निरोप समारंभ जबरदस्त मराठी सूत्रसंचालन nirop samarambha sutrasanchalan
स्वागतम…….स्वागतम…….स्वागतम
निरोपाचा क्षण नाही; शुभेच्छांचा सण आहे पाऊल बाहेर पडताना रेंगाळणारं मन आहे !’
निरोपाच्या क्षणी एका डोळ्यात हासु अन् दुस-यात आसु मन नितळ नितांत आठवणीत आम्ही जातो मम ग्रहासी देवा निरोप द्यावा सख्याहारी ॥
मी………………..सर्व प्रथम आपणा सर्वांचे स्वागत करतो व आजच्या कार्यक्रमास सुरवात करतो
‘निरोप समारंभ म्हणजे क्षणोक्षणी डोळ्यांच्या कडा ओलावणारा प्रसंग.
निरोप समारंभआपल्याकडे आलेला पाहुणा परत जायला निघतो तेव्हा आपण त्याला निरोप देणे आणि त्याने आपला निरोप घेणे हा केवळ शिष्टाचार नसतो. तो आमच्या संस्कृतीचा सहज, आवश्यक आविष्कार असतो निरोप देण्याचा कार्यक्रम आपण आपल्या परीने भावपूर्ण असतोच निरोपाच्या वेळी नुसतं उदास व्हायचं नसतं तर थोडं हसायच सुद्धा असतं.जरी डोळ्यात पाणी येत असलं तरी ते गालावर आणायच नसत. निरोपाच्या वेळी असे गुंतवायचे नसतात हातात हात केवळ स्पर्श सांभाळायचा असतो मखमली हृदयात गेलेले काही सुखाचे क्षण घालीत असतात मधुन साद मात्र आपण दयायचा नसतो प्रतिसाद. निरोपाच्या वेळी फक्त एकच करायचं असतं, दुस-याच्या डोळ्यातलं पाणी आपल्या डोळ्यात घ्यायचं असतं.
स्थानापन्न करणे
नाजूक पाकळ्या किती सुंदर असतात रंगीत कळ्या रोजच उमलत असतात नजरेत भरणारी सर्वच असतात पण हृयात राहणारी तुमच्यासारखी माणसं फारच कमी असतात आणि तुम्ही अध्यक्ष म्हणून लाभलात हे आमचं भाग्य श्री………………… हे
कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान स्विकारतील अशी मी त्यांना विनंती करतो
कार्यक्रमाचे अध्यक्ष :-………
अध्ययनरुपी संस्कार घेतल्यावर स्पर्धेच्या युगाची यशस्वी सुरुवात करण्यासाठी व अन्यायाचा प्रतिकार करण्याच बळ आपल्याला लाभण्यासाठी आपल्याकडून नेहमी सत्कर्म घडण्यासाठी जेष्ठांचे नेहमीच मार्गदर्शन हवे असते म्हणून आजच्या कार्यक्रमात .. हे मार्गदर्शक म्हणून स्थान स्विकारतील अशी मी त्यांना विनंती करतो.
असतो मा सद्गमय..
तमसो मा ज्योतिर्गमय…
मृत्योर्मा अमृतं गमय …
वाईटाकडून चांगल्याकडे, अंधारातून प्रकाशाकडे आणि मरणशिलतेतून अमरत्वाकडे नेणारे आहे व कुशल नेतृत्व असलेले
आजचे आपले प्रमुख पाहुणे……………………….. हे स्थान स्विकारतील अशी मी त्यांना विनंती करतो
प्रमुख पाहूणे :-
:-प्रत्येक पाहुण्यांसाठी शब्द रचनेत थोडा बदल करावा
या वेळेस कार्यक्रमा बद्दल माहिती द्यावी
सुरवंटांचे झाले पाखरू, सर्वत्र लागले भराऱ्या मारू. नवे जग, नव आशा, शोध घेण्याची जबर मनिषा । याच शाळेने लावले वळण, त्यांवर चढू यशाची चढण ॥
हे वळण लावण्यासाठी, गुरूजनांनी अविरत कष्ट घेतले. शिक्षकांनी अज्ञानावर त्यांच्या ज्ञानाचा, अनुभवाचा, संस्कृतीचा लेप दिला. मनाच्या कोऱ्या करकरीत पाटीवर समतेचे, ममतेचे धडे गिरविले. आणि आज ती पाटी ज्ञानरत्नांनी शिगोशिग भरलेली आहे. शिस्तीशिवाय आयुष्य म्हणजे होकायंत्राशिवाय जहाज ! म्हणूनच, आमच्या जीवनाचा कटीपतंग न होण्यासाठी त्याने प्रेमाने शिस्तीचाही डोस पाजला. हे सर्व करताना शिक्षकांनी प्रत्येक विद्यार्थ्याला एकाच मापात तोलले नाही. प्रत्येक दगडातील देव शोधून त्यांवर सद्विचारांचे घाव घातले. आणि त्या दगडाला ज्याच्या, त्याच्या गुणवैशिष्टयाप्रमाणे देवाचे रूप दिले. उदाहरणच द्यायचं झालं तर नटराजाच्या मुर्तीलाही आकार मिळाला. शाळेने फक्त हुशार विद्यार्थ्यांचीच रास निर्माण केली नाही, तर उत्कृष्ट कलाकार व उत्तमोत्तम खेळाडूही निर्माण केले. गता या सर्वांना पोरक होउन नव्या गव्हानांना सामोर जायव आहे. शाळेत घेतल्याल्या शिदोरिचा बाह्या जगात वापर करुन स्पर्धेच्या युगात स्थान पक्क करायच आहे.
ध्येय दुर आहे म्हणून रस्ता सोडू नका,
स्वप्नं मनात धरलेलं कधीच मोडू नका..
पावलो पावली येतील कठिण प्रसंग
फक्त ध्येय पूर्ण होईपर्यंत हार मानू नका.
सरस्वती पूजन : दिपप्रज्वलन
दिपपूजन संकल्पाकडून समृद्धीकडे मार्गक्रमण करणारे ‘तेजोमय पर्व’. प्रकाश पर्वातील आजचा मंगल दीप उजळणार तो सरस्वती अंधार भेदून,
अग्निला आलिंगन देउन, स्वतःला जाळून सा-या जगाला प्रकाश देणा-या प्रत्येक दिव्याला माझे लक्ष लक्ष प्रणाम,
आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष व प्रमुख पाहूणे यांना मी विनंती करतो की त्यानी सरस्वती पूजन व दिपप्रज्वलन करावे
पुन्हा पाहूण्यांना मंचावर बसण्यास विनंती करणे व विद्यार्थ्यांना
बालपणीचे दिवस सुखाचे, आठवती घडी घडी
आठवणींना आठवणींची, वाहतो ही शब्दसुमनांची जुडी.
बालपणीचे सखे सोबती, आठवणींना अजुन झोंबती.
कांही गुरूजन कांही सवंगडी, या सर्वांनी विविध गुणांनी
जशी घडवली तशीच घडली, आयुष्याची घडी.
आणि म्हणूनच, वाहिली ही शब्दसुमनांची जुडी.
स्वागत
आयुष्य जरी एक दिवसाचे, काम त्याचे लाख मोलाचे सुख दुःखात असतो सोबती, फुलांची ही थोर महती घेवू शिकवण आपण फुलांकडून, सुख दुःख वाटू सर्व मिळून आयुष्यात असेल आपल्याही सुगंध दृढ होतील ऋणाणुबंध
आजच्या पाहुण्यांच स्वागत करण आपल्या साठी भाग्याच आहे
आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष मी त्याना विनंती करतो