माझी सुंदर शाळा शालेय मराठी निबंध my beautiful school

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

माझी सुंदर शाळा शालेय मराठी निबंध my beautiful school 

माझी सुंदर शाळा my beautiful school 

माझी शाळा खूप सुंदर आहे माझ्या शाळेमध्ये अनेक उपक्रम होतात मी नेहमी उपक्रमात भाग घेते मला माझी शाळा खूप आवडते. माझ्या शाळेमध्ये अनेक वर्ग खुले आहेत शाळेमध्ये खूप विद्यार्थी आहेत सर्व विद्यार्थी खूप अभ्यास करतात.

माझ्या शाळेमध्ये सात शिक्षक आहेत ते खूप चांगल्या रीतीने शिकवतात आम्हाला चांगल्या पद्धतीने समजून सांगतात त्यांनी शिकवलेले आम्हाला चांगल्या प्रकारे समजते शाळेमध्ये दररोज परिपाठ होतो परिपाठामध्ये आम्हाला अनेक पायऱ्या घ्याव्या लागतात त्यामध्ये पहिली पायरी असते राष्ट्रगीत प्रतिज्ञा संविधान त्यानंतर प्रार्थना सामान्य ज्ञान प्रश्न बोधकथा समानार्थी शब्द विरुद्धार्थी शब्द एक वचन अनेक वचन शब्द शास्त्रज्ञांची माहिती समूहगीत पसायदान अशा प्रकारे विविध पायऱ्या असतात आम्ही त्यामध्ये सूत्रसंचालन घेतो स्वतः ऑर्डर देतो दररोज वेगवेगळ्या भाषेमध्ये म्हणजे मराठी हिंदी इंग्रजी भाषेमध्ये परिपाठ होतो परिपाठामध्ये सर्व विद्यार्थी स्वतःहून भाग घेतात आणि आपले चांगल्या प्रकारे सादरीकरण करतात.

माझ्या शाळेला खूप मोठे मैदान आहे मैदानामध्ये विविध प्रकारच्या मैदानांचे आखीव क्रीडांगणे आहेत त्यावर आम्ही नेहमी खेळत असतो आमचे शिक्षक आम्हाला खेळाच्या तासांमध्ये मैदानावर घेऊन जातात वेगवेगळे खेळ घेतात खेळांचे नियम आम्हाला सांगतात कौशल्य शिकवतात शिक्षक देखील आमच्या सोबत खेळतात त्यामुळे आम्हाला खूप आनंद मिळतो मैदानाची आम्ही निघालो खेळाचे नियम समजून घेतो कौशल्य समजून घेतो खेळातून शरीर संवर्धन होते ऊर्जा निर्माण होते व्यायाम होतो त्यामुळे आपले मन ताजेतवाने राहते तसेच मैदानावर विविध प्रकारचे उपक्रम आम्ही नेहमीच घेत असतो.

स्पर्धा परीक्षा हा उपक्रम आमच्या शाळेमध्ये राबवला जातो त्यामध्ये सर्व विद्यार्थी सहभागी होतात भविष्यातील स्पर्धा परीक्षांची माहिती आम्हाला दिली जाते कोणत्या पदासाठी कोणती परीक्षा असते व त्यानुसार आम्हाला मार्गदर्शन केले जातील त्यासाठी प्रश्नमंजुषा हा कार्यक्रम घेतला जातो मी आयएएस होणार हा उपक्रम देखील स्पर्धा परीक्षा च्या माध्यमातून घेतला जातो यातून सर्व शाळेची विद्यार्थ्यांची परीक्षा घेतली जाते बहुपर्यायी चाचणीतून प्रथम द्वितीय तृतीय क्रमांक काढले जातात यामुळे विद्यार्थ्यांमध्ये अभ्यासाची गोडी लागते तसेच स्पर्धा परीक्षांची पाया मजबूत होतो.

आमच्या शाळेमध्ये खूप मोठे असे वाचनालय आहेमाझी सुंदर शाळा my beautiful school  वाचनालयामध्ये अनेक पुस्तके आहेत त्या पुस्तकांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे नेत्यांची माहिती समाजसुधारकांची माहिती छान छान गोष्टींची पुस्तके शास्त्रज्ञांची माहिती शास्त्रज्ञांनी लावलेले शोध याची माहिती अशी विविध प्रकारची पुस्तके आहेत ती वाचल्यामुळे आमच्या ज्ञानात भर पडते वाचनाने मस्तक सुधारत असते त्यामुळे आम्ही नेहमी अवांतर वाचन करतो शाळेच्या मधल्या वेळेमध्ये आम्ही वाचनालयामध्ये जातो त्यातील पुस्तके वाचन करतो व जिथून घेतले होते तेच पुन्हा पुस्तक ठेवले जाते आमच्या मधूनच वाचनालय प्रमुखाची नेमणूक झालेली आहे वाचनालय नेमणूक प्रमुखाचे काम पुस्तक देवघेव रजिस्टर तसेच वाचनालयाची निगा राखणे ही कामे त्यांना दिली जातात लहान वर्गातील मुलांना आम्ही पुस्तके वाटप करतो व वाचन केलेली पुस्तके जमा करून घेतो यासाठी देखील देव रजिस्टर ठेवलेले आहे.

आमच्या शाळेमध्ये विज्ञान प्रयोगशाळा देखील आहे या प्रयोगशाळेमध्ये आम्ही नेहमी प्रयोग करत असतो वेगवेगळे प्रयोग प्रत्यक्ष के केल्यामुळे आणि त्याचा निष्कर्ष काढल्यामुळे आम्हाला विज्ञानाची गोडी लागलेली आहे सुसज्ज अशी प्रयोगशाळा आमच्या शाळेमध्ये आहेत त्यामध्ये शास्त्रज्ञांची माहिती चार्ट लावलेले आहेत तसेच संशोधकांनी केलेले संशोधन याचे देखील चार्ट लावलेले आहेत ते वाचल्यानंतर खूप छान असा अनुभव आपल्याला येतो प्रयोगशाळा अत्यंतच छान प्रकारे मांडणी केलेली आहे यामध्ये अनेक प्रकारचे साहित्य आहे दुर्बीण आहे काचेच्या साहित्य आहे.

आमच्या शाळेत अनेक वर्गखोले आहेत वर्ग खोल्या सुसज्जमाझी सुंदर शाळा my beautiful school  केलेले आहेत आम्ही नेहमी वर्ग सजावट करतो वर्ग सजावटीचे साहित्य स्वतः बनवतो स्वतः बनवलेले साहित्य आम्हाला खूप आवडतील त्यामध्ये विविध प्रकारचे कला कौशल्य कार्यानुभव च्या तासांमध्ये बनवलेले साहित्य आम्ही वर्गामध्ये लावतो आमच्या शाळेमध्ये वर्ग सजावटीमध्ये स्पर्धा घेतली जाते यामध्ये सर्वात जास्त सजवलेला वर्ग नंबर काढला जातो त्यामुळे प्रत्येक वर्गातील विद्यार्थी आपापला वर्ग स्वच्छ ठेवण्याकडे लक्ष देतो.

माझ्या शाळेमध्ये प्रत्येक वर्गाचे मंत्रिमंडळ आहे यामध्ये विविध पदांचा पदभार त्या त्या विद्यार्थ्याकडे दिला जातो प्रत्येक विद्यार्थी आपापल्या पदानुसार काम स्वीकारतो आणि वर्गात शांतता सुव्यवस्था राखण्याचे काम करतो हे काम करत असताना चांगल्या प्रकारचा अनुभव आम्हाला येतो वर्गाचे नेतृत्व करण्याची संधी आम्हाला येते याची निवड देखील आम्ही आमच्यातून केली जाते निवड करताना सर्व वर्गाचे मतदान घेतले जाते.

अशाप्रकारे माझी शाळा खूप सुंदर शाळा स्वच्छमाझी सुंदर शाळा my beautiful school  शाळा आहे मला माझ्या शाळेचा अभिमान वाटतो.

Leave a Comment