राष्ट्रीय निवृत्तिवेतन योजनेच्या अंमलबजावणीबाबत राष्ट्रीय निवृत्तिवेतन योजनेचे सभासदत्व संपुष्टात आल्याने देय ठरणाऱ्या लाभांबाबत national pension scheme
वाचा:-शासन परिपत्रक, वित्त विभाग क्रमांक अंनियो २०१७/प्र.क्र. २६/सेवा ४, दि.२८.०७.२०१७.
शासन शुध्दीपत्रक
national pension schemeसंदर्भाधीन शासन परिपत्रकातील परिच्छेद क्र.२ मध्ये सर्व आहरण व संवितरण अधिकाऱ्यांना खालीलप्रमाणे सूचना निर्गमित करण्यात आली आहे –
“सर्व आहरण व संवतिरण अधिकारी यांनी राष्ट्रीय निवृत्तिवेतन योजनेअंतर्गत नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होणाऱ्या सभासदांची सेवानिवृत्ती दिनांकापूर्वी लगतच्या ३ महिन्यात अंशदाने कपात करु नयेत व कोषागार अधिकारी यांनीही देयक पारित करीत असतांना याची
दक्षता घ्यावी.”
सदर परिच्छेदामध्ये पुढीलप्रमाणे सुधारणा करण्यात येत आहे –
“सर्व आहरण व संवतिरण अधिकारी यांनी राष्ट्रीय निवृत्तिवेतन प्रणालीअंतर्गत राज्य शासकीय कर्मचाऱ्याच्या नियत वयोमान सेवानिवृत्ती दिनांकापूर्वी लगतच्या १ महिन्यात मासिक अंशदान कपात करु नयेत व कोषागार अधिकारी यांनीही देयक पारित करीत असतांना याची दक्षता घ्यावी.”
सदर शासन शुध्दिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले असुन त्याचा संकेतांकnational pension scheme २०२४०५०३१२३३३६०७०५ असा आहे. हे शुध्दिपत्रक डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
Nice information