NPS धारक सर्व अधिकारी / कर्मचारी विकल्प देणेबाबत शासन परिपत्रक national pension scheme
वित्त विभागाच्या संदर्भाधिन दि.२०.०९.२०२४ रोजीच्या शासन निर्णयान्वये राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणाली लागू असलेल्या कर्मचाऱ्यांना राज्य शासनाची सुधारीत राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना किंवा केंद्र शासनाची एकीकृत निवृत्तीवेतन योजना (UPS) यामध्ये सहभागी होण्यासाठी द्यावयाचा एक वेळचा (One Time Option) विकल्प कार्यालय प्रमुख/विभाग प्रमुख यांचेकडे सादर करण्याबाबत कळविले आहे. तसेच दोन्ही योजनेमध्ये जे कर्मचारी सहभागी होणार नाहीत त्यांना राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणाली अंतर्गत निवृत्तीवेतन योजना आपोआप लागू राहील, अशी तरतुद सदर शासन निर्णयात आहे.
२. सदर शासन निर्णयातील परिच्छेद क्र.१ येथे नमूद तरतुदीनुसार संबंधित अधिकारी / कर्मचारी यांनी विकल्प विभागास सादर करावयाचा आहे. सदरचा विकल्प देण्यास उशिर झाल्यास त्याची सर्व जबाबदारी संबंधित अधिकारी/कर्मचारी यांची राहील याची नोंद घ्यावी.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.