निपुण महाराष्ट्र कृती कार्यक्रम अंतर्गत विद्यार्थ्यांच्या अध्ययन क्षमता पडताळणीच्या नोंदी BOT वर करणेबाबत nipun maharashtra krutikaryakram
🛑 *सर्व शाळांपर्यंत तात्काळ पाठवा .*
*प्रति,*
१. प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, सर्व
२. शिक्षणाधिकारी (प्राथ. व माध्य.), जि. प. सर्व
३. शिक्षणाधिकारी / प्रशासन अधिकारी, म.न.पा. सर्व
४. शिक्षण निरीक्षण, मुंबई (पश्चिम, उत्तर व दक्षिण)
*विषय :* निपुण महाराष्ट्र कृती कार्यक्रम अंतर्गत विद्यार्थ्यांच्या अध्ययन क्षमता पडताळणीच्या नोंदी करणेबाबत…
*संदर्भ :* शासन निर्णय क्र. संकीर्ण २०२१/प्र.क्र.१७९/ एसडी-६, दिनांक: ०५ मार्च, २०२५.
नोंदी करण्यासाठी Bot लिंक उपलब्ध Click here
उपरोक्त संदर्भीय शासन निर्णयान्वये, दि.०५ मार्च २०२५ ते ३० जून २०२५ या कालावधीत राज्यातील दुसरी ते पाचवीच्या वर्गातील VSK BOT शालेय विद्यार्थ्यांची अध्ययन क्षमता वृद्धींगत करण्याकरिता निपुण महाराष्ट्र अभियानांतर्गत कृती कार्यक्रम राबविण्यात येत आहे.
नोंदी करण्याबाबत वेळापत्रक खालील प्रमाणे
याअंतर्गत विद्यार्थ्यांच्या अध्ययन क्षमता पडताळणीची नोंद दिनांक २० मार्च, ०५ एप्रिल, २० एप्रिल, ०५ मे, २० मे, १५ जून व ३० जून २०२५ या तारखांना VSK च्या Bot वर कराव्यात.
नोंदी कशा भराव्यात खालील मार्गदर्शक व्हिडिओ पहा
शिक्षकांनी Bot वर विद्यार्थ्यांच्या नोंदी करण्यासंदर्भाने अधिक माहिती घेण्यासाठी https://tinyurl.com/NIPUNMHUserVideo या लिंक वरील व्हिडिओ पहावा.
तरी उपरोक्तप्रमाणे, आपल्या अधिनस्त इ. २ री ते ५ वी च्या सर्व शिक्षक व मुख्याध्यापक यांना विद्यार्थ्यांच्या अध्ययन क्षमता पडताळणीची नोंद करण्यासाठी आपल्या स्तरावरून आदेशीत करावे.
VSK BOT LINK CLICK HERE
_____________________
(राहूल रेखावार भा.प्र.से.)
संचालक
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे