(अभिरूप मतदान) मॉक पोलची तयारी कशी करावी?  mock poll process 

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

(अभिरूप मतदान) मॉक पोलची तयारी कशी करावी?  mock poll process 

प्रारंभिक तयारी – मॉक पोलची तयारी

ही तयारी केंद्राध्यक्षाने उमेदवार अथवा त्यांचा निवडणूक प्रतिनिधी अथवा मतदान प्रतिनिधी यांचे समक्ष प्रत्यक्ष मतदान सुरु होण्यापूर्वी करायला हवी.

मॉक पोल घेताना BU व VVPAT मतदान कक्षामध्ये ठेवावे आणि CU मतदान केंद्राध्यक्षाच्या टेबलवर ठेवावे. एक मतदान अधिकारी मतदान कक्षामध्ये मतदान प्रतिनिधींसह थांबेल आणि BU व VVPAT चे निरिक्षण करील, तसेच मॉक पोलमध्ये दिलेल्या मतदानाचे उमेदवारनिहाय हिशोब ठेवील.

मॉक पोल मतदान सुरु करण्याच्या निश्चित वेळेच्या ९० मिनिटेआधी सुरु करावे.

प्रारंभिक तयारी- मॉक पोलची तयारी

मॉक पोल कमीत कमी दोन उमेदवारांच्या प्रतिनिधींसमोर करावयाचा आहे. तथापि, मतदान प्रतिनिधी उपस्थित नसल्यास मतदान केंद्राध्यक्ष यांनी १५ मिनिटे वाट पाहू शकतील आणि तद्नंतरही मतदान प्रतिनिधी उपस्थित न झाल्यास मॉक पोल सुरु केला जाईल.

एखाद्या मतदान केंद्रावर एकच मतदान प्रतिनिधी उपस्थित असला तरी मॉक पोल घेतला जाईल आणि त्याबाबत भाग-१- मतदान केंद्राध्यक्षाच्या अहवालात (मॉक पोल प्रमाणपत्र) नोंद घ्यावी.

मतदानाच्या दिवशी मॉक पोल (अभिरुप मतदान)

प्रत्येक मतदान प्रतिनिधीने आपल्या उमेदवारास मत द्यावे. ज्या उमेदवाराचे प्रतिनिधी उपस्थित नसतील अशा उमेदवारास इतर मतदान प्रतिनिधी अथवा मतदान अधिकारी यांनी मत द्यावे. मॉकपोल मध्ये किमान ५० मतदान होणे आवश्यक आहे व प्रत्येक उमेदवाराला (नोटासह) समान मते देणे आवश्यक आहे.

एकही मतदान प्रतिनिधी हजर नसेल तर केंद्राध्यक्ष व मतदान अधिकारी यांनी नोटासह सर्व उमेदवारांना समान मते देऊन किमान ५० मतांचा मॉकपोल करणे आवश्यक आहे.

मतदानाच्या दिवशी मॉक पोल (अभिरुप मतदान)

उमेदवारांची संख्या ५० पेक्षा जास्त असल्यास प्रत्येक उमेदवार व नोटा यांना किमान एक मत देऊन मॉक पोल करा.

मॉक पोलच्या दरम्यान उमेदवार प्रतिनिधी हजर झाल्यास मॉक पोल मध्ये मत देण्यास त्यांना परवानगी द्या.

मॉक पोल ‘क्लोज’ केल्यानंतर मात्र कोणासही मॉक पोलमध्ये मतदान करता येणार नाही, याची नोंद घ्या.

मतदान केंद्रात मॉक पोल समाप्त करतेवेळी CU च्या Display वर दाखवलेला दिनांक व वेळ तपासा आणि त्याची नोंद घ्या, आणि त्यावरील दिनांक व वेळ आणि प्रत्यक्ष दिनांक व वेळ या दोन्हींमध्ये कोणतीही विसंगती असल्यास, ती मॉकपोल प्रमाणपत्रामध्ये ‘अ.क्र. आय’ नमूद करा.

मॉक पोल (अभिरुप मतदान)

Close बटन दाबून मॉकपोल बंद करा. Result बटन दाबून मॉकपोल दरम्यान प्रत्येक उमेदवारास पडलेली मतसंख्या दाखवा व त्याची नोंद घ्या.

VVPAT मधील निघालेल्या स्लिप उमेदवार/प्रतिनिधी यांना दाखवून त्या मशिन मधील मतदानाशी जुळत आहेत, हे दाखवा. Clear बटन दाबून मॉकपोलचा डेटा clear करा

केंद्राध्यक्षाने मॉकपोलची प्रक्रिया पूर्ण करून मॉकपोलमध्ये निघालेल्या सर्व (VVPAT च्या सात Test Slip सह) स्लिपच्या मागील बाजूवर MOCK POLL SLIP असा शिक्का मारुन त्या सोबत दिलेल्या काळ्या पाकिटामध्ये घालून त्यावर मतदानकेंद्राचा तपशिल नोंदवून पाकिट सील करावे. मतदान केंद्राध्यक्ष व मतदान प्रतिनिधी यांनी त्यावर सह्या कराव्यात. लिफाफ्यावर मतदान केंद्र क्रमांक व नाव AC क्रमांक व नाव, मतदान दिनांक व “VVPAT Paper Slips of Mock” लिहावे. VVPAT Mock Poll Slips असलेले सदरचे काळे पाकिट, पुरवण्यात आलेल्या प्लॅस्टिक डब्यामध्ये ठेवून डब्याला पिंक पेपर सील अशा रितीने लावावे की, डबा पुन्हा उघडताना सील फाटून निघेल. मतदान केंद्राध्यक्ष व मतदान प्रतिनिधी यांनी सदर पिंक पेपर स्लिपवर सह्या कराव्यात.

मॉक पोल प्रमाणपत्र (भाग-१)

मॉक पोल प्रमाणपत्र माफ पण झाल्यानंतर प्रमाणपत्र द्यायचे असते त्यावरती केंद्र अध्यक्षांचा शिक्का सही तसेच मतदान प्रतिनिधींची स्वाक्षरी घ्यायची असते.

मॉक पोल नंतर CU सील करणे

> CU स्वीच ऑफ करा.CU च्या Result सेक्शनला ग्रीन पेपर सील लावा. (सुधारीत ग्रीन पेपर सीलला पांढ-या बाजूच्या टोकास self adhesive stickers आहेत आणि त्यावर “A”, “B” असे मार्क केलेले आहे.)ग्रीन पेपर सील लावण्यासाठी Result सेक्शनच्या आतील बाजूच्या दरवाज्यास खाच देण्यात आलेली आहे. या खाचेत ग्रीन पेपर सील लावण्यापूर्वी त्यावर मतदान केंद्राध्यक्ष यांनी अनुक्रमांकाच्या खाली स्वाक्षरी करावी. तसेच त्यावर उमेदवार । मतदान प्रतिनिधींच्या स्वाक्षरी घ्याव्यात.

मॉक पोल नंतर मशीन सील करणे

> ग्रीन पेपर सील लावताना पांढ-या बाजूवरील हिरवा रंगाचा ठिपका Result

बटणाच्या व लाल रंगाचा ठिपका Print बटणाच्या वर येईल, असे पाहावे.

> त्यानंतर Result सेक्शनचा दरवाजा अशाप्रकारे बंद करा की पेपर सीलची दोन टोके बाहेरच्या बाजूस येतील. > त्यानंतर आतील लहान दरवाजा बंद करुन त्यावर स्पेशल टॅग लावावा. स्पेशल

टॅग लावण्यापूर्वी त्याच्या मागच्या बाजूस मतदान केंद्राध्यक्ष यांनी त्यावर CU चा अनुक्रमांक लिहून स्वाक्षरी करावी, तसेच मतदान प्रतिनिधींच्याही स्वाक्षरी घ्याव्यात.

त्यानंतर Result सेक्शनचा बाहेरील दरवाजा बंद करावा. यावेळी हिरव्या पेपर सीलची दोन्ही टोके बाहेरच्या बाजूस आलेली असावीत.

> तद्नंतर बाहेरील दरवाजा Address Tag व दोरा वापरुन सील करावा. ➤ Address Tag वर मतदान प्रतिनिधींच्या स्वाक्षरी घ्याव्यात. त्यावर विभेदक चिन्ह उमटवावे व मतदान केंद्राध्यक्षांनी स्वाक्षरी करावी.

त्यानंतर ग्रीन पेपर सीलच्या A बाजूवरील Wax Paper काढावा आणि ती बाजू बाहेरील दरवाजावर चिकटवावी.त्यानंतर B बाजूवरील Wax Paper काढावा व ती A बाजूवर चिकटवावी. अशारितीने ग्रीन पेपर सील लावल्यानंतर त्यावरील अनुक्रमांक दिसेल, याची दक्षता घ्यावी.

मॉक पोल नंतर VVPAT Drop Box सील करणे.

> VVPAT च्या ड्रॉप बॉक्समधील मॉक पोलच्या सर्व स्लिप बाहेर काढाव्या व ड्रॉप बॉक्स रिकामा करावा.

> त्यानंतर सदर ड्रॉप बॉक्स दोरा व Address Tag वापरुन सील करावा.

➤ Address Tag वर मतदान प्रतिनिधींच्या स्वाक्षरी घ्याव्यात. त्यावर विभेदक चिन्ह उमटवावे व मतदान केंद्राध्यक्षांनी स्वाक्षरी करावी.

सिलिंग करताना दिलेल्या पुठ्ठयाचा वापर करा. लाख मशीनवर पडणार नाही याची काळजी घ्या.

मॉक पोल थोडक्यात फ्लो-चार्ट

१. जर दोन किंवा अधिक मतदान प्रतिनिधी हजर असतील तर मतदानाच्या वेळेपूर्वी ९० मिनिटे मॉक पोल सुरु करा.

२. जर एक किंवा शून्य मतदान प्रतिनिधी हजर असतील तर पंधरा मिनिटे वाट बघा.

३. BU व VVPAT यांना मतदान कक्षामध्ये ठेवा. मतदान संपेपर्यंत त्यांना हलवू नका.

४. CU मतदान केंद्राध्यक्ष। मतदान अधिकारी यांच्या टेबलवर ठेवा.

५. BU ची केबल VVPAT ला जोडा. VVPAT ची केबल CU ला जोडा.

६. VVPAT चा पेपर रोल नॉब अनलॉक (उभा वर्किंग पोझिशन) करा.

७. VVPAT चा ड्रॉप बॉक्स रिकामा असल्याचे उपस्थितांना दाखवा.

८. CU स्विच ऑन करा.

९. Clear बटण दाबा व त्यानंतर CU मध्ये एकही मत नोंदले नसल्याचे उपस्थितांना दाखवा.

१०. किमान ५० मते नोंदवून मॉक पोल करा, नोटासह प्रत्येक उमेदवाराला मत दिले गेले आहे याची खात्री करा. नोटा व उमेदवारांना दिलेली मतसंख्या नोंदवून ठेवा.

११. मॉक पोलनंतर CU वरील Close बटन दाबून मतदान प्रक्रिया बंद करा.

१२. CU वरील Result बटन दाबून उमेदवारनिहाय नोंदविलेली मते व आपण लिहून ठेवलेली मते यांची जुळणी करा.

१३. VVPAT च्या स्लिप्स बाहेर काढा व CU मधील मते समान असलेबाबत पडताळणी करा

१४. CU वरील Clear बटन दाबून मॉक पोलचा निकाल डिलीट करा व तसे उपस्थितांना दाखवा.

१५. VVPAT स्लिप्सच्या मागील बाजूवर “MOCK POLL SLIP” असा शिक्का मारा.

74

मॉक पोल थोडक्यात फ्लो-चार्ट

१६. मॉक पोल स्लिप काळ्या लिफाफ्यामध्ये घालून त्यावर सर्व तपशील लिहून सील करावे त्याला पुरवण्यात आलेल्या प्लॅस्टिक डब्यामध्ये ठेवून डब्याला गुलाबी पेपर सीलने बंद करा.

१७. CU स्विच ऑफ (बंद) करा. ग्रीन पेपर सील, स्पेशल टॅग व अॅड्रेस टेंग लावून CU सील करा.

१८. VVPAT चा ड्रॉप बॉक्स रिकामा असल्याचे उपस्थितांना दाखवून तो अॅड्रेस टेंगने सील करा.

१९. मतदान केंद्राध्यक्षांच्या अहवालातील मॉक पोल प्रमाणपत्र भाग-१ काळजीपूर्वक भरा.

२०. CU चालू करुन त्यावरील टोटल बटन दाबून त्यामध्ये शून्य मते नोंदविली असल्याचे उपस्थितांना दाखवा व स्वतः खात्री करा.

२१. प्रत्यक्ष मतदान प्रक्रियेसाठी CU ऑन करा.