका सोबत सादर करणे अनिवार्य आहे. शिक्षण उपसंचालक
कार्यालयामध्ये कोणीही संच मान्यतेसाठी प्रस्ताव सादर करु नये, याउपरही प्रस्ताव सादर केल्यास ते स्विकारले जाणार नाहीत. सदर शिबीरात ज्या मु.अ./प्राचार्य यांनी संच मान्यता करुन घेतली नाही. व वाढीव अनुदान टप्पा पासून कर्मचारी वंचित राहील्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित मु.अ./प्राचार्य यांची राहिल. तसेच सन २०२४- २५ ची संचमान्यता न केल्यास आपल्या उमावि कमवि चे माहे डिसेंबर २०२४ पासूनचे वेतन थांबविण्यात येईल याची नोंद घ्यावी.
टिप :- प्रपत्र अ खालील डाव्या बाजूस उपलब्ध अभिलेख्यानुसार प्रारूप सादर असे लिहून खाली मू.अ./ प्राचार्य यांनी उमावि कमविच्या शिक्कयासह स्वाक्षरी करावी. प्रपत्र व च्या प्रत्येक पेजवर डाव्या बाजूस मु.अ./ प्राचार्य यांनी उमावि/कमविच्या शिक्कयासह स्वाक्षरी करावी. संच मान्यतेस येताना सोबत जोडलेल्या अनुक्रमणिकेप्रमाणे कागदपत्रे व विहित प्रपत्रामध्ये माहिती भरुन सोबत
आणावी. प्रस्तावाची संपूर्ण फाईल शिबीरामध्ये सादर करावी.
१. फक्त टप्पा वाढ़ अनुज्ञेय असणान्या उमावि / कमवि यांनीच उपरोक्त तारखेस संथ सादर करावेत. २. सन २०२४-२५ साठीचा वैध आधार विद्यार्थी संख्या तक्ता सरल गोषवाऱ्यासह मुअ/प्राचार्य यांनी
सांक्षाकित करून सादर करावा.
३. सर्वांनी सुधारित संच मान्यतेचे प्रपत्र अ व ब वापरावे.
४. प्रपत्र व मध्ये विषयानुसार पदसंख्येसमोर वैयक्तिक मान्यता/सेवासातत्य असलेल्या कार्यरत शिक्षकांचे नाये लिहावीत. वैयक्तिक मान्यता / सेवासातत्य न मिळालेल्या किंवा मान्यतेसाठी प्रस्ताव सादर फेलेल्या सहशिक्षकाचे नाय लिहू नये. असे पद रिक्त पद म्हणून नमूद करावे.
५. सन २०१८-१९ च्या संथाप्रमाणे असलेली पदे ही पायाभूत पदे मानलेली असल्यामुळे त्यापेक्षा जास्तीची पदे संचामध्ये दर्शवू नये. प्रपत्र व मध्ये सन २०२४-२५ ची विद्यार्थी संख्या, विषय निहाय दर्शवून कार्यभार काढावा. मात्र पदसंख्येमध्ये बदल करु नये. सन २०२३-२४ च्या संच मध्ये मंजूर असलेली पदे नमूद करावीत.
६. सन २०१८-१९. सन २०२२-२३ व सन २०२३-२४ चा यापूर्वी प्रमाणित केलेला संच सादर करावा. संच मान्यतेस येताना प्रस्तावातील कागदपत्रे व विहित प्रपत्रे व्यतिरिक्त खालील प्रपत्राच्या जादा प्रती स्वतंत्रपणे दयाव्यात.
१. उमावि/कमवि ची माहिती प्रपत्र.
२. उमावि कमयि तौल एकूण प्रवेशित विद्यार्थी संख्या गोषवारा तक्ता.
३. उमावि/कमवितील एकूण कर्मचारी संख्या गोषवारा
. रिक्त पदाचा तपशील ४
६. अनुदानित मध्ये कायम विना अनुदान तत्वावर चालू असलेल्या विषयाची माहिती. ७. वैध विद्यार्थी संख्या स्टूडेंट पोर्टल अहवाल.
५. अतिरिक्त ठरलेल्या शिक्षक/शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची माहिती.
८. मागील वर्षात पवित्र प्रणालीद्वारे शिक्षकांची नियुकती झाली असल्यास तशी नोंद संबंधित शिक्षकांच्या नावासमोर करावी व पुरावा जोडावा.