राज्यात निपुण महाराष्ट्र अभियानांतर्गत कृती कार्यक्रम राबविणेबाबत व्हीसीव्दारे बैठक nipun bharat maharashtra abhiyan
विषयांकित प्रकरणी आपणांस कळविण्यात येते की, मा. आयुक्त (शिक्षण) महोदय यांचे अध्यक्षतेखाली शालेय शिक्षण विभागांशी संबंधित विविध विषयांवर आढावा व चर्चा करण्यासाठी गुरुवार, दिनांक ०६/०३/२०२५ रोजी दुपारी ०४.३० वाजता ऑनलाईन व्हीसीचे आयोजन केले आहे.
२/- तरी सदर व्हीसीसाठी आपण स्वतः न चुकता अदययावत माहितीसह उपस्थित राहावे. तसेच विभागीय शिक्षण उपसंचालक यांनी आपल्या अधिपत्याखालील सर्व अधिकारी हे व्हीसीसाठी उपस्थित राहतील याची दक्षता घ्यावी. तसेच विभागीय मंडळातील सर्व अधिकारी (गट-अ व गट-ब) यांनी सदर बैठकीसाठी उपस्थित राहावयाचे आहे. व्हीसीची लिंक स्वतंत्रपणे कळविण्यात येत आहे.
३/- गटशिक्षणाधिकारी यांच्या कार्यालयात विस्तार अधिकारी व केंद्रप्रमुख यांनी सदर व्हीसीसाठी उपस्थित राहावे, अध्यापक विदयालयातील प्राचार्य यांनी देखील संलग्न जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था अथवा गटशिक्षणाधिकारी कार्यालयात व्हीसीसाठी उपस्थित राहावयाचे आहे.
आढावा विषय :