नवी मुंबई महापालिकेतील भरतीची खोटी जाहिरात mumbai mahanagarpalika
नवी मुंबई : नवी मुंबई महापालिकेमध्ये अधिकारी, कर्मचारी
यांची भरती सुरू असून तशा प्रकारच्या खोट्या जाहिराती, सूचना प्रसारित करण्यात येत असल्याची माहिती प्राप्त झालेली आहे. त्याचप्रमाणे काही जणांना महापालिकेचे खोटे लेटरहेड वापरून त्यावर महापालिकेचे बोधचिन्ह व खोटा शिक्का वापरून नियुक्ती करण्यात येत असल्याचे पत्रदेखील प्राप्त झाल्याचे निदर्शनास येत आहे. याबाबत संबंधित उमेदवारांकडून पोलिस विभागाकडे तक्रार दाखल करण्यात आलेली असून नवी मुंबई महापालिकेकडूनही पोलिस विभागाकडे रितसर तक्रार करण्यात आलेली आहे. नवी मुंबई महापालिकेमध्ये सध्या कोणत्याही पदासाठीची भरती प्रक्रिया सुरू नाही. त्यामुळे नागरिकांनी अशा प्रकारच्या दिशाभूल करणाऱ्या माहितीला अथवा जाहिरातींना बळी पडू नये व प्रतिसाद देऊ नये. तसेच संभाव्य आर्थिक नुकसान टाळावे, असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात येत आहे. नवी मुंबई महापालिकेमधील भरती किंवा कोणत्याही अधिकृत माहितीसाठी नागरिकांनी https://www.nmmc.gov.in यावर तसेच महापालिकेच्या अधिकृत फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम पेजला भेट द्यावी, असे आवाहन पालिका प्रशासनाने केले आहे.