मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा अभियान टप्पा-२ राबविणेबाबत my school beautiful school
संदर्भ : १. शासन निर्णय, क्रमांकः मुमंअ २०२४/प्र.क्र.५२/एसडी-६, दिनांक २६ जुलै, २०२४
२. या कार्यालयाचे सम क्रमांक जा.क्र. ४६४०, दिनांक २९/०७/२०२४ पत्र ३. या कार्यालयाचे सम क्रमांक जा.क्र.५३१९, दिनांक २९/०८/२०२४ चे पत्र
विषयांकित प्रकरणी, संदर्भ क्र.१ वरील शासन निर्णयान्वये सन २०२४-२५ मध्ये “मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा-टप्पा २० हे स्पर्धात्मक अभियान काही नवनवीन उपक्रमांसह राबविण्याबाबत निर्णय घेण्यात आलेला आहे. या कार्यालयाच्या संदर्भ क्र.२ व ३ वरील पत्रान्वये या बाबतच्या सविस्तर सूचना व शाळांनी माहिती भरणे व विविध स्तरावरील मूल्यांकन यासाठो वेळापत्रक निश्चित करण्यात आलेले आहे.
२/- सदर अभियानांतर्गत सदयस्थिती शाळास्तरावरुन माहिती भरण्यासाठी वेळापत्रक निश्चित करण्यात आलेले होते. नर्थाप. या बाबत अनेकवेळा सूचना देऊनही अदयापही शाळांकडून माहिती भरुन तो अंतिम केलेली नाही. त्याअनुषंगाने
पुढीलप्रमाणे सूचना देण्यात येत आहेत.
अ) सदर अभियानात भाग घेणाऱ्या ज्या शाळांनी आपली माहिती अपूर्ण भरलेली असेल, त्या सर्व शाळांची माहिती राज्यस्तरावरून दि.०६/०९/२०२४ रोजी आहे त्या स्थितीत अंतिम करण्यात येणार आहेत. यानंतर या शाळांच्या माहितीमध्ये कोणताही बदल करता येणार नाही. व सदरची शाळा मूल्यांकनासाठी केंद्र प्रमुख यांच्या लॉगिनला पाठविण्यात येईल, याची नोंद घ्यावी.
ब) या अभियानात शाळांचा मागील वर्षी (सन २०२३-२४ मध्ये) प्राप्त झालेला क्रमांक किंवा त्यापेक्षा निम्न क्रमांकासाठी या वर्षीच्या अभियानात विचार केला जाणार नाही. या वधीच्या मूल्यांकनात मागील वर्षातील स्तरापेक्षा (क्रमांक) वरच्या स्तरावरील क्रमांक मिळविण्यास या वषीच्या निकषाप्रमाणे शाळा पात्र होत असल्यास त्या क्रमांकास शाळा पात्र असतील.
३/- मूल्यांकन सुविधा ऑनलाईन करण्याचे सुधारित वेळापत्रक (अंतिम):
अ) शाळा स्तरावरुन माहिती अंतिम करण्याचा दिनांक ०६/०१/२०२४
ब) प्रत्येक स्तरावरील मूल्यांकनांचा अंतिम दिनांक पुढीलप्रमाणे राहील.