एमटीएस ऑलंपियाड परीक्षेचा निकाल जाहीर रोल नंबर टाकून निकाल पहा निकालाची अधिकृत लिंक उपलब्ध mts olympaid result link
MTS एमटीएस ऑलंपियाड राज्यस्तरीय परीक्षा 5 जानेवारी 2025 रोजी घेण्यात आली होती. सदर परीक्षेचा निकाल ऑनलाईन जाहीर करण्यात आलेला आहे. निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यांनी आपला रोल नंबर टाकून अधिकृत लिंक वरून निकाल डाऊनलोड करून घ्या
निकाल पाहण्यासाठी लिंक उपलब्ध Click Here
निकाल पाहण्यासाठी अधिकृत लींक खालील प्रमाणे
https://pame.in/mts/result.php
एमटीएस ऑलंपियाड परीक्षेचा उद्देशः –
Email- mtsolympiad@gmail.com
* परीक्षा केंद्रावर होईल.
* महाराष्ट्र राज्यातील शहरी आणि ग्रामीण भागातील शाळामध्ये अध्ययन करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्राथमिक वर्गापासूनच त्यांच्या बुध्दीला चालना दिली
तर त्यांच्या ज्ञानाच्या कक्षा रुंदावतील त्यामुळेच ग्रामीण व शहरी भागातील प्रज्ञावंत विद्यार्थ्यांचा शोध घेऊन गुणवत्तेच्या निकषांवर त्यांना
पारितोषिकाच्या स्वरूपात, स्कॉलरशिपच्या (शिष्यवृत्ती) स्वरूपात, मेडलच्या स्वरूपात किंवा सन्मानचिन्हाच्या (ट्रॉफिच्या) स्वरूपात केंद्रस्तरावर,
जिल्हास्तरावर तसेच राज्यस्तरावर प्रोत्साहन देणे, या परीक्षेच्या माध्यमातूनच शासनाच्या शिष्यवृत्ती परीक्षेची, एनटीएस परीक्षा, केंद्रीय स्पर्धा परीक्षा,
सैनिक शाळा प्रवेश परीक्षा, राज्य स्पर्धा परीक्षा तसेच लोकसेवा आयोगाच्या परीक्षा या सारख्या स्पर्धात्मक परीक्षांमध्ये भाग घेण्याचा क्षमता विकसित
पालकांनी स्पर्धा परीक्षाचे महत्व ओळखून आपल्या करणे हा एमटीएस ऑलंपिया महाराष्ट्र शासनमान्य राज्यस्तरीय स्पर्धा परीक्षेचा उद्देश आहे.
पाल्यास एमटीएस ऑलंपिया महाराष्ट्र शासनमान्य राज्यस्तरीय स्पर्धा परीक्षामध्ये सहभागी करून घ्यावे.
* परीक्षेची वैशिष्ट्येः–
* महाराष्ट्र शासनाने निर्धारीत केलल्या शिष्यवृत्ती परीक्षेच्या अभ्यासक्रमावर आधारीत परीक्षा,
* MPSC, UPSC सह सर्व स्पर्धा परीक्षेची तयारी प्राथमिक वर्गापासूनच करण्यासाठी अत्यंत उपयुक्त
* जवाहर नवोदय परीक्षेची परिपूर्ण तयारीसाठी अत्यंत उपयुक्त इयत्तेच्या काठीण्य पातळी नुसार प्रत्येक घटक व उपघटकास स्पर्श.
* प्रज्ञावंत विद्यार्थ्यांच्या बुद्धिला आव्हान देणारी परीक्षा अवांतर वाचनास प्रोत्साहन देणारी. अभ्यासक्रमाशी सुसंगत.
* बुद्धिमत्तेला चालना देणारी. विद्यार्थ्यांना विविध प्रश्न पध्दतीची ओळख करून देणारी परीक्षा.
* प्रज्ञावंत विद्यार्थ्यांच्या बुध्दीला आव्हान देणारी एमटीएस ऑलंपियाड परीक्षा दिल्यामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढतो.
* विद्यार्थ्यांना नियमित अभ्यासाची सवय लागते. मुलांना स्वयंअध्यन क्षमता विकसित करते.
* विद्यार्थ्यांना विविध प्रश्न पध्दतीची ओळख करून देते. * विद्यार्थ्यांचे सामान्य ज्ञान वाढवून, वाचन, लेखन व संभाषण विकसित करते.
* परीक्षा केंद्राची व स्पर्धात्मक परीक्षांची भिती मनातून काढून टाकते. * विद्यार्थी प्रश्नांचे उत्तर शोधताना तो सारासार विचार करायला शिकतो.
* प्रश्नांचे उत्तर शोधताना अनेक क्लृप्त्यांचा वापर करायला शिकतो, त्यांचा व्यवहारात उपयोग करायला शिकतो.
* पालकांनी स्पर्धा परीक्षाचे महत्व ओळखून आपल्या पाल्यास एमटीएस ऑलंपियाड परीक्षामध्ये सहभागी करून घ्यावे.
परीक्षेचे संपूर्ण माहिती
1) कृपया आपली प्रतिक्रिया / सूचना / दुरूस्ती / तक्रार असल्यास ती संस्थेच्या अधिकृत वेबसाईटवर www.mtsolympiad.ac.in प्रतिक्रिया या विभागात करावी.
2) आपल्या पाल्यास परीक्षा केंद्रावर नेण्या आणण्याची जबाबदारी ही पालकांचीच आहे.
3) परीक्षेच्या दिवशी केंद्रावर अचानक काही अन्य कार्यक्रम आयोजित केला गेल्यास पर्यायी परीक्षा केंद्राची व्यवस्था केली जाईल.
त्यामुळे परीक्षा उशिरा सुरू होण्याची शक्यता असते. उशिरा सुरू झालेली परीक्षा तेवढाच वेळ उशिरा संपेल. अशावेळी आमच्या समन्वयकांना सहकार्य करणे अपेक्षित आहे.
4) काही अपरिहार्य कारणास्तव परीक्षेच्या तारखेत बदल करण्याचा अधिकार संस्थेचा आहे.
5) परीक्षा केंद्रावर जागेअभावी बँचेस उपलब्ध न झाल्यास परीक्षार्थीला जमिनीवर बसावे लागेल यासाठी विद्यार्थ्यांनी पॅड व इतर परीक्षा विषयक साहित्य बरोबर आणणे आवश्यक आहे.
6) परीक्षेच्या दिवशी इरत कोणत्याही संस्थेमार्फत अन्य परीक्षा आयोजित केल्या गेल्या असतील तर अशा विद्यार्थ्यांसाठी पर्यायी व्यवस्था केली जाणार नाही.
7) काही अपरिहार्य कारणास्तव परीक्षार्थीना बैठक व्यवस्थेसाठी शाळा उपलब्ध न झाल्यास परीक्षार्थीची परीक्षा ही भारतीय बैठक पध्दतीने एखाद्या सांस्कृतीक / खाजगी सभागृहात अथवा खुल्या मैदानात आयोजित केली जाईल.
8) पारितोषिकांच्या संदर्भातील सर्व हक्क संस्थेकडे राखून ठेवले आहेत. पारितोषिक प्राप्त विद्यार्थ्यांची संख्या सहभागी विद्यार्थ्यांच्या संख्येनुसार कमी-जास्त करण्याचा अधिकार संस्थेला राहील.
१) एका परीक्षार्थी विद्यार्थ्याला राज्यस्तरीय, जिल्हास्तरीय किंवा केंद्रस्तरीय यांपैकी एकच बक्षीस दिले जाईल.
10) परीक्षेच्या तयारीसाठी खरेदी केलेले अवांतर परीक्षा साहित्य मार्गदर्शक पुस्तक, सराव प्रश्नपत्रिका संच इ. रकमेचा एमटीएस ऑलंपियाड शासनमान्य राज्यस्तरीय स्पर्धा परीक्षा च्या परीक्षा फिस शी कुठलाही संबंध नाही याची मला व माझ्या पाल्याला पूर्ण जाणीव आहे.
11) परीक्षेचा काठिण्यस्तर शालेय अभ्यासक्रमास पूरक असून यामुळे परीक्षार्थीवर अभ्यासाचा कोणताही अतिरिक्त ताण येणार नसून त्याच्या गुणवत्तेत वाढच होणार आहे याची मला व माझ्या पाल्याला पूर्ण जाणीव आहे.
12) परीक्षेचा निकाल तसेच परीक्षेची उत्तरसूची व विद्याथ्यर्थ्यांन सोडवलेली उत्तरपत्रिका संस्थेच्या अधिकृत वेबसाईटवर पहावयास मिळेल. www.mtsolympiad.ac.in
13) परीक्षेसंदर्भात सर्व कायदेशीर बाबी जिल्हा न्यायालय, परभणी यांच्या कार्यक्षेत्र अंतर्गत येतील.