माझा आवडता पक्षी मोर मराठी निबंध my favourite bird peacock marathi essay 

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

माझा आवडता पक्षी मोर मराठी निबंध my favourite bird peacock marathi essay 

माझा आवडता पक्षी मोर आहे मोर अतिशय सुंदर पक्षी आहे मोर हा देशाचा राष्ट्रीय पक्षी देखील आहे मोर नेहमी शेतामध्ये जंगलामध्ये शेतामध्ये जंगलामध्ये नदीच्या काठी तलावाच्या काठी आढळतो मोर हा पावसाच्या येण्याच्या सुरुवातीला नाचतो नाचताना तो खूप सुंदर दिसतो मोर हा अतिशय नाजूक पक्षी आहे जगभरामध्ये अनेक पक्षी व पक्षांच्या जाती आहेत काही पक्षी अतिशय सुंदर देखील आहेत ते मनमोहक असतात त्यांचे सौंदर्य पाहतच राहावे असे वाटते त्यामुळे माझा आवडता पक्षी हा मोर आहे मोर हा दिसायला खूपच सुंदर आणि आकर्षक पण आहे मोर हा जास्त उंचावर उडू शकत नाही तो जमिनीवरच राहतो व चालतो देखील

मोर हा पक्षी दुसऱ्या पक्षांच्या तुलनेमध्ये मोठा पक्षी आहे त्याला विविध रंगाचे पिसे असतात त्याच्या शरीरावर आकर्षक अशा छटांचे पंख देखील असतात या पंखांना आपण मोरपिसे असे म्हणतो मोर त्याच्या पंखांमुळे जगभरामध्ये सुंदर ते मध्ये प्रसिद्ध झालेला आहे पावसाळ्याच्या सुरुवातीला मोर हा आपला पिसारा फुलवतो व पाऊस येण्याची चाहूल लागली की नासतो देखील मोराचे नृत्य हे अतिशय प्रसिद्ध आहे त्याचे नृत्य हे मनाला मोहून टाकते मोराचे सरासरी वजन पाच ते सहा किलो पर्यंत असते त्याचे संपूर्ण शरीर हे निळसर रंगाचे असते.

पूर्ण भारतामध्ये मोरांचे वास्तव्य आहे मोर हे जास्त नदीच्या काठी पाण्याच्या जलस्रोतांच्या जवळ पाहायला मिळतात मोर हा अतिशय भित्रा पक्षी आहे त्यांना जास्त उंचावर उडायला येत नाही ते जास्तीत जास्त दहा ते बारा फूट उडू शकतात मोरे झाडावर राहतात झाडावरून या फांदीवरून दुसऱ्या फांदीवर उडतात मोराचे अन्न म्हणजे जमिनीतील धान्य दाने झाडांचे विविध पाने झाडांची फळे किडे साप पाली अशा प्रकारचे त्यांचे खाद्य असते

खेड्यांमध्ये बऱ्याचदा मोर शेतातील पिकाचे नुकसान करताना आढळतात म्हणून शेतकरी त्यांना पळवण्यासाठी वेगवेगळे उपाय देखील करतात मोर आपले घर जमिनीवरच बनवतो घर बनवण्यासाठी तो जमिनीवर असलेल्या झाडांच्या फांद्या पाला काड्या वापरतो एका वेळेला तो चार ते पाच अंडी देतो.

मोर हा पक्षी खूपच आकर्षक आणि मनमोहक असतो प्रत्येकाला त्याला पाहायला आवडते मोर फक्त आपल्या देशातच नाही तर इतर देशांमध्ये देखील खूप प्रमाणावर आढळतात म्यानमारचा देखील मोर हा राष्ट्रीय पक्षी आहे आणि माझा तर खूप आवडता पक्षी मोर आहे

मोरा वरती विविध गाणे देखील रचले गेलेले आहेत मोरा रे मोरा काय तुझा तोरा सुंदर पिसारा अशा प्रकारचे गाणे कविता असलेल्या आहेत तसेच नवीन नृत्य देखील आलेले आहे त्याला मयूर नृत्य असे म्हणतात लोक वरातीमध्ये कार्यक्रमांमध्ये मयूर नृत्य करतात अशा प्रकारे माझा आवडता पक्षी मोर आहे मला मोर खूप आवडतो.

Leave a Comment