दिनांक १८.०१.२०२५ रोजी जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश २०२५ परीक्षेसाठी भरारी पथक नेमणूक करणेबाबत navoday exam bharari pathak
संदर्भ:- १. मा. निवासी उप जिल्हाधिकारी, जिल्हाधिकारी कार्यालय अकोला यांचे पत्र क्रमांक कक्ष-१/आस्था- सविली-५/कावी-०२/२०२५ दिनांक १६.०१.२०२५
२. प्राचार्य, जवाहर नवोदय विद्यालय, अकोला यांचे पत्र क्रांक ६ thJNVST-२०२५/JNV- akola/२०२३- २४/५८४ दिनांक १०.०१.२०२५
उपरोक्त संदर्भीय विषयाचे अनुषंगाने, इयत्ता ६ वी च्या जवाहर नवोदय विद्यालय, प्रवेश परीक्षा २०२५ च्या प्रवेशाकरिता अकोला जिल्ह्यातील २५ परीक्षा उपकेंद्रावर दिनांक १८ जानेवारी २०२५ रोजी आयोजित करण्यात आलेली आहे. दिनांक १८.०१.२०२५ रोजी सकाळी ११.०० ते दुपारी १.३० या कालावधीत आयोजित प्रवेश परीक्षा सुरळीत पार पडण्याचे दृष्टीकोनातून सोबत दिलेल्यानुसार भरारी पथकाची निर्मिती करण्याबाबत संदर्भीय पत्राचे अनुषंगाने या कार्यालयास निर्देश प्राप्त झालेले आहेत.
गट शिक्षणाधिकारी पंचायत समिती सर्व यांनी खालीलप्रमाणे कार्यवाही करावी.
१. आपण सोबत दिलेले नियोजन गट विकास अधिकारी यांना अवगत करण्यात यावे.
२. दिलेल्या नियोजनानुसार आपल्या अधिनस्थ केंद्र प्रमुख यांना वेळेवर उपस्थित राहणे बाबत आपल्या स्तरावर आदेशित करण्यात यावे.
३. परीक्षेकरिता आपल्या कार्यक्षेत्रातील परीक्षा केंद्रावर अन्य शाळेतील पर्यवेक्षक नेमण्याची कार्यवाही करण्यात यावी. पर्यवेक्षक म्हणून त्याचा शाळेतील शिक्षक उपस्थित राहणार नाहीत याची दक्षता घेण्यात यावी.