NPS धारक कर्मचाऱ्यांना अर्जित रजा रोखीकरण संदर्भात वित्त विभागचे शासन परिपत्रक निर्गमित NPS holder employes arjit leave
नवीन परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजनेचे सभासद सेवानिवृत्त/राजीनामा/नोकरी सोडल्यास/निधन झाल्यास महाराष्ट्र नागरी सेवा (रजा) (सुधारणा) नियम, २०१६ मधील तरतुदीनुसार अर्जित रजा रोखीकरण अनुज्ञेय करण्याबाबत.
संदर्भ :
१) आपले दिनांक २९ मार्च २०२३ चे पत्र.
२) शासन निर्णय, वित्त विभाग, दिनांक ३१ ऑक्टोबर २००५.
महादय,
उपरोक्त संदर्भाधिन पत्रान्वये. दिनांक ०१ नोव्हेंबर २००५ रोजी व त्यानंतर शासन सेवेत नियुक्त झालेल्या व विहीत मार्गाने सेवा समाप्त (नियत वयोमान सेवानिवृत्ती/ मृत्यू इ.) झालेल्या राज्य शासकीय कर्मचा-यांच्या अर्जित रजा राखीकरणाबाबत शासन स्तरावरुन उचित आदेश होण्याबाबत विनंती करण्यात आली आहे.
२. याबाबत नमूद करण्यात येते की, संदर्भ क्र.२ येथे नमूद शासन निर्णयातील परिच्छेद ५ (ब) येथे स्पष्टपणे नमूद केले आहे की, “१ नोव्हेंबर २००५ रोजी किंवा त्यानंतर शासकीय सेवेत नियुक्ती होणाऱ्या कर्मचा-यांना नवोन “परिभाषित अंशदान निवृत्तिवेतन योजना’ लागू ठरेल. मात्र, सध्या अस्तित्त्वात असलेली निवृत्तिवेतन योजना (म्हणजे महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्तिवेतन) नियम, १९८२ व महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्तिवेतनाचे अंशराशीकरण) नियम,
१९८४) आणि सध्या अस्तित्त्वात असलेली सर्वसाधारण भविष्य निर्वाह निधी योजना त्यांना लागू होणार नाही.”
१ नोव्हेंबर २००५ रोजी किंवा त्यानंतर शासकीय सेवेत नियुक्तो होणा-या कर्मचा-यांना महाराष्ट्र नागरी सेवा (रजा) नियम, १९८१ लागू होणार नसल्याबाबत कोणतेही आदेश निर्गमित करण्यात आलेले नाहीत. त्यामुळ पदर कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र नागरी सेवा (रजा) नियम, १९८१ हे जसेच्या तसे लागू आहेत, याची कृपया नोंद घ्यावी