NMMS परीक्षा इ.8वी अंतरिम उत्तरसूची अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात करण्यात आली आहे nmms exam final answer key 

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

NMMS परीक्षा इ.8वी अंतरिम उत्तरसूची अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात करण्यात आली आहे nmms exam final answer key 

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदमार्फत दिनांक २२ डिसेंबर, २०२४ रोजी इ. ८ वी साठी घेण्यात आलेल्या राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना (NMMS) परीक्षेची अंतिम उत्तरसूची परिषदेच्या https://www.mscepune.in/https://2025.mscenmms.in/ या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येत आहे.

सदर परीक्षेच्या MAT व SAT विषयाच्या पेपरच्या प्रश्नपत्रिकेतील कोणत्याही प्रश्नाबाबत किंवा पर्यायी उत्तराबाबत त्रुटी आक्षेपबाबतचे ऑनलाईन निवेदन दि. ०८/०१/२०२५ अखेरपर्यंत पाठविण्याबाबत दिनांक ०१/०१/२०२५ रोजीच्या प्रसिध्दी निवेदनाद्वारे कळविण्यात आले होते. विहित मुदतीत प्राप्त झालेल्या ऑनलाईन निवेदनांवर विषयतज्ज्ञांचे अभिप्राय घेऊन अंतिम उत्तरसूची प्रसिध्द करण्यात येत आहे. या अंतिम उत्तरसूचीबाबत कोणतेही निवेदन/आक्षेप स्विकारले जाणार नाहीत, तसेच सदर परीक्षेसाठी गुणपडताळणी केली जात नाही याची मुख्याध्यापकांनी, पालकांनी व विद्याथ्यांनी नोंद घ्यावी.

या अंतिम उत्तरसूचीनुसार राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा (NMMS) निकाल यथावकाश परिषदेच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येईल.