निपुण महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत उपक्रमशील शिक्षकांचा कौतुक सोहळा आयोजन करणे nipun maharashtra sohala 

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

निपुण महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत उपक्रमशील शिक्षकांचा कौतुक सोहळा आयोजन करणे nipun maharashtra sohala 

निपुण महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत दि.२७ फेब्रुवारी २०२५ रोजी जिल्हास्तरीय लिडर मातांची उद्बोधन कार्यशाळा व उपक्रमशील शिक्षकांचा कौतुक सोहळा आयोजन करणे बाबत.

संदर्भ: शासन निर्णय शालेय शिक्षण व क्रिडा विभाग क्रमांक संकिर्ण- २०२१/प्र.क्र/१७९/एसडी-६

दि. २९/०६/२०२२

उपरोक्त विषयाचे संदर्भिय पत्राचे अनुषगांन कळविण्यात येते की निपून भारत अभियाना अंतर्गत पायाभुत साक्षरता व संख्याज्ञान अभियानाचा सर्व समावेश व प्रभावी अंमलबजावनीसाठी सर्व जिल्ह्यातील शाळांमध्ये शिक्षकांच्या मदतीने आणि गाव स्तरावर प्रत्येक वाडी व वस्ती निहाय इ. १ ली ते इ. ३ री च्या माता पालक गटांच्या मदतीने कार्य सुरु आहे. सर्व माता पालक गटातील लिडर माता यांना निपुन महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत माता पालकाच्या सहभागाने सुरु असलेल्या कामाला अधिक बळकट करण्यासाठी दिनांक २७ फेब्रुवारी २०२५ रोजी जिल्हास्तरीय लीडर मातांचा मेळावा आयोजित केला आहे. सदर कार्यशाळेला प्रत्येक केंद्रातील निवडक एका लिडर मातेची निवड करून पाठवायचे आहे. या कार्यशाळेमध्ये उपस्थित सर्व लीडर मातांना आपल्या केंद्रातील शाळांचे प्रतिनिधित्व करत आपले अनुभव सामाईक करण्याची संधी मिळणर आहे तसेच त्याच्या मदतीने केंद्रातील सर्व माता पालक गटाचे सक्षमीकरण होण्यासाठी मार्गदर्शन मिळू शकणार आहे. निपुण अभियानाच्या उद्दिष्ट प्राप्तीसाठी उल्लेखनीय काम केलेल्या शिक्षकांचा व निवडक मातांचा गुणगौरव सोहळा आयोजित करण्यात आला आहे.

तरी सदर मेळाव्याला प्रत्येक तालुक्यातील निवडक १० उपक्रमशील शिक्षक आणि प्रत्येक केंद्रातील निवडक एका लिडर मातेची निवड करून सर्व शिक्षण विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख, तालुका नोडल अधिकारी यांना उपस्थित राहण्यासाठी सूचित करण्यात यावे.

स्थळ: जिल्हा परिषद शाळा नाणेकरवाडी (चाकण), ता. खेड, जिल्हा पुणे.

वेळ: सकाळी ११ ते ३ वाजता

Join Now