NSP 2.0 पोर्टलवरील एन.एम.एम.एस मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्तीचे अर्ज ऑनलाईन भरणेबाबत nmms exam online application
NSP 2.0 पोर्टलवरील एन. एम. एम.एस व दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी असलेली मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्तीचे अर्ज ऑनलाईन भरणेबाबत.
संदर्भ : १. केंद्रशासन स्तरावरुन वेळोवेळी प्राप्त निर्देश.
२. शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांचा दिनांक ३०/०६/२०२४ रोजीचा ई-मेल.
३. संचालनालवाने वेळोवेळी व्हि.सी द्वारे दिलेल्या सूचना.
शैक्षणिक वर्ष २०२४-२५ साठी NSP 2.0 पोर्टलवर एन.एम.एम.एस व दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी असलेली मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्तीसाठीचे नवीन व नुतनीकरण अर्ज ऑनलाईन पध्दतीने भरणे दिनांक ३०/०६/२०२४ पासून सुरु झाले असून एन.एम.एम.एस व दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी असलेली मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्तीसाठीचे नवीन व नुतनीकरण अर्ज भरण्याची अंतिम दिनांक ३०/०९/२०२४ आहे. एन.एम.एम.एस व दिव्यांग विद्याथ्यर्थ्यांसाठी असलेली मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्तीसाठीचे नवीन व नुतनीकरण अर्ज शाळा स्तर अर्ज पडताळणी अंतिम दिनांक १५/१०/२०२४, जिल्हा स्तर अर्ज पडताळणी अंतिम दिनांक ३१/१०/२०२४.
एन.एम.एम.एस मध्ये सन २०२३-२४ मध्ये परीक्षेद्वारे निवड झालेल्या विद्यार्थ्यांची (इयत्ता ९वी) नवीन मधून अर्ज आधार नुसार भरणे आवश्यक आहे. तसेच इयत्ता १०वी, ११वी व १२वी मधील विद्याच्यांनी नुतनीकरण मधून भरणे आवश्यक आहे. महाराष्ट्र राज्यामध्ये नवीन मध्ये ११,६८२ विद्यार्थी पात्र आहेत तर नुतनीकरण मध्ये २८,८६८ विद्यार्थी पात्र आहेत. तसेच दिव्यांग विद्याथ्यांसाठी असलेली मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्तीमधील नुतनीकरण मध्ये ५२४ विद्यार्थी पात्र आहेत.
NMMS मधील नवीन अर्ज सादर करणाऱ्या विद्यार्थ्यांची माहिती आधारनुसार नसल्यास तसेच ज्या विद्याच्यर्थ्यांनी शाळा बदलली आहे व चालु वर्षी १०वी व १२वी मध्ये शिक्षण घेत आहे, तसेच नुतनीकरण मधील ज्या विद्यार्थ्यांचे अर्ज डिफेक्ट झाल्यामुळे शाळेच्या नावामध्ये बदल करता येत नाही अशा विद्यार्थ्यांची माहिती विहीत नमुन्यात विहीत कालावधीत दुरुस्तीसाठी पाठविण्यात यावी.
सर्व पात्र विद्याथ्यांचे अर्ज ऑनलाईन NSP 2.0 पोर्टलवर भरणे आवश्यक आहे. विहित मुदतीपूर्वी शाळा व जिल्हा स्तरावरुन नबीन व नुतनीकरण अजर्जाची पडताळणी करण्यात यावी. डिफेक्ट केलेले अर्ज आवश्यक ती दुरुस्ती करुन मुदतीपूर्वी ऑनलाईन भरुन पडताळणी पूर्ण करण्यात यावी, दिनांक ०५/०९/२०२४ रोजीची नवीन व नुतनीकरणाची सद्यस्थिती सोबत जोडण्यात आलेली आहे. (परिशिष्ट १ ते ४)
नवीन व नुतनीकरणामधील विद्यार्थी सध्या शिकत असलेल्या शाळांमध्ये आपल्या जिल्ह्याद्वारे व्यापक प्रसिध्दी देण्यात यावी. जेणे करुन नवीन व नूतनीकरणमधील विद्यार्थी NSP 2.0 पोर्टलवर स्वतःची नोंदणी करतील. विहीत कालावधीमध्ये नवीन व नुतनीकरणाचे अर्ज ऑनलाईन NSP 2.0 पोर्टलवर भरणे व पडताळणी करणे याबाबत आपल्या स्तरावरुन संबंधित गटशिक्षणाधिकारी / शाळा यांना सूचना देण्यात याव्यात व Timeline चे काटेकोरपणे पालन करण्यात यावे. पात्र विद्यार्थी शिष्यवृत्तीच्या लाभापासून वंचित राहिल्यास संबंधितांवर जबाबदारी निश्चित करण्यात येईल.