सुंदर लेख…”बाहेरच खाणं टाळा अनं आरोग्य सांभाळा” motivational sundar lekha
बाहेरच खाण टाळा अन आरोग्य सांभाळा…… सध्या बाहेरच्या खाण्याचा कल बऱ्याच प्रमाणात वाढलेला आहे. सकाळच्या नास्त्यापासून दुपारचे जेवण व संध्याकाळचे जेवण सर्व बाहेर खानावळ,हॉटेल,ढाबा यावर भेटत आहे. धावपळीच्या जीवनात घरी वेळेचा अभाव किंवा जिभेचे चोचले म्हणा यासाठी बरेचशे बाहेरच्या जेवणावर ताव मारणारे खूप आहेत. खेडापाड्यापासून तर शहरापर्यंत सध्या छोट्या हात गाडीवर समोसा, कचोरी,वडापाव, भजीमिसळ पाव अशी नाश्त्याची दुकाने रस्ता रस्त्यावर थाटली आहेत. पोटापाण्यासाठी बेरोजगार हात गाडी लावतात परंतु शुद्धता पाळतात का? जास्त उत्पन्नाच्या लालशेपोटी निम्नदर्जाचे तेल वापरतात. त्याचबरोबर मसालेदार पदार्थांच्या झणझणीतपणा यामुळे तोंडाला चव येते,परंतु आपल्या शरीरावर त्याचे काय वाईट परिणाम होतात याचा विचार आपण कधी करत नाही.रस्त्यावरील धूळ,माशा,कीटक त्यावर बसतात आणिआपण आवडीने खातो कारण आपल्या जिभेला तशी झणझणीतपणाची चव हवी असते त्यामुळे परत परत खावेसे वाटते.पदार्थ बनवण्यासाठी आवश्यक वस्तू जशाची लसूण कांदा,मसाले, उकडलेले बटाटे, मैदा,बेसन, निम्न दर्जाचे तेल त्यातून ते पदार्थ बनवले जातात. बनवताना कारागीर कसा आहे, स्नान शुद्धी झाली की नाही, त्याला काही व्यसन आहे का, आजारी आहे का,याचा आपण कधी विचार करत नाही. मैद्याचे, बेसनाचे पीठ न बघता सरळ भिजवायला घातले जाते.कांदा, लसूण,उकडलेले अर्धवट बटाटे, मसाले,कमी किमतीच्या मिरच्या, कोथिंबीर,लसूण त्यात घातले जातात. ह्या सर्व वस्तू पदार्थांच्या आतील भागात दिसत नाही. तळल्यामुळे अन मसाल्याच्या रसायन युक्त सुगंधित पदार्थामुळे वरील सर्व दर्जाहीन वस्तूकडे आपले लक्ष राहत नाही. हे सर्व झाल्यानंतर ज्या तेलात तळले जाते ते निम्न दर्जाचे तेल, अक्षरश: काळे-कुट्ट होईपर्यंत वापरायला जाते.परत परत तेलाचा वापर केला जातो.तेलातील आवश्यक घटक लुप्त होतात तोपर्यंत त्याचा सर्रास वापर केला जातो.पदार्थ तळल्यानंतर उघडे ठेवले जातात त्यावर माशा किडे किटकुल बसतात त्यावर झाकण ठेवल्या जात नाही.घाणीतून आलेल्या किडे कीटक माशांमुळे आपल्याला आजारांचा प्रादुर्भाव होण्याची दाट शक्यता असते. याचा आपण कधी विचार करत नाही आणि छान दर्जाहीन पदार्थावर ताव मारतो.अक्षरश: या दुकानावर,हातगाडीवर गर्दीच गर्दी दिसून येते काही ठिकाणी तर नंबर लावावा लागतो. बेरोजगारांसाठी ही एक चांगली संधी आहे या दुमत नाही, परंतु व्यवसायिकांनी स्वच्छता राखून ग्राहकांना खाद्यपदार्थ बनवायला हवे अशी अपेक्षा……!
याचबरोबर फास्ट फूड म्हणून विदेशी संस्कृतीचे अनुकरण व नवीन ट्रेंड मध्ये पिझ्झा, बर्गर,पॅटीस,पेस्ट्री,कुकीज,मोमोज एनर्जी ड्रिंक,सोडा यांचा समावेश होतो. हे श्रीमंत तरुण-तरुणी व श्रीमंत कुटुंबातील लोकांचे बाहेरचे खाणे….! पण शेवटी तेही आरोग्यास धोकादायक अन हानिकारकच….! या धावपळीच्या जीवनात वेळ मिळत नाही अशी कारणे सांगून बाहेरच्या खाद्य पदार्थांचे स्वागत केले जाते. परंतु मोबाईल, इंटरनेट,सामाजिक प्रसार माध्यमातून वेळ काढून, चांगले,उत्तम, दर्जेदार पदार्थबनवण्यासाठी वेळ काढला अन स्वतः बनवले तर किती शरीराचे हानी टाळेल. आरोग्य तज्ञांच्या सर्वेक्षणानुसार या पदार्थांच्या सेवनामुळे मधुमेह, हृदयविकार, बॅड कॅलरीजमुळे वजन वाढणे,जाडेपणाची समस्या भेडसावत आहे. त्यामुळे शोषणासंबंधीचे आजार, घशाचे आजार मोठ्या प्रमाणात होताना दिसून येत आहे. एवढेच नाही तर अतिरिक्त सेवनामुळे हार्मोन्स वर परिणाम होताना दिसून येत आहे.स्त्री -पुरुषातील पुनरुत्पादन क्षमता कमी होत आहे. या पदार्थाच्या सेवनानंतर आपल्या शरीरातील वाईट परिणाम,नवनवीन आजाराचा आपण कधी विचार केला का? मात्र हे केव्हा कळते जेव्हा आपण दवाखान्याची वारी करतो तेव्हा….! हृदयरोग, नाक कान घसा तज्ञांच्या दवाखान्यासमोर सकाळपासून नंबर लावण्यासाठी रुग्णांची गर्दी दिसून येते. जी गर्दी कधी काळी बाहेरच्या फास्टफूड च्या हातगाडी अन हॉटेल जवळ असते तीच रुग्ण रूपाने दवाखान्यासमोर दिसते. गल्लोगल्ली दवाखाने होऊन सुद्धा रुग्णांची संख्या वाढत आहे मधुमेह, उच्च रक्तदाब, सांध्याचे आजार हे अगदी सामान्य झाले आहे. कमी वयातील मुले- तरुण मंडळींना ह्या आजाराचा सामना करावा लागत आहे.
ह्या सर्व वेगवेगळ्या आजाराने ग्रासून मनुष्यची आयुष्य मर्यादा कमी होताना दिसून येत आहे.असं म्हणावंसं वाटतं कि, ‘कमी वयातच देशच नाही तर जग म्हातारे होताना दिसून येत आहे’ म्हणून बाहेरचं खाणं टाळा अन आरोग्य सांभाळा.
संकलन A.K.PATIL