मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत प्रशिक्षण कालावधी ११ महिने करणे व इतर अनुषंगिक सुचना देण्याबाबत mukhyamantri yuva karya training
संदर्भ १. कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग, शासन निर्णय क्रमांक: संकीर्ण-२०२४/प्र.क्र.९०/व्यशि-३मंत्रालय, मुंबई दिनांक ०९ जुलै, २०२४.
२. कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग, शासन निर्णय क्रमांक कौविउ-२०२४/प्र.क्र.११८/प्रशा-२ मंत्रालय, मुंबई दिनांक १० मार्च, २०२५.
३. कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग, शासन पुरकपत्र क्रमांक: कौविउ २०२४/प्र.क्र.११८/प्रशा-२ मंत्रालय, मुंबई दिनांक ११ मार्च, २०२५.
४. मा. उपआयुक्त, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागीय आयुक्तालय, छत्रपती संभाजीनगर, यांचे दि.११ मार्च, २०२५ रोजीच्या व्हि. सी. मधील सुचना.
५. मा. आयुक्त, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता महाराष्ट्र राज्य यांचे पत्र क्र.जा.क्र. कौविरांवउआ/कक्ष-८/प्र.क्र.४/२०२५/१७३०३२ दि. १२/०३/२०२५.
महोदय,
उपरोक्त संदर्भीय विषयान्यये सादर करण्यात येते की, संदर्भ क्र.१ अन्वये राज्यातील युवकांना त्यांच्या शिक्षणानंतर प्रत्यक्ष कामाचे प्रशिक्षण देवून त्यांची नोकरी मिळण्याची क्षमता (Employability) वाढविण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या “मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेंतर्गत कार्यप्रशिक्षणाचा कालावधी ११ महिने करण्यास संदर्भक्र. २ अन्वये मान्यता देण्यात आली आहे.
सदर योजनेतर्गत प्रशिक्षण पुर्ण केलेल्या उमेदवारांना संबंधित आस्थापनेत पुन्हा रुजू झाल्याच्या दिनांकापासुन ५ महिन्याच्या कालावधीसाठी कार्यप्रशिक्षण अनुज्ञेय असेल.
त्यानुसार आपणास खालीलप्रमाणे सुचित करण्यात येत आहे.
१. सदर योजनेंतर्गत सद्यस्थितीत जे उमेदवार कार्यप्रशिक्षण घेत आहेत, त्यांचा कार्यप्रशिक्षण कालावधी ते रुजू झाल्याच्या दिनांकापासून ११ महिने असा असेल याची दक्षता आपल्या स्तरावरून घ्येण्यात यावी.
२. तसेच, ज्या उमेदवारांचा ६ महिन्यांचा प्रशिक्षण कालावधी यापुर्वीच पुर्ण झाला आहे अशा उमेदवारांना पुढील ५ महिन्याच्या प्रशिक्षणसाठी संबंधित आस्थपनेत रुजू होण्याकरिता उमेदवारांना दिनांक ३० एप्रिल, २०२५ पुर्वी रूजू करून घ्यावे.
३. सदर योजनेत यापुर्वी सहभागी असलेल्या खाजगी आस्थापनांनी Certificate of Incorporation/ उपम आधार व EPF/ESIC/GST/DPIT या पैकी एक अशा प्रकारे किमान दोन प्रमाणपत्र विभागाच्या https://www.cmykpy.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर शासन निर्णयाच्या दिनांकापासुन ३० दिवसाच्या आत सादर करावे.
४. प्रस्तुत योजनेंतर्गत कार्य प्रशिक्षणासाठी यापुर्वी रूजू झालेल्या व यापुढे नव्याने रूजू होणाऱ्या उमेदवाराने तो संबंधित आस्थाननेत तसेच सदर आस्थापनेशी संबंधित इतर आस्थापना/कार्यालयात यापुर्वी कधीही कायम/तात्पुरत्या स्वरूपास कर्यरत नसल्याबाबतचे तसेच, कुठलाही हितसंबंध नसल्याबाबतचे प्रतिज्ञापत्र रूजू होते वेळी संबंधित आस्थापनेस सादर करणे अनिवार्य राहिल. संबंधित आस्थापनेनेही कार्यप्रशिक्षणासाठी रूजू होणारा उमेदवार यापुर्वी सदर आस्थापनेत अथवा सदर आस्थापनेशी संबंधित इतर आस्थापना/कार्यालयात कायम / तात्पुरत्या स्वरुपात कार्यरत नसल्याचे प्रतिज्ञापत्र सादर करणे अनिवार्य राहील. सदर दोन्ही प्रमाणपत्र संबंधित आस्थापनेने उमेदवार रुजू झाल्याच्या दिनांकापासुन १५ दिवसाच्या आत या कार्यालयाकडे सादर करणे अनिवार्य राहिल,
संदर्भ क्र. ३ नुसार १. सदर प्रशिक्षण कालावधीमध्ये यापुढे वाढ करण्यात येणार नाही.
२. या योजनेंतर्गत आस्थापना/उद्योग/महामंडळामार्फत विना अनुभवी रोजगार इच्छुक पात्र उमेदवारांना संबंधित क्षेत्रातील प्रत्यक्ष कार्य प्रशिक्षण देण्यात येत आहे. तथापि, सदर प्रशिक्षणाअंती प्रशिक्षणार्थ्यास संबोधेत आस्थापनेत कायमस्वरूपी नोकरीचा हक्क राहणार नाही.
उपरोक्त सुचनांनुसार संदर्भ क्र. २ व ३ अन्वये निर्गमित शासन निर्णयाप्रमाणे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेंतर्गत कार्यप्रशिक्षण योजनेची आपल्या स्तरावरून अंमलबजावणी करण्यात यावी, तसेच एक पेक्षा जास्त प्रशिक्षणार्थी ज्या आस्थापनेत रूजू आहेत अशा प्रशिक्षणार्थीचा एकत्रित रूजू अहवाल सोबतच्या विहित नमुन्यात या कार्यालयास सादर करण्याची सर्व कार्यालय प्रमुख / आस्थापना प्रमुख यांनी नोंद घ्यावी.