निपुण महाराष्ट कृती आराखडा भूमिका आणि जबाबदऱ्या nipun maharashtra kruti aarakhade 

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

निपुण महाराष्ट कृती आराखडा भूमिका आणि जबाबदऱ्या nipun maharashtra kruti aarakhade 

अ) शिक्षक

शिक्षकांनी या कृती कार्यक्रमासाठी विहित केलेल्या अपेक्षित अध्ययन क्षमता आपल्या विद्यार्थ्यांनी प्राप्त केल्या आहेत किंवा नाही याची स्तरनिहाय पडताळणी करतील

अपेक्षित अध्ययन क्षमता प्राप्त नसलेल्या विद्यार्थ्यांना त्या क्षमता प्राप्त करण्यासाठी स्वतःचा विद्यार्थीनिहाय कृत्ती कार्यक्रम आखावा, त्याची नोंद ठेवावी आणि त्याची यशस्वी अंमलबजावणी करावी.

अपेक्षित अध्ययन क्षमता प्राप्त केलेल्या वि‌द्यार्थ्यांचा प्रगती अहवाल दर 19 दिवसांनी “चावडी

वाचन व गणन कार्यक्रमात सादर करावा

ज्या वि‌द्यार्थ्यांचा अपेक्षित अंतिम अध्ययन स्तर प्राप्त झाला नाही त्या विद्यार्थ्यांच्या नोंदी

दिलेल्या तारखांना VSK / Bot वर करणे

दि. ३० जून, २०२५ पर्यंत शिक्षकांनी आपल्या वर्गातील विद्यार्थ्यांचे मूल्यांकन करुन विद्यार्थ्यांनी अपेक्षित क्षमता जेव्हा प्राप्त केल्या असतील त्याचवेळी विद्या समिक्षा केंद्र (VSK) च्या माध्यमातून देण्यात आलेल्या संकेतस्थळ / Bot वर या कृती कार्यक्रमाचे उ‌द्दिष्ट साध्य झाल्याचे घोषित करावे.

ब) मुख्याध्यापक

मुख्याध्यापक शाळा व्यवस्थापन समितीमध्ये या कार्यक्रमाबाबत चर्चा करणे.

विदयार्थी व शिक्षकांना सहाय्य होईल अशा उपाययोजनांची आखणी करणे.

चावडी वाचन व गणन कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्यांच्या सादरीकरणाचे नियोजन करणे.

शिक्षकांना आवश्यकतेनुसार सर्व शैक्षणिक सहाय्य (Academic support) मिळेल याचा पूर्ण प्रयत्न

मुख्याध्यापकांनी करावा.

मुलांची स्तर निश्चिती झाल्यानंतर वर्ग निरीक्षण तक्ता शाळेत लावणे.

केंद्र प्रमुख ह्यांच्या बैठकी साठी अहवाल तयार व सादर करणे

या कृती कार्यक्रमाच्या अंमलबजावणीसाठी इयत्ता २ री ते ५ वीच्या वर्गातील विद्यार्थ्यांना नियमितपणे शिकविणाऱ्या शिक्षकांची विशेष आदेशाने शिक्षकांच्या नावनिहाय प्रत्येक वर्गासाठी नेमणूक मुख्याध्यापकांनी तात्काळ करावी.

क) केंद्रप्रमुख

सर्व केंद्रप्रमुखांनी १२.३.२०२५ रोजी शिक्षण परिषदेच्या माध्यमातून निपुण महाराष्ट्र कृती कार्यक्रम व

शासन निर्णय समजाऊन सांगणे.

नियमित शाळा भेट करून विद्यार्थ्यांचा स्तर निहाय प्रगती आढावा घेणे

मुख्याध्यापकांचा स्तर निहाय प्रगती आढावा घेणे

शिक्षकांना शैक्षणिक मार्गदर्शन व साहाय्य करणे

आपल्या केंद्राचा आढावा प्रत्येक १५ दिवसांनी गट शिक्षण अधिकारी यांना तालुका स्तरीय बैठकीत

सादर करणे

प्रत्येक महिन्यात (मार्च ते जून) शिक्षण परिषद घेऊन कृती कार्यक्रमाच्या अनुषंगाने चर्चा करणे.

ड) गटशिक्षणाधिकारी

आठवड्यात प्रत्येकी ४ शाळा भेटी करणे

शाळा भेटींमध्ये विद्यार्थ्यांमध्ये अपेक्षित क्षमता प्राप्त झालेल्या आहेत की नाही याची फेरतपासणी

करणे.

कृती कार्यक्रम राबबवण्यात आपल्या तालुक्यात सातत्य आहे का ते तपासावे.

प्रत्येक १५ दिवसांनी केंद्र प्रमुख यांच्या कडून कामाचा आढावा घेणे..

केंद्र प्रमुखांना कृती कार्यक्रम राबवण्यात काही अडचणी येत असतील तर त्या समजून घेऊन त्यांना

अपेक्षित साहाय्य करणे

जिल्हास्तरिय आढावा बैठकी मध्ये आपल्या तालुक्याचा प्रगती अहवाल सादर करणे

• ज्या शिक्षकांचे अध्यापन चांगले आहे व स्वयंप्रेरित आहेत असे शिक्षक निवडणे

इ) शिक्षणाधिकारी

शिक्षणाधिकारी व सर्व जिल्हास्तरिय यंत्रणा यांनी नियमित शाळा भेटी करणे (प्रत्येक आठवड्यात

कमीत कमी ३ शाळा भेटी)

शाळा भेटी दरम्यान प्रगत विद्यार्थ्यांची फेर तपासणी करणे.

दर १५ दिवसांनी गटशिक्षणाधिकारी यांच्यासोबत आढावा बैठक घेणे

कार्यक्रम राबवताना येणाऱ्या अडचणी समजून घेऊन त्यावर मार्गदर्शन करणे

जिल्हास्तरीय बैठकीमध्ये जिल्हा प्रगती अहवाल मा. मुख्य कार्यकारी अधिकारी यांना सादर करणे.

विनोबा app च्या मदतीने शाळा तपासणीचा डेटा मा. मुख्य कार्यकारी अधिकारी यांना सादर करणे

फ) जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था (DIET) –

प्रत्येक आठवड्यात नियमित (किमान ४) शाळा भेटी करणे

शिक्षण परिषदेचा मसुदा तयार करून देणे व केंद्रस्तरिय शिक्षण परिषदांना भेटी देणे

अध्ययन कृती व TLM च्या वापरबाबत मार्गदर्शन करणे

तालुका स्तरावर सर्व प्रकारचे शैक्षणिक सहाय्य व मार्गदर्शन करणे

ग) मा. मुख्य कार्यकारी अधिकारी –

शक्य झाल्यास आपल्या तालुका भेटी दरम्यान शाळांना भेटी देणे

• प्रत्येक १५ दिवसांनी जिल्हा स्तरीय आढावा बैठक घेणे.

Join Now