NMMS परीक्षा दि.२२ डिसेंबर,२०२४ ची शिष्यवृत्तीसाठी पात्र झालेल्या विद्यार्थ्यांची निवड यादी जाहीर nmms exam merits list declared
NMMS परीक्षा दिनांक 22 डिसेंबर 2024 ची शिष्यवृत्तीसाठी पात्र झालेल्या विद्यार्थ्यांची निवड यादी जाहीर झालेली आहे निवड यादी पाण्यासाठी खालील लिंक वर जाऊन निवड यादी पाहू शकता खालील वेबसाईटला क्लिक करून गुणवत्ता यादी पहा 👇
👉https://2025.mscenmms.in/school/login
गुणवत्ता यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा Click here
प्रसिध्दी निवेदन
राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा (NMMS) २०२४-२५ इ.८ वी साठी परीक्षा दिनांक २२ डिसेंबर, २०२४ ची शिष्यवृत्तीसाठी पात्र झालेल्या विद्यार्थ्यांची निवडयादीबाबत.
सन २००७-०८ पासून राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा (NMMS) ही मिनिस्ट्री ऑफ ह्युमन रिसोर्सेस भारत सरकार नवी दिल्ली यांचे मार्फत राबविली जात आहे. आर्थिक मागास विद्यार्थ्यांमधून प्रज्ञावान विद्यार्थ्यांचा शोध घेऊन त्यांच्या प्रज्ञेची जोपासना, तसेच त्यांचे १२ वी पर्यंत शिक्षण पूर्ण व्हावे हा या योजनेचा हेतू आहे. प्रज्ञावान विद्यार्थ्यांना दरमहा शिष्यवत्तीच्या स्वरुपात आर्थिक मदत करण्यात येते. सदर शिष्यवृत्ती इ. ९ वी ते १२ वी पर्यंत (चार वर्षांसाठी) मिळते. सन २०१७-१८ पासून शिष्यवृत्तीचा दर दरमहा रु.१०००/-आहे (वार्षिक रु.१२,०००/-).
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांचे मार्फत दि. २२ डिसेंबर, २०२४ रोजी घेण्यात आलेल्या राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षेची (NMMS) विद्यार्थ्यांना प्राप्त गुणांची यादी दि. ०७/०२/२०२५ रोजी परिषदेच्या संकेतस्थळावर जाहीर करण्यात आली होती. विद्यार्थ्यांना /पालकांना शाळेमार्फत जात, दिव्यांगत्व, जन्म दिनांक इ. बाबतची दुरुस्ती असल्यास दि. १८/०२/२०२५ पर्यंत परिषदेकडे ऑनलाईन पाठविणेबाबत सूचना देण्यात आलेल्या होत्या. विद्यार्थ्यांनी पालकांनी शाळेमार्फत पाठविलेल्या दुरुस्त्यांचा विचार करुन शिष्यवृत्तीसाठी पात्र झालेल्या विद्यार्थ्यांची निवडयादी मंगळवार, दिनांक ०१/०४/२०२५ रोजी जाहीर करण्यात येत आहे.
दिनांक २२ डिसेंबर, २०२४ रोजी घेण्यात आलेल्या NMMS परीक्षसाठी २४८७५८ विद्यार्थी नोंदविण्यात आले होते. NMMS परीक्षेसाठी महाराष्ट्र राज्यासाठी ११६८२ शिष्यवृत्ती कोटा शिक्षण मंत्रालय (MoE), नवी दिल्ली यांचेकडून निश्चित केलेला आहे. महाराष्ट्र राज्याच्या आरक्षणानुसार संबंधित संवर्गातील विद्यार्थ्यांची निवड करण्यात येते. तसेच संबंधित संवर्गात दिव्यांगांसाठी ४% आरक्षण समाविष्ट आहे. सर्व जिल्हयांसाठी स्वतंत्रपणे इ. ७ वी व ८ वी ची विद्यार्थी संख्या व १२ ते १४ वयोगटातील संख्येच्या आधारे जिल्हयानिहाय कोटा निश्चित करण्यात आलेला आहे. सदरची निवडयादी व गुणयादी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या www.mscepune.in व https://mscenmms.in/ या संकेतस्थळावर मंगळवार, दिनांक ०१/०४/२०२५ रोजी पासून पाहता येईल.
> सदर परीक्षेचा निकाल व निवडयादी फक्त परिषदेच्या संकेतस्थळावरच उपलब्ध करुन दिली जाते, जिल्ह्यांनी, शाळांनी व विद्यार्थ्यांनी सदरचा निकाल परिषदेच्या संकेतस्थळावरुनच काढून घ्यावयाचा आहे.
> शिष्यवृत्तीसाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती वितरणाचे काम शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षणाधिकारी (माध्य.) व मा. शिक्षण संचालक (योजना) यांचेमार्फत केले जाते.