एक अत्यंत सुंदर गोष्ट भगवंता वरचा विश्वास कसा असायला हवा? त्याचे उत्तम उदाहरण motivational stories
*Believe-विश्वास*
*आणि*
*Trust-विश्वास*
*दोन्ही शब्दांचा अर्थ “विश्वासच” आहे. पण तरीही दोन्ही विश्वासात अंतर आहे.*
*एकदा शेजारी शेजारी असलेल्या दोन उंच इमारतींच्या मधे केबल टाकून ती घट्ट बांधून व हातात मोठा बांबू घेऊन एक डोंबारी त्या केबल वरून या इमारती वरून त्या इमारतीवर जात होता.*
*त्याच्या खांद्यावर त्याचा लहान मुलगा होता.*
*दोन इमारतींच्या मधे हजारो माणसे जमा झाली होती व श्वास रोखून त्याची ती जीवघेणी कसरत पहात होती.*
*हलणारी केबल, जोरदार वारा, स्वतःचा आणि मुलाचा जीव पणाला लावून त्याने ते अंतर पूर्ण केलं.*
*जमलेल्या लोकांनी उत्साहाने टाळ्या, शिट्या वाजवल्या, तोंड भरून कौतुक केले.*
*तो इमारतीच्या खाली लोकांमधे आला. लोक त्याच्या बरोबर फोटो. सेल्फी काढू लागले. त्याचं अभिनंदन करू लागले.*
*तो डोंबारी सगळ्यांना उद्देशुन म्हणाला,*
*मला हे पुन्हा एकदा करावसं वाटतं. तुम्हाला विश्वास वाटतो का मी हे पुन्हा करू शकेन?*
*सगळी माणसं एक आवाजात म्हणाली हो, तू हे परत एकदा नक्कीच करू शकतोस.*
*डोंबारी म्हणाला “तुम्हाला विश्वास आहे ना, मी हे परत करू शकेन?*
*पुन्हा सगळे ओरडले हो हो आम्हाला विश्वास आहे तू पुन्हा हे नक्कीच करू शकशील.*
*तुम्हाला नक्की विश्वास आहे ना?*
*हो. तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे तू खात्रीने करू शकशील.*
*डोंबारी म्हणाला “ठीक आहे. तुमच्यापैकी कोणीतरी मला तुमचा मुलगा द्या मी त्याला खांद्यावर घेऊन मी या केबल वरून चालतो.*
*जमावा मधे एकदम शांतता पसरली. सगळे चिडीचूप झाले. डोंबारी म्हणाला काय झाले. घाबरलात का?*
*अरे आताच तर तूम्ही म्हणालात ना की माझ्यावर पूर्ण विश्वास आहे म्हणून?*
*तात्पर्य :- जमावाने जो डोंबाऱ्यावर दाखवलेला विश्वास हा Belief आहे.*
*Trust नाही.*
*तसेच हाच भ्रम सगळ्यांना आहे, परमेश्वर आहे. पण परमेश्वराच्या सत्तेवर विश्वास नाही.*
*You only belive in God, But you don’t trust him.*
*POSITIVE रहस,आनंदी रहा.*
*कुछ कर दिखाओ ऐसा ,के दुनिया कर ना सके आपके जैसा*