शिष्यवृत्ती योजना परीक्षा (NMMS) २०२४-२५ इ. ८ वी साठी परीक्षा दि.२२ डिसेंबर २०२४ प्रसिध्दी निवेदनाबाबत nmms prashiddhi nivedan

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

शिष्यवृत्ती योजना परीक्षा (NMMS) २०२४-२५ इ. ८ वी साठी परीक्षा दि.२२ डिसेंबर २०२४ प्रसिध्दी निवेदनाबाबत nmms prashiddhi nivedan

राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा (NMMS) २०२४-२५ इ. ८ वी साठी परीक्षा दि. २२ डिसेंबर २०२४ प्रसिध्दी निवेदनाबाबत.

संदर्भ :- १) या कार्यालयाचे जा.क्र. मरापप/NMMS/इ.८वी/२०२४-२५/४३९६ दि. ०४.१०.२०२४ रोजीची अधिसूचना.

२) या कार्यालयाचे जा.क्र. मरापप/NMMS/इ.८ वी/२०२४-२५/४३९७ दि. ०४.१०.२०२४ रोजीचे प्रसिध्दी निवेदन.

महोदय,

उपरोक्त संदर्भ क्र. (१) व (२) अन्वये राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा (NMMS) २०२४-२५ या परीक्षेची ऑनलाईन शाळा नोंदणी व विद्यार्थ्यांची आवेदनपत्रे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या https://www.mscepune.in व https://mscenmms.in या संकेतस्थळावर भरण्याच्या वेळापत्रकात मुदतवाढ देण्यात येत आहे.

याबाबतचे जाहीर प्रकटनाची प्रत सोबत जोडलेली आहे. महाराष्ट्रातील सर्व वर्तमानपत्रे, आकाशवाणी व दूरदर्शनवरुन या परीक्षेच्या जाहीर प्रकटनास विनामूल्य प्रसिध्दी देण्यात यावी अशी विनंती आहे.

प्रसिद्धीपत्र निवेदन