लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ नवयुवा,दिव्यांग,महिला,पारलिंगी मतदारांसाठी अभिनव स्पर्धेबाबत My First Selfie Vote activity 

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ नवयुवा,दिव्यांग,महिला,पारलिंगी मतदारांसाठी अभिनव स्पर्धेबाबत My First Selfie Vote activity

निवडणूक प्रक्रियेत नवयुवा यांचा सहभाग घेवून लोकशाही बळकट करण्यासाठी नवयुवा, दिव्यांग (PWD), महिला, पारलिंगी मतदारांचा मतदानात बहुमोल सहभाग आवश्यक आहे. पुणे जिल्ह्यातील 21 मतदारसंघात 18 ते 19 या वयोगटातील नवयुवा मतदारांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. तसेच महिला, दिव्यांग व पारलिंगी (तृतीयपंथीय) वंचित घटकातील मतदारांनी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक सन 2024 मध्ये मोठ्या प्रमाणावर मतदानाचा हक्क बजावणे अपेक्षित आहे. याकरिता नवयुवा, महिला, दिव्यांग व पारलिंगी मतदारांनी जास्तीजास्त संख्येने मतदान करावे याकरिता त्यांच्यासाठी “My First Selfie Vote” ही अभिनव स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.

या स्पर्धेचे स्वरूप पुढीलप्रमाणे आहे.:-

१. मतदानाच्या दिवशी सकाळी 7.00 ते सायंकाळी 7.00 वाजेपर्यंत ही स्पर्धा असेल. प्रथम मतदान करणाऱ्या युवा, महिला, दिव्यांग व पारलिंगी मतदाराने मतदान केल्यानंतर मतदान केंद्राच्या विहित 100 मीटर मर्यादेच्या बाहेर येवून आपला सेल्फी काढावा व तो जिल्हा निवडणूक यंत्रणेच्या 9270105593 या व्हॉटसअॅप नंबरवर पाठवावा. हा सेल्फी पाठवतांना त्याने / तिने पुढील प्रमाणे स्पर्धेत सहभागाची नोंद करून आपले छायाचित्र व माहिती द्यावी. यामध्ये नाव, आडनाव, विधानसभा मतदारसंघाचे नाव/ईपीक नंबर किंवा मतदारयादी भाग क्रमांक व मतदार यादीतील अनुक्रमांक असावा तसेच युवा/महिला/दिव्यांग/पारलिंगी बाबत उल्लेख असावा, उदा. पूर्ण नाव / पिंपरी/SAV20682 ईपीक नंबर नसेल तर उदा. पूर्ण नाव/पिंपरी/यादीभाग

क्रमांक 325/585/युवा, महिला, दिव्यांग, पारलिंगी अशा प्रकारची नोंद असावी.

२. प्रथम मतदान करणा-या नवयुवा, महिला, दिव्यांग व पारलिंगी मतदाराला फेसबुक व इंस्टाग्रामच्या माध्यमातून देखील स्पर्धेत सहभाग घेता येईल. याकरिता मतदाराने मतदान केल्यानंतर मतदान केंद्राच्या विहित 100 मीटर मर्यादेच्या बाहेर येवून आपला सेल्फी काढावा व तो सेल्फी फेसबुक किंवा इंस्टाग्रामवर sveepune ला ढंग करून पोस्ट करावा.

३. साधारणातः प्रत्येक विधानसभा मतदार संघातील 10 मतदारांची निवड करणार आहे. स्पर्धेत सहभागी प्रत्येकाला मा. जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यांचे स्वाक्षरी असलेले सहभाग प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. प्रत्येक विधानसभा मतदारसंघातून 10 या प्रमाणे एकूण 210 मतदारांची निवड केली जाईल. यामध्ये नवयुवा तरूण-तरुणींचे प्रमाण 50 टक्के असेल. या निवडलेल्या 210 नवमतदारांना ‘विधानसभा-2024 साठी पुणे जिल्हाचे नवयुवा मतदारदूत’ म्हणून नेमले जाईल. त्यांचा पुढील स्विपच्या कार्यक्रमात यथायोग्य सहभाग करून घेता येईल. या 210 मधूनही निवडक 10 युवामतदारांचा त्यांच्या महाविद्यालयात/भागात स्टँडीज उभारून सन्मान करणेत येईल. आगामी लोकसभा निवडणुकीच्या काळात या नवयुवा दुतांच्या मार्फत

नवमतदारांची अधिक नोंदणी कशी होईल हे पाहिले जाईल. शक्य झाल्यास सहभागी स्पर्धकांपैकी 10 जणांना सन्मानचिन्ह देता येईल.

४. स्पर्धेसाठी हा मोबाईल क्रमांक 9270105593 देण्यात यावा.

तरी या स्पर्धेबाबत आपले अधिनस्त असलेल्या Booth Awareness Groups (BAGS), चुनाव पाठशाला, Voter Awareness Fourm इ. मार्फत नागरिकांमध्ये जागृती करावी व मोठ्या प्रमाणावर प्रसिद्धी देण्यात यावी. तसेच या स्पर्धेमध्ये जास्तीत जास्त नवयुवा मतदार सहभागी होतील याबाबत दक्षता घ्यावी.

My First Selfie Vote activity
My First Selfie Vote activity
Join Now

Leave a Comment