महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा पूर्व परीक्षा- २०२४ अनुषंगाने दि. १२.०७.२०२४ रोजीचे प्रशिक्षणाचे वेळेत बदल असलेबाबत mpsc exam training
संदर्भ:- १. या कार्यालयाचे आदेश जा.क्र. २०२४/महसूल/आस्था-२/रा.ना.से.पू.परीक्षा दि.०४.०७.२०२४
उपरोक्त विषयाचे अनुषंगाने संदर्भ क्र. १ चे पत्रानुसार महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा पूर्व परीक्षा- २०२४ रविवार, दिनांक २१ जुलै, २०२४ रोजी आयोजित करण्यात आलेली आहे. त्याकरीता बीड जिल्हाकेंद्रावरील एकुण ३०५१ उमेदवारांना प्रवेश देण्यात आलेला असून आयोगाकडून १० उपकेंद्रे निश्चित करण्यात आलेली आहेत. सदर परीक्षेकरीता उपकेंद्रनिहाय अधिकारी / कर्मचारी यांची संदर्भीय आदेशान्वये नियुक्ती करण्यात आलेली आहे.
सदर परीक्षेच्या अनुषंगाने असून दिनांक १२.०७.२०२४ रोजी ठिक ११.०० वाजता सर्व संबंधितांचे नियोजन सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय, बीड येथे प्रशिक्षण आयोजित करण्यात आलेले होते. तथापि, शिक्षण विभागाकडे उक्त दिनांकास सकाळ सत्रात परीक्षा असल्याने उपरोक्त प्रशिक्षण दिनांक १२.०७.२०२४ रोजी ठिक २.०० वाजता नियोजन सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय, बीड येथे आयोजित करण्यात आलेले आहे.
तरी सदर परीक्षेकरीता नेमणूक केलेल्या सर्व संबंधितांनी वेळेवर न चुकता उपस्थित रहावे.