“शालेय परिपाठ” सुंदर सूत्रसंचालन morning assembly sutrasanchalan 

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

“शालेय परिपाठ” सुंदर सूत्रसंचालन morning assembly sutrasanchalan 

!! सुस्वागतम् सुस्वागतम् सुस्वागतम् !!

फुल फुलत आहे, कळी उमलत आहे. अशा या आनंदाच्या वातावरणात आमच्या परिपाठाला सुरवात होत आहे.

सागराला साथ असते पाण्याची

बागेला शोभा असते फुलांची

तसेच

आमच्या परिपाठाला साथ असते विद्यार्थ्यांची

माझे नाव………….. मी या परिपाठाचे सुत्रसंचलन करत आहे.

सु म्हणजे सुंदर विचार असाच एक नवीन सुविचार सांगत आहे आपल्याला………………..

वार, दिनांक, शके यांची माहिती असणे अवश्यक असते, म्हणुन आजचे पंचांग सांगत आहे………..

आपल्याला देशातील घडामोडिंची माहिती घेणे आवश्यक असते म्हणुन वार्तापत्र सांगत आहे…………

आपल्याला ज्यातून बोध होतो अशी एक बोधपर कथा सांगत आहे…………

उन्हात चालण्यासाठी सावलीची गरज असते,

अंधारात चालण्यासाठी उजेड हवा असतो.

तसेच ज्ञानरूपी जीवन जगण्यासाठी ज्ञानाची गरज असते

म्हणून सामान्य ज्ञान घेऊन येत आहे………….

प्रत्येक माहिती नवीन मुलगा सांगेन व त्याने त्याचे सांगितलेले काम केले की सुत्रसंचलन करणारा विद्यार्थी त्याचे नाव घेऊन धन्यवाद करीन.

नभीच्या जलधारांची पडते धरणीशी गाठ

अशा या सुंदर समयी सादर करत आहोत आम्ही परिपाठ 

१) सुविचार :

माणुसकी खूप कमी होत चाललीय. ती फक्त जपायला शिका.. इतिहास सांगतो काल सुख होतं, विज्ञान सांगते उद्या सुख असेल, पण माणुसकी सांगते, जर मनात चांगल्या विचारांची साठवण असेल, तर दररोज सुख असते.

आणि म्हणून आजचा सुविचार घेऊन येत आहे

२) बातम्या :

आपल्या शिक्षकांची आणि आपल्या पालकांची आपल्याकडून खूप मोठी स्वप्ने असतात. आणि ही स्वप्ने पूर्ण करण्यासाठी आजच्या आधुनिक युगातील घटना आपल्याला माहित पाहिजे म्हणून आजचे बातमी पत्र घेऊन येत आहे

३) दिनविशेष :

आयुष्यात उगवणारा प्रत्येक दिवस हा नवी उमेद घेऊन येत असतो. आणि या प्रत्येक दिवसाचे विशेष महत्व आपल्याला माहित असणे गरजेचे असते. म्हणून आजच्या दिवसाचे विशेष महत्व सांगण्यासाठी आजचे दिनविशेष घेऊन येत आहे

४) बोधकथा :

सर्व काही मनासारखं होत नाही, पण मनासारखं झालेलं विसरू नका. आणि अशा या जीवनात वेळोवेळी कठीण प्रसंग हे येणारच पण कठीण प्रसंगी आपल्याला योग्य बोध घेऊन यशाचे शिखर गाठायचे आहे. म्हणून बोध देणारी बोधकथा घेऊन येत आहे

५) सामान्य ज्ञान प्रश्न :

आपल्याला खूप काही प्रश्न पडत असतात. काही सामाजिक, आर्थिक , वैज्ञानिक, शैक्षणिक वगैरे. आम्हालाही काही प्रश्न पडलेले आहेत. बघू तुम्हाला या प्रश्नांची उत्तरे येतात का म्हणून आजचे प्रश्न घेऊन येत आहे

६) कोडे :

आपलं आयुष्य हे कोड्याप्रमाणेच असतं. थोडं कठीण, थोडं सोप तर थोडं मजेदार… आजचे कोडे हे आयुष्यासारखेच आहे. थोडे कठीण, थोडं सोप तर थोडं मजेदार म्हणून आजचे कोडे घेऊन येत आहे.

७) संवाद (इंग्रजी) :

आपल्याला इतर विषयाबरोबरच इंग्रजी विषयही सोपा वाटावा. म्हणून इंग्रजी विषयाचा पाया भक्कम होण्यासाठी आपल्याला इंग्रजी शब्दाबरोबर आपल्याला छोटे छोटे संवाद सादर करता आले पाहिजेत. म्हणून आजचा इंग्रजी संवाद घेऊन येत आहे….

शेवटी जाता जाता एवढंच म्हणेन

जीवन आहे खरी कसोटी मागे वळून पाहू नका, येईल तारावयास कोणी वाट कुणाची पाहू नका, यश तुमच्याजवळ आहे जिंकल्याशिवाय राहू नका.