एमटीएस (ऑलिंपियाड)-2025 स्पर्धा परीक्षेत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कांबळेश्वर शाळेचे घवघवीत यश mts olympaid exam result
*जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कांबळेश्वर येथील विद्यार्थी एम टी एस (ऑलिंपियाड) 2025 अंतर्गत झालेल्या परीक्षेमध्ये शाळेच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवले . सदर परीक्षा 5 जानेवारी 2025 रोजी घेण्यात आली होती .महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त परीक्षेत पालकांच्या इच्छेवरून शाळेतील शिक्षकांनी विद्यार्थ्यांची स्पर्धा परीक्षेची तयारी करून घेतली होती . नुकताच या परीक्षेचा ऑनलाईन रिझल्ट घोषित झाला असून या परीक्षेमध्ये शाळेमधील इयत्ता पहिली ते चौथी 57 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता .या परीक्षेमध्ये विद्यार्थ्यांनी राज्य जिल्हा व केंद्रस्तरावर प्राविण्य मिळवले असून विद्यार्थ्यांना ट्रॉफी बरोबर गोल्ड मेडल, सिल्वर मेडल,ब्राँझ मेडल देऊन गौरविण्यात येते .*
*सन 2018 पासून शाळेमध्ये सातत्याने स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची तयारी करून घेण्याचे काम शाळेतील सर्व शिक्षक करत असतात . त्याचबरोबर पालकांचीही मोलाची साथ लाभते. म्हणूनच विद्यार्थी विविध खाजगी शासकीय परीक्षांना बसवून विद्यार्थ्यांचा बेसिक पाया तयार करून घेणेवर शाळेच्या वतीने भर देण्यात येतो. स्पर्धा परीक्षा उपक्रमामुळे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कांबळेश्वर येथे अनेक प्रवेश खाजगी / इंग्रजी माध्यमातून होताना दिसून येतात. विद्यार्थ्यांची तयारी शाळेतील सर्व शिक्षकांच्या वतीने करण्याचे काम मुख्याध्यापक श्री . ज्ञानदेव सस्ते उपशिक्षक श्री. रेवणनाथ सर्जे उपशिक्षिका सौ .सुनिता शिंदे सौ .मनीषा चव्हाण या सर्व शिक्षकांच्या सहकार्यांमधून ,सकारात्मक दृष्टिकोन बाळगून करण्याचे काम सातत्याने होत असल्यामुळे विद्यार्थ्यांची भविष्यकालीन स्पर्धा परीक्षेची तयारी होत असते .*
*सदर परीक्षेमध्ये 80 ते 100 मार्क मिळालेले विद्यार्थी गोल्ड मेडल पात्र. 61 ते 79 गुण मिळवलेले सिल्वर मेडल पात्र आणि 50 ते 60 गुण ब्राँझ मेडल विद्यार्थी पात्र ठरले असून गोल्ड मेडल पात्र मध्ये मध्ये अर्जुन चव्हाण, दुईता आडके, देवराज खलाटे,अद्वेय घोरपडे, आदित्य कुंभार, स्मायली घोरपडे, खुशी धोत्रे शरण्या तांबे, तृप्ती जगताप, श्वेता वाघमारे, चव्हाण ,अमन पठाण, अल्फीया शेख , संकल्प देशमुखअथर्व निंबाळकर, कैवल्य देशमुख, जोया शेख, श्रेयांश भोसले, श्रुती चव्हाण, अथर्व धोत्रे, शिवन्या काकडे, वैष्णवी घोरपडे, प्रबुद्ध साळवे, स्वरा शिंदे, ईश्वरी धायगुडे, श्रेयश नरुटे, वेदांत जगताप, विराज उकिरडे, पियुष इंगळे, सोफीया शेख ,अन्वेष चव्हाण कशिश पवार, ऋतुजा सरडे, शिवम खलाटे, अंकिता वाघमारे, योगेश्वरी तावरे, अल्फिया शेख, आयुष इंगळे, विहान तावरे, आजान शेख, श्रेया नरुटे, जयवर्धन काकडे, अभिमन्यू भगत, आरिश लाडखान, कार्तिक कुंभार हे विद्यार्थी पात्र ठरले . सिल्वर मेडल साठी विराज जगताप, आराध्या शिंदे, विघ्नेश खलाटे, राजनंदिनी जगताप, आरोही धुमाळ, राजवर्धन निकाळजे,आरोही खुडे, भावेश जाधव, आदित्य इंगळे, शाहीद शेख,विवेक खरात हे विद्यार्थी तर ब्रॉझ मेडल साठी प्रणिती खलाटे, आकांक्षा खरात हे विद्यार्थी पात्र ठरले.*
*सर्व यशस्वी विद्यार्थी मार्गदर्शक शिक्षक यांचे कौतुक कांबळेश्वर गावच्या सरपंच सौ.मंदाकिनी कानडे उपसरपंच श्री किरण आगवणे सर्व सन्माननीय पदाधिकारी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा सौ. दिपाली खलाटे, सर्व सदस्य ,पालक तसेच पंचायत समिती गटशिक्षणाधिकारी श्री. निलेश गवळी साहेब , विस्तार अधिकारी श्री. संजय जाधव साहेब, केंद्रप्रमुख सौ. नफिसा तांबोळी, श्री संतोष खलाटे या सर्वांनी कौतुक केले .*