सन २०२४-२५ मध्ये परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजनेंतर्गत शिक्षक व शिक्षकेतर (प्राथमिक) कर्मचाऱ्यांकरिता शासन हिस्सा यावरील व्याज अदा करण्यासाठी निधी वितरीत करण्याबाबत national pension scheme
वाचा-
१. शासन निर्णय क्र. अंनियो-१००६/(२३/०६) माशि-२, दिनांक २९/११/२०१०.
२. शासन निर्णय क्र. संकीर्ण-२४१३/प्र.क्र.८५/१३/टीएनटी-६, दिनांक १८/०२/२०१६
३. वित्त विभाग, शासन परिपत्रक क्र. अर्थसं-२०२३/प्र.क्र.४०/अर्थ-३. दि.०४/०३/२०२४
४. शिक्षण उपसंचालक (अंदाज व नियोजन), शिक्षण आयुक्तालय, पुणे यांचे पत्र क्र. अंदाज-१८१/उप्र२०२३-२४/निविप्र २०२४-२५/०७७७४
प्रस्तावना –
जिल्हा परिषदा मान्यताप्राप्त खाजगी अनुदानित प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालयातील १००% अनुदानित पदावरील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी परिभाषित अंशदान निवृत्ती वेतन योजनेची कार्यपध्दती संदर्भ क्र.१ च्या शासन निर्णयान्वये विषद केली आहे. सदर योजनेसाठी शासनाचा हिस्सा व व्याजासाठी संदर्भ क्र.२ अन्वये लेखाशीर्ष उघडण्यात आलेली आहे. संदर्भ क्र. ४ अन्वये शिक्षण उपसंचालक, शिक्षण आयुक्तालय, पुणे यांनी निधी उपलब्ध करुन देण्याबाबत विनंती केली आहे. सदर लेखाशीर्षाखालील निधी वितरीत करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.
शासन निर्णय –
सन २०२४-२५ या आर्थिक वर्षाकरिता खालील विवरणपत्रातील स्तंभ क्र.३ अन्वये तरतूद करण्यात आली आहे. सदर एकूण तरतूदची १००% निधी अर्थसंकल्पीय वितरण प्रणाली (BEAMS) द्वारे आयुक्त, शिक्षण, महाराष्ट्र राज्य, पुणे यांना खालील विवरणपत्रानुसार वितरीत करण्यास मान्यता देण्यात येत आहे.
२. सदर खर्च वरील विवरणपत्रातील संबंधित लेखाशीर्षातून सन २०२४-२५ या आर्थिक वर्षात अर्थसंकल्पीत करण्यात आलेल्या संबंधित लेखाशीर्षाच्या तरतूदीतून पुस्तकी समायोजनाद्वारे भागविणे, तसेच मंजूर अनुदानापेक्षा जास्त खर्च होणार नाही, याची दक्षता घेवून मंजूर केलेली अनुदाने पुढील अटी व शर्तीच्या अधीन आहेत.
(१) उपराज्य अभिलेख देखभाल अभिकरणांनी या अनुदानातून केलेल्या खर्चाचे DCPS चे स्वतंत्र लेखे ठेवावेत.
(२) ज्या उद्दिष्टासाठी सदर निधी मंजूर करण्यात आला आहे, त्याच उद्दिष्टासाठी खर्च करण्यात यावा
(३) वित्त विभागाने प्रत्येक वर्षी व्याजाचे दर निश्चित करणारे शासन निर्णय निर्गमित केले आहेत. तसेच व्याजाची परिगणना करताना वित्त विभाग परिपत्रक क्र. अंनियो १०१०/प्र.क्र.६७/सेवा-४, दिनांक १६ नोव्हेंबर, २०१२ नुसार कार्यवाही करण्याची दक्षता घ्यावी. त्यानुसारच विहित दराने व्याजाची आकारणी करण्यासंदर्भातील कार्यवाही उपराज्य अभिलेख देखभाल अभिकरणाने करुन नमुना ४५ अ मध्ये व्याजाची रक्कम आहरित करण्याकरिता निरंक रक्कमेचे देयक कोषागारात सादर करावे. देयकासोबत ज्या कर्मचाऱ्यांच्या खाती व्याज जमा करावयाचे आहे त्या कर्मचाऱ्यांची यादी जोडण्याची आवश्यकता नाही. तथापि, रक्कम अचूक असल्याची खात्री
केल्याबाबत उपराज्य अभिलेख देखभाल अभिकरणाने देयकात प्रमाणित करावे. या संदर्भातील माहिती उपराज्य अभिलेख देखभाल अभिकराने नियंत्रक अधिकाऱ्यांना पाठवावी. तसेच, नियंत्रक अधिकाऱ्यांनी उपसचिव (टिएनटी), शालेय शिक्षण विभाग व राज्य अभिलेख अभिकरण, मुंबई यांच्याकडे प्रत्येक महिन्यात न चुकता पाठवावी.
(४) सममुल्य अंशदानाची रक्कम शासनास भरणा केल्याबद्दल नमुना क्र. आर ७ शिक्षण अधिकारी/शिक्षण निरिक्षक (प्राथमिक, माध्यमिक) / मुख्य लेखा व वित्त अधिकारी यांनी संबंधित कोषागाराकडून प्रमाणित करुन घ्यावी व त्या प्रमाणपत्राच्या प्रती उपराज्य अभिलेख देखभाल अभिकरणाकडे दरमहा पाठवाव्यात. उपराज्य अभिलेख देखभाल अभिकरणाने कर्मचाऱ्यांकडून जमा झालेल्या व शासन खाती जमा केलेल्या रकमांच्या चलनाच्या प्रती नमुना आर २ मधील माहितीसह नियंत्रकांना पाठवाव्या. तसेच नियोक्त्याचे अंशदान भरणा केल्यानंतर त्या चलनांच्या प्रतीही नियंत्रक यांच्याकडे न चुकता पाठवाव्यात. नियंत्रकानी उपराज्य अभिलेख देखभाल अभिकरणनिहायमाहिती महिनानिहाय एकत्रित करुन अशी माहिती उपसचिव (टिएनटी), शालेय शिक्षण विभाग व राज्य अभिलेख अभिकरण, मुंबई यांच्याकडे प्रत्येक महिन्यात न चुकता पाठवावी. तसेच हा खर्च याच कारणांसाठी खर्च करण्यात आला असल्याबाबतचे उपयोगिता प्रमाणपत्र महालेखापाल कार्यालय, तसेच या विभागास पाठवावे.
(५) जिल्हा परिषदा, मान्यताप्राप्त खाजगी अनुदानित प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालयातील १००% अनुदानित पदावरील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे मासिक अंशदान व त्यावरील शासनाचे अंशदान अशा एकत्रित रकमेवरील व्याज खालील लेखाशीर्षामध्ये प्रस्तूत मंजूर अनुदानातून BEAMS वर उपलब्ध करण्यात आलेल्या अनुदानातून पुस्तकी समायोजनाद्वारे भागवावा.
(६) महालेखापाल, महाराष्ट्र१ व २ मुंबई/नागपूर यांना लेखापरिक्षणाकरिता पुस्तके व लेखे पाहण्याचा अधिकार राहील.
३. सदर शासन निर्णय वित्त विभागाचे परिपत्रक क्र. अर्थसं २०२४/प्र.क्र.८०/अर्थ-३, दिनांक २५/०७/२०२४ व दिनांक १२/०२/२०२५ आणि शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, शासन निर्णय क्र.अंनियो-१००६/(२३/०६) माशि-२, दिनांक २९/११/२०१० मधील अटी व शर्तीच्या अधीन राहून निर्गमित करण्यात येत आहे.
४. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेताक २०२५०२२४१३१२१२१९२१ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.
TUSHAR VASANT