सुंदर लेख “प्रत्येक ग्रहावर टाइम (दिवस/वर्ष) वेगवेगळा चालू आहे”? Motivational sundar lekha
पृथ्वी स्वतः भोवती 1 फेरी पूर्ण करते तो कालावधी = 1 दिवस
पृथ्वी सूर्याभोवती 1 फेरी पूर्ण करते तो कालावधी = 1 वर्ष
या दोन व्याख्या फिक्स ठेवून आपण सूर्यमालेतील इतर ग्रहांचे त्यांच्या स्वतः भोवती आणि सूर्याभोवती फिरण्याचे कालावधी ओळखू शकतो.
चित्रात वरच्या भागात प्रत्येक ग्रहाचा स्वतः भोवती फिरण्याचा कालावधी दाखवला आहे.
पृथ्वी स्वतः भोवती सुमारे 24 तासात 1 फेरी पूर्ण करते ज्याला आपण 1 दिवस असे म्हणतो त्यानुसार इतर ग्रहांना स्वतः भोवती 1 फेरी फिरायला किती वेळ लागतो ते बघा.
यात बुध आणि शुक्र याना स्वतः भोवती फिरायला मोठा कालावधी लागतो असे का होते हे नंतर वेगळ्या पोस्ट मध्ये बघू.
चित्रात खालच्या भागात प्रत्येक ग्रहाचा सूर्याभोवती फिरण्याचा कालावधी दिला आहे.
यात पृथ्वी साठी सुमारे 365 दिवस = 1 फेरी पूर्ण झाली म्हणजे 1 वर्ष झाले असे आपण मानतो.
हेच इतर ग्रहांची वेगवेगळे आहे.
ग्रहांची कक्षा सूर्यापासून जितकी दूर तितका त्या ग्रहाला सूर्याभोवती फिरण्यासाठी पृथ्वी पेक्षा अनेक पट जास्त कालावधी लागतो.
यात मंगळ जो पृथ्वी नंतरचा लगेचच असणारा ग्रह आहे तरी सुद्धा त्याला पृथ्वी पेक्षा सुमारे 1.8 पट जास्त दिवस सूर्याभोवती 1 फेरी पूर्ण करण्यासाठी लागतात.
याचा अर्थ असा की मंगळ ग्रहावर राहिला गेलेल्या भविष्यातील लोकांना तिथले 1 वर्ष हे पृथ्वी सारखे 365 दिवसाचे न मानता तिथल्या प्रमाणे सुमारे 687 दिवसाचे मानावे लागेल.
हेच सर्वात दूरचा ग्रह नेपच्युन साठी बघायचे झाले तर,
नेपच्युन ग्रह सूर्यापासून इतका दूर कक्षेत फिरत आहे की त्याला सूर्याभोवती 1 फेरी पूर्ण करायला पृथ्वीच्या तुलनेत 60190 दिवस किंवा सुमारे 165 वर्ष इतका मोठा कालावधी लागतो.
म्हणजेच नेपच्युन ग्रहाजवळ एखादे स्पेस स्टेशन उभारले आणि तिथे भविष्यातील लोक राहू लागले तर त्यांना त्यांचे 1 वर्ष मोजताना पृथ्वीवर मात्र 165 वर्षे होऊन गेलेली असतील, असा याचा अर्थ आहे.
याच अनुषंगाने प्रत्येक ग्रहाचे 1 दिवस आणि 1 वर्ष हे वेगवेगळे असते असे म्हणता येईल आणि त्या ग्रहासाठी तो कालावधी मानला तर सर्व गणित, कॅलेंडर, तारखा, महिने हे पुन्हा नव्याने वेगवेगळे बनवावे लागतील.
पृथ्वीला तर एकच चंद्र आहे जो पृथ्वी बरोबरच सूर्याभोवती 1 फेरी सुमारे 365 दिवसात पूर्ण करतो म्हणून चंद्रासाठी सुद्धा 1 वर्ष हे पृथ्वीचेच 1 वर्ष असे म्हणावे लागेल.
जर समजा चंद्राचा पृथ्वी भोवती 1 फेरी फिरण्याचा कालावधी म्हणजे चंद्राचे 1 वर्ष असे मानले तर मग इतर ग्रहांना तर अनेक चंद्र आहेत ज्यांची प्रत्येकाची त्या ग्रहाभोवती फिरण्याची गती आणि कालावधी वेगवेगळा आहे, तर सर्वच ग्रहांचा चंद्रावर वेगवेगळे वर्ष आणि त्या ग्रहाला सूर्याभोवती फिरण्याचे आधी सांगितल्या प्रमाणे असणारे वर्ष असे सर्वच वेगवेगळे बनून गोंधळ उडेल.
म्हणून सर्व कालगणना सध्यातरी पृथ्वीचा 1 दिवस आणि पृथ्वीचे 1 वर्ष याच सुरुवातीला सांगितलेल्या व्याख्ये नुसार फिक्स मानले जाते आणि त्यानुसार विविध खगोलीय गणिते, स्पेस मिशनचे प्लॅनिंग केले जातात.