राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धेसाठी नवोपक्रम सादर करणेकरिता मुदतवाढ देणे बाबत navopkram compitition shasan nirnay
संदर्भ : १) प्रस्तुत कार्यालयाचे पत्र क्र. जा२०२/नवोपक्रमस्पर्धा/संशोधन/राशैसंप्रपम.क्र.४/२५-०४६७५
दि.१९/०९/२०२४
२) मा. संचालक प्रस्तुत कार्यालय यांची मान्य टिपणी दि. १४/११/२०२४
राज्यातील सर्व नवोपक्रमशील शिक्षक व अधिकारी हे विद्यार्थ्यांच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी सतत प्रयत्न करत
असतात. नवोपक्रमाच्या माध्यमातून आपल्या कल्पनांना व विचारांना मूर्त स्वरूप देण्याकरिता तसेच विद्यार्थी, शिक्षक, पालक यांच्या समस्या सोडविण्याच्या अनुषंगाने नवनवीन उपक्रम हाती घेत असतात. सर्वच स्तरातील शिक्षक व अधिकारी यांच्या या कल्पकतेला व सृजनशीलतेला प्रोत्साहन देण्यासाठी दरवर्षी परिषदेमार्फत राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धा आयोजित करण्यात येते. त्यानुसार यावर्षीही राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धा सन २०२४-२५ चे पाच गटात आयोजन करण्यात आलेले आहे.
प्रस्तुत राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धा २०२४-२५ साठी स्पर्धकांना नावनोंदणी करावयाचा कालावधी दि.०५/११/२०२४ ते दि.२२/११/२०२४ देण्यात आलेला होता. तथापि सर्वच गटातील स्पर्धकांची नावनोंदणी अत्यल्प प्रमाणात झाली असल्याने शिक्षकांना व पर्यवेक्षकीय अधिकारी यांना नवोपक्रम स्पर्धेमध्ये सहभाग घेण्यासाठी दि.०५/१२/२०२४ पर्यंतची मुदतवाढ देण्यात येत आहे.
आपल्या जिल्ह्यातील जास्तीत स्पर्धक उक्त नवोपक्रम स्पर्धेमध्ये सहभागी होतील यासाठी आपल्या स्तरावरून प्रयत्न करावेत. यानंतर मुदतवाढ देण्यात येणार नाही याची नोंद घ्यावी.