कर्मचा-यांना राज्य शासनाची “सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना” तसेच केंद्र शासनाची “एकीकृत निवृत्ती योजना” (UPS) लागू करणेबाबत nps ups pension scheme
राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणाली लागू असलेल्या कर्मचा-यांना राज्य शासनाची “सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना” तसेच केंद्र शासनाची “एकीकृत निवृत्ती योजना” (UPS) लागू करणेबाबत.
संदर्भ :- १) वित्त विभाग शासन निर्णय क्र. संनिवे-२०२४/प्र.क्र.५४/सेवा-४ दि. २० सप्टेंबर, २०२४.
२) अवर सचिव, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग मंत्रालय, मुंबई यांचे पत्र क्र. सेनिवे-२०२५/प्र.क्र.१२/टिएनटी-६, दि. २५ फेब्रुवारी, २०२५ रोजीचे पत्र.
३) मा. आयुक्त (शिक्षण) कार्यालयाचे क्र. शिआका/लेखा-१६६/एनपीएस तसेच युपीएस /
२०२५/१२३९ दि. १३ मार्च, २०२५.
उपरोक्त विषयाबाबत संदर्भ क्र. १ ते ३ अन्वये आपणास कळविण्यात येते की, वित्त विभागाने संदर्भ क्र. १ शासन निर्णय निर्गमित केला आहे. संदर्भ क्र. २ व ३ नुसार शासनाने व मा. आयुक्त (शिक्षण) कार्यालयाने कळविल्याप्रमाणे सदर शासन निर्णयात नमूद केल्याप्रमाणे पुढीलप्रमाणे कार्यवाही अपेक्षित आहे.
“राज्यशासनाच्या सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेमध्ये सहभागी होण्यासाठीचा द्यावयाचा एक वेळेचा (One Time Password) विकल्प दिनांक ३१/०३/२०२५ पर्यंत संबंधित कार्यालय प्रमुख/विभाग प्रमुख यांचेकडे सादर करावा.”
संदर्भ क्र. १ च्या संदर्भात सदर शासन निर्णय लागू असलेल्या आपल्या अधिनस्त शिक्षक व शिक्षकेतर कर्मचा-यांच्या बाबतीत नियमोचित कार्यवाही आपल्या स्तरावरून होणे आवश्यक आहे. त्यानुसार उपरोक्त संदर्भ क्र. २ अन्वये शासनाने विचारणा केल्यानुसार संदर्भ क्र. १ शासन निर्णयामध्ये नमूद केल्याप्रमाणे सदर शासन निर्णय लागू असलेल्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे बाबतीत कार्यवाही करावी व केलेल्या कार्यवाहीचा अहवाल दिनांक २५/०३/२०२५ पूर्वी संचालनालयास सादर करावा.
मा. शिक्षण संचालक यांचे मान्यतेने.
सोबतः वरीलप्रमाणे