STARS योजनेंतर्गत सन २०२४-२५ साठी नियतकालीक मूल्यांकन चाचण्यांसाठी निधी उपलब्ध करुन देण्याबाबत niyatkalik mulyankan chachni
वाचा:-१) शालेय शिक्षण व क्रिडा विभाग शासन निर्णय क्र. संकीर्ण २०१९/प्र.क्र.४९/एसडी-६, दि.११.०२.२०२१
२) शालेय शिक्षण व क्रिडा विभाग शासन निर्णय क्र. निमूचा २०२३/प्र.क्र.८८/एसडी-६, दि.०४.१०.२०२३
३) STARS प्रकल्पांतर्गत मंजूर PAB मिटींगचे इतिवृत्त, एप्रिल, २०२४
४) राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, पुणे यांचे पत्र क्र.रा.शै.सं.प्र.म./मूल्यमापन/PAT निधी मागणी/२०२४-२५/०१४२९, दि.१२.०३.२०२५
५) वित्त विभागाचे परिपत्रक क्र. अर्थसं-२०२४/प्र.क्र.८०/अर्थ-३, दि.१७.०३.२०२५
प्रस्तावना :-
जागतिक बँकेद्वारे अर्थसहाय्य केला जाणाऱ्या राज्यातील शिक्षण पध्दतीचे अध्यापन, अध्ययन व परिणाम यांचे बळकटीकरण (STARS) ही केंद्र पुरस्कृत योजना राज्यात सन २०२१-२२ पासून राबविण्यात येत आहे. संदर्भ क्र.३ नूसार STARS प्रकल्पांतर्गत SIG-२ (IMPROVMENT LEARNING ASSEMENT) २.२ A या हेड मधील ४६११.०१ या मंजूर नियतकालिक मूल्यांकन चाचणी (PAT) अंतर्गत निधीतून सन २०२४-२५ या कालावधीत तीन चाचण्या आयोजित करण्याबाबत सूचित करण्यात आले होते. या लेखाशिर्षांतर्गत सदर पायाभूत चाचणी व संकलित चाचणी १ पूर्ण झाली आहे.
यापूर्वी इयत्ता तिसरी ते आठवी या इयत्तांमधील शासकीय व खाजगी अनुदानित शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी प्रश्नपत्रिका छपाई व वितरण केले जात होते. सन २०२४-२५ मध्ये इयत्ता नववीचा समावेश केला गेला आहे. इयत्ता नववी मध्ये गणित विषयाचे भाग १ व भाग २ असे दोन वेगवेगळ्या प्रश्नपत्रिका छापल्या गेल्या. यामुळे इयत्ता नववीची वाढलेली विद्यार्थी संख्या तसेच वाढलेला विषय व प्रश्नपत्रिकेच्या पानांची संख्या यामुळे कागद खरेदी, छपाई व वजन वाढल्यामुळे वाहतूक खर्चामध्ये वाढ झाली. सबब मंजूर असलेली तरतूद कमी पडत आहे. PAT-३ साठी रु.१०११.०१ लक्ष एवढी रक्कम अपेक्षित आहे. त्यास मान्यता देण्याबाबतचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता.
शासन निर्णय :-
संकलित चाचणी २ (PAT-३) करिता रु.१०,११,०१,०००/- (अक्षरी रु. दहा कोटी अकरा लक्ष एक हजार) इतका निधी STARS या योजनेच्या राज्य हिस्यातून वितरीत करण्यास याद्वारे मान्यता देण्यात येत आहे.
२. सदर खर्च मागणी क्रमांक ई-०२, २२०२, सर्वसाधारण शिक्षण, ०१, प्राथमिक शिक्षण, १०६, शिक्षण आणि इतर सेवा, (००) (०३) जागतीक बँकेद्वारे अर्थसहाय्य केल्या जाणाऱ्या राज्यातील शिक्षण पध्दतीचे अध्यापन, अध्ययन व परिणाम यांचे बळकटीकरण (राज्य हिस्सा ४०%) (कार्यक्रम) (२२०२ जे ०१८) ३१-सहायक अनुदाने (वेतनेतर) या लेखाशिर्षाखाली सन २०२४-२५ या वित्तीय वर्षामध्ये उपलब्ध असलेल्या अर्थसंकल्पीय तरतूदीतून भागविण्यात यावा.
३. यासाठी सह / उप सचिव, शालेय शिक्षण क्रिडा विभाग, मंत्रालय, मुंबई यांना नियंत्रक अधिकारी व अवर सचिव/ कक्ष अधिकारी (रोख/लेखा शाखा), शालेय शिक्षण व क्रिडा विभाग, मंत्रालय, मुंबई यांना आहरण व संवितरण अधिकारी तर म्हणून घोषित करण्यात येत आहे. सदर निधी कोषागारातून आहरीत करुन राज्य प्रकल्प संचालक, महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद यांच्या अधिनस्थ संबंधित SNA खात्यात जमा करावा. राज्य प्रकल्प संचालक, महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद यांनी सदर निधी संचालक, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, पुणे यांना वर्ग करण्यात यावा.
४. आहे. वित्त विभागाच्या शासन परिपत्रक दि.१७.०३.२०२५ मध्ये नमूद केलेल्या सर्व अटींची पूर्तता होत
५. सदर शासन निर्णय नियोजन विभागाने अनौपचारी संदर्भ क्र. २२५/१४७१ दि.२०.०३.२०२५व वित्त विभागाने अनौपचारी संदर्भ क्र.४८७/व्यय-५ दि.२६.०३.२०२५ अन्वये दिलेल्या सहमतीनुसार निर्गमित करण्यात येत आहे.
११. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून, त्याचा संकेतांक २०२५०३२९१२४३२३२७२१ असा आहे. सदर शासन निर्णय डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,